वीरशैव लिंगायतांचे गोत्र आणि त्यांचे कुलदैवत
सोनपेठ (दर्शन) :-
भारतीय संस्कृती हि अनेक धर्म,पंथ,परंपरा यांना सामावून घेतलेली आहे,यामध्येच वीरशैव लिंगायत हा 'गुरू' परंपरा असलेला धर्म आहे,(पितृ परंपरा नव्हे). वीरशैव या परंपरेत साधकाचे गोत्र हे वीरशैवातील 'शिवलिंग दिक्षा' देणारे, 'ब्रम्हचारी' जंगम असणारे "श्रीगुरू ष.ब्र.108 .... शिवाचार्य" असे नाव असलेल्या श्रीगुरू महाराजांच्या शाखा मठानुसार वीर, नंदी, वृषभ, भ्रुंगी आणि स्कंद या पाच पैकीच एक गोत्र असते.
वीरशैवामध्ये 'कश्यप', 'भरद्वाज', 'अत्रि' इ. सप्तऋषीच्या नावानुसार गोत्र नसते,
कारण विरशैव परंपरेची उत्पत्ती ही श्री ब्रम्हदेवां पासुन नसुन ती भगवान श्री शिवशंकाराच्या प्रथम शिवगणा द्वारे म्हणजे श्री विरभद्र, श्री नंदी, श्री वृषभ योगीश्वर (घंटाकर्ण), श्री भ्रुंगीश्वर (धेनुकर्ण) व श्री कार्तिकस्वामी या पाच गोत्रपुरुषा द्वारे झालेली आहे. म्हणुन वीरशैव हे शिवांश असुन पराशिवाचे उपासक आहेत.
-संदर्भ-
🔺श्री शिवमहापुराणातील विद्येश्वर संहिता व स्रुष्टी खंड,
🔺श्री स्कंदपुराणातील महेश्वर खंड
🔺श्री लिंगपुराण स्रुष्टी उत्तपती वर्णन
वीरशैवांचे मुख्य कुलदैवत हे पराशिव इष्टलिंग हेच आहे,
हेच पराशिव इष्टलिंग भक्तच्या कल्यानासाठी गुरू (शिवाचार्य), लिंग (शिवलिंग), जंगम (वीरशैवांचे पुरोहित), त्रिविध स्वःरूपात अवतरित झाले आहेत. ज्या प्रमाणे बेलाला तीन पाने (दळे) असुन त्याला एक बेलपत्र म्हणतात, त्याप्रमाणे गुरू, लिंग, जंगम, हि बाह्य दर्शी जरी वेगळी दिसली तरी ती एक आहेत.
महाराष्ट्रातील 'वीरशैवांचे कुलदैवत'
हे मुळ (पराशिव/शिवलिंग) स्वरूपातील महादेवाची ठिकाणे आसतात, ज्यामध्ये प्रमुख्याने
१)श्री शिखर शिंगणापुरचा मोठा महादेव,
२) श्री केतकी संगमेश्वर,
३) श्री संगमावरील महादेव,
४) श्री विरभद्रेश्वर,
५) श्री सिध्देश्वर
इत्यादि प्रमुख्याने अढळतात,पण
भैरवनाथ, खंडोबा, ज्योतिबा, सिध्दाजी इ. भैरव स्वरूपातील शिवाच्या अंश अवतारातील (संरक्षक) दैवते हि वीरशैवांची कुलदैवते नसतात.
कारण श्री मार्तण्ड भैरव ( खंडोबा), श्री सिध्दाजी (काळभैरवनाथ), श्री ज्योतिबा वगैरे अवतार शिवाचे अंशस्वरूपातील अवतार आहेत त्यांची उत्पत्ती हि सप्तऋषीच्या (ब्रम्हपुत्र/धर्मपुत्रांच्या) कुळ व वंशपरंपरेचे रक्षण करण्यासाठी झालेली होती व त्यामुळे सप्तऋषींनी भैरवादि दैवतांना आपल्या कुळाचे रक्षक दैवत मानले म्हणुन कुळदैवत (कुलदैवत) ही परंपरा सुरु झाली.
पण व वीरशैव हे वर संगितल्या प्रमाणे 'सप्तऋषी' किंवा श्री ब्रम्हदेवाचे वंशज नसुन ते प्रथम शिवगणांचे म्हणजेच शिवाचेच वंशज आहेत. म्हणुन ते स्वतः शिवांश असल्या करणाने खंडोबा, ज्योतिबा, सिध्दाजी, वगैरे भैरव स्वरुपातील शिवावतार हे त्यांचे कुलदैवत नसुन मुख्य स्वरूपातील 'पराशिव' इष्टलिंग हेच कुलदैवत आहे.
वीरशैव हे शिवांश असल्याने शरीरावर (गळ्यात) गुरू दिक्षेने शिवलिंग धारण करतात. व ते शिवलिंग शेवटपर्यंत शरीरावर असल्यामुळे त्यांची विधीपुर्वक 'समाधी' करून (मृत-शरीरास जमीनीत पद्मासानात बसवून तळ हतावर त्यांचे गळ्यातील शिवलिंग ठेवून) अंत्यविधी करतात.
No comments:
Post a Comment