Saturday, May 2, 2020

कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील 69 व्यक्तीचे स्वॅब निगेटिव्ह तर 2 स्वॅब अहवाल प्रलंबित

कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील 69 व्यक्तीचे स्वॅब निगेटिव्ह तर 2 स्वॅब अहवाल प्रलंबित


परभणी / सोनपेठ (दर्शन)  :- 

जिल्हयातील सेलु शहरामधील राज मोहल्ला येथील रहिवाशी असलेली दुर्धर आजार व कोरोना (कोव्हीड-19) ग्रस्त मयत महिला रुग्णाच्या सहवासातील सेलु व परभणी येथील खाजगी रुग्णालयातील व इतर असे एकुण ७१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील हायरीस्क १७ व लो - रिस्क ३४ व इतर १८ असे एकुण ६९ स्वॅब निगेटीव्ह आले असुन २ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. 
          शुक्रवार दि.1 मे २०२० रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हयात कोव्हिड १९ विषाणु बाधित एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही तसेच एकुण ५४ स्वॅब स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात जिल्हा रुग्णालय परभणी येथे पूर्वीचे ८०३ व आज रोजी दाखल ५४ असे एकूण ८५७ संशयितांची नोंद झालेली आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
                -*-*-*-*-

No comments:

Post a Comment