Wednesday, May 13, 2020

दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीची माहिती भरण्यास मुदतवाढ

दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीची माहिती भरण्यास मुदतवाढ


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीसाठी होणाऱ्या गर्दीचे नियमनासाठी जिल्ह्यातील दस्त नोंदवू इच्छिणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे  दि.13 मे 2020 पर्यंत लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतू नागरिकांच्या सोईसाठी ही माहिती भरण्यास रविवार दि. 17 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हादंडाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिली आहे.    
            परभणी जिल्ह्यातील दस्त नोंदवू इच्छिणाऱ्यांनी आता दि. 17 मे 2020 रोजी सायंकाळी 6  वाजेपर्यंत  आपले अर्ज 
खरेदीखत दस्त नोंदणीची लिंक : https://forms.gle/NW5Y248HcMTgjTyD9 गहाणखत दस्त नोंदणीची लिंक : https://forms.gle/JYKJTMDhPSXuxX6z6
या उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर नोंदणी करावेत. आज रोजी संकलित झालेल्या अर्जाची छाननी करून परभणी जिल्ह्यातील दस्त नोंदवू  इच्छिणाऱ्या अर्जाची जिल्ह्यातील नऊ दुय्यम निबंधक कार्यालयनिहाय वर्गवारी करण्यात येईल आणि ज्या क्रमाने अर्ज केले आहेत त्या क्रमाने सोमवार दि. 18 मे 2020 पासून दस्त नोंदणीचे वेळापत्रक आखुन देण्यात येईल . संबंधित अर्जदारास त्यांनी अर्जामध्ये नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांना नेमुन दिलेला दिनांक कळविण्यात येणार आहे. त्याप्रमाणे अर्जदारांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून दस्त नोंदणीची कार्यवाही पुर्ण करावी.
असे जिल्हादंडाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
                    -*-*-*-*-

No comments:

Post a Comment