Monday, May 11, 2020

लॉक डाउन काळात अडकलेले मजूर विद्यार्थी नागरिकांना मध्य प्रदेश येथे ; पोहचवण्यासाठी परभणीतून परिवहन विभाग्याच्या बस रवाना (परभणी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केली व्यवस्था)

लॉक डाउन काळात अडकलेले मजूर विद्यार्थी नागरिकांना मध्य प्रदेश येथे ; पोहचवण्यासाठी परभणीतून परिवहन विभाग्याच्या बस रवाना
(परभणी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केली व्यवस्था)


 परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 

मध्य प्रदेश येथील मजूर विद्यार्थी कारागीर कामगार परभणी येथे लॉक डाउन काळात अडकून पडलेले होते परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दखल घेऊन यांची त्यांच्या गावी नेऊन सोडण्याची व्यवस्था केली त्यानुसार आज दि 11 मे रोजी ह्या सर्व मजूर व विद्यार्थी नागरिक यांना परभणी येथून मध्य प्रदेश येथे  महाराष्ट् राज्य परिवहन बस द्वारे रवाना करण्यात आले.

सदरील बस मधील प्रवाश्यांना पाथरी रोडवरील सरदेशपांडे नर्सरी परिसरात वीर सावरकर विचार मंच, म शं शिवणकर प्रतिष्ठान, लायन्स क्लब प्रिन्स,संत कवरराम सेवा मंडळ , वुई केअर फौंडेशन यांचे सदस्य यांच्या वतीने जेवणाची पाकिटे पोळी भाजी पुलाव चटणी व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या देऊन सोय करण्यात आली. 

तसेच ही बस घेऊन जाणारे चालक यांचे याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, घरगुती प्रकारचे भोजन मिळाल्याने प्रवाशांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

यावेळी रविकिरण गंभीरे, रमेश गोळेगावकर, प्रविण भानेगावकर, डॉ सचिन पाठक, संजय रिझवणी, विकी नारवानी, भालचंद्र गोरे, सचिन सरदेशपांडे, मंदार कुलकर्णी, सतीश नारवानी, संतोष हरकळ, हितेंद्र तलरेजा, मोहन कुलकर्णी आदी स्वयंसेवक उपस्थित होते.

                                                           

00000

No comments:

Post a Comment