Thursday, May 28, 2020

कंन्टेनमेंट झोन सोडून अन्यत्र बाजारपेठा खुली करा - आ.डॉ.राहूल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कंन्टेनमेंट झोन सोडून अन्यत्र बाजारपेठा खुली करा - आ.डॉ.राहूल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कंन्टेनमेंट झोन वगळून अन्यत्र बाजारपेठ लवकरात लवकर सुरु करून व्यापा-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक आ.डॉ.राहूल पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी स्थानिक आमदार पाटील यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सने संवाद साधला. त्यातून मागील आठवड्यापासून परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे, हे निदर्शनास आणून दिले. सुरुवातीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी असताना तिस-या आणि चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.  जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत. परंतू मागील पंधरा दिवसांपासून मुंबई-पुणे आणि इतर मोठ्या शहरातून अनेक नागरिक आणि कामगार जिल्ह्यात परतत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात आणि ग्रामीण भागात वाढल्यचे आ.पाटील यांनी नमुद केले. सद्यस्थितीत रुग्णांचे स्वब नांदेड येथील प्रयोगशाळेकडे पाठविले जात आहे. परंतू तेथील रिपोर्ट येण्यास विलंब होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. येथील सामान्य रुग्णालयास मंजूर करण्यात आलेली प्रयोगशाळा चाचणी अवस्थेत आहे, असेही निदर्शनास आणून दिले. 27 मे पर्यंत जिल्ह्यात 67 कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळले असून एकंदरीत 171 कोरोना रुग्णांचे स्वॅबचे रिपोर्ट प्रलंबित असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752. 

No comments:

Post a Comment