Monday, May 18, 2020

कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयातील सर्व कर्मचारी बांधवांच्या वतीने "मुख्यमंत्री सहायता निधीस" मदत

कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयातील सर्व कर्मचारी बांधवांच्या वतीने "मुख्यमंत्री सहायता निधीस" मदत


सोनपेठ (दर्शन) :-  
सोनपेठ येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने कोरोना विरूद्धच्या लढाईत मदत करण्याच्या उद्देशाने एक दिवसाचा सामुहिक पगार १२१९४० रू. (एक लाख ऐक्केविस हजार नऊशे चाळीस रुपये) बँकेद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला. 
शहरातील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयातील सर्व कर्मचारी बांधवांच्या वतीने कोरोनाच्या साथीमध्ये लढण्यासाठी सामुहीक रित्या, जनजागरण मोहीम, सर्व प्रशासकीय कामकाजात प्रत्यक्ष सहभागी होत तर आहेतच त्याचबरोबर मा. मुख्यमंत्री यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस पाठवण्यात आला आहे. हा निधी थेट बँकेतून मुख्यमंत्री सहायता निधीस प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांच्या मार्फत पाठवण्यात आला आहे. 
या निधीसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment