Saturday, May 2, 2020

संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी १५ स्वॅब कलेक्शन कॅबिनेट प्राप्त ; जिल्हा रुग्णालयात आज २० संशयितांची नोंद

संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी १५ स्वॅब कलेक्शन कॅबिनेट प्राप्त ; जिल्हा रुग्णालयात आज २० संशयितांची नोंद


परभणी / सोनपेठ (दर्शन)  :-  

जिल्ह्यातील संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी एकुण १५ स्वॅब कलेक्शन कॅबिनेट प्राप्त झाले असून या सुविधेमुळे स्वॅब घेताना आरोग्य विभागातील वैद्यकिय आधिकारी - कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी मिळण्यास मदत होणार आहे.
     शनिवार दि.2 मे 2020 रोजी एकुण २० स्वॅब स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच जिल्हयात कोव्हिड-१९ विषाणु बाधित एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. कोरोना विषाणू संदर्भात परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे ८५७ व आज दाखल झालेले २० असे एकूण ८७७ संशयितांची नोंद झालेली आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
             -*-*-*-*-

No comments:

Post a Comment