Sunday, May 31, 2020

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेस थेट संपर्काद्वारे स्वॅबचा रिपोर्ट लवकर द्या :- जिल्हाधिकारी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेस थेट संपर्काद्वारे स्वॅबचा रिपोर्ट लवकर द्या :-  जिल्हाधिकारी


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर संशयितांच्या स्वॅबच्या अहवालास होणारा विलंब चिंताजनक आहे. आपल्या प्रयोगशाळे मार्फत तातडीने स्वॅबची रिपोर्ट मिळावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेस थेट संपर्काद्वारे केली.
शासकीय रुग्णालयात मोठया प्रमाणावर संशयित दाखल होत आहे. वैद्यकीय अधिका-यांमार्फत या संशयितांच्या वैद्यकीय तपासणीसह स्वॅबचे अहवाल घेतले जात असून ते अहवाल तातडीने नांदेड येथील प्रयोगशाळकडे पाठविले जात असून स्बॅवच्या अहवालास मात्र विलंब होत आहे. चार-चार दिवस स्वॅबचे अहवाल प्राप्त होत नसून त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी श्री मुगळीकर यांनी रविवारी(दि.31) त्या प्रयोगशाळेतील संबंधीत अधिका-यांशी संपर्क साधला अन् होणा-या विलंबा बाबत माहिती घेतली. चर्चा केली. त्याद्वारे स्वॅबचे रिपोर्ट तातडीने मिळावेत, अन्यथा त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी उद्भवत असल्याचे नमुद केले.
दरम्यान, जिल्हाधिका-यांच्या या हस्तक्षेपामुळे अहवाल लवकरात लवकर प्राप्त होतील,अशी आशा पल्लवीत होत आहे.

परभणी जिल्ह्यातील चार प्रश्‍न चुटकीनिशी दूर कोविड 19 ; समितीद्वारे कठोर उपाय

परभणी जिल्ह्यातील चार प्रश्‍न चुटकीनिशी दूर कोविड 19 ; समितीद्वारे कठोर उपाय




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणुचा प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयासह कोविड हॉस्पीटल वर नियुक्त केलेल्या समितीने जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या आदेशा प्रमाणे अवघ्या एका दिवसात चार प्रश्‍न चुटकीनिशी दूर केले.
जिल्हा रुग्णालयातंर्गत कर्तव्या वरील वैद्यकीय अधिका-यांसह परिचारिकांच्या निवासाकरिता या समितीने मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत सुसज्ज असे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे वसतीगृह ताब्यात घेतले असून त्या पाठोपाठ संशयीतांचे स्वॅब घेण्याकरिता व डाटा संकलीत करण्याकरिता काही कर्मचारी नव्याने नियुक्त केले असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी सा.सोनपेठ दर्शनशी बोलतांना दिली.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीतील कोेरोना हेल्थ सेंटरवरील समस्यांवर सुध्दा या समितीने तात्काळ लक्ष घातले. अन् तेथील सांडपाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अवघ्या काही तासात दूर केला. विशेषतः सांडपाण्याकरिता त्या परिसरातील विहिरीचा पूर्णतः गाळ काढून घेतला अन् त्या इमारतीच्या सांडपाण्याचा प्रश्‍न सोडविला. पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी तातडीने त्या ठिकाणी बोअर पाडण्यास मंजुरी दिली.
या व्यतिरिक्त क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींसह कुटुंबियांसाठी चांगला प्रतीचा नाश्ता व जेवण उपलब्ध करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी दिले आहेत. या इमारतीचा वीज पुुरवठा सुरळीतपणे रहावा, यादृष्टीने जिल्हाधिका-यांनी त्या ठिकाणी स्वतंत्र कनेक्शन व डीपी उभारण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना दिल्या. पाठोपाठ त्यासाठी 4 लाख रूपयांची तरतूद करीत ती कंपनीकडे जमा केली. त्यामुळे त्या इमारतीत 24 तास सुरळीत असा वीज पुरवठा राहणार आहे.

कोविड-19 शी लढताना शासनाने दिले नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सुरक्षा कवच

कोविड-19 शी लढताना शासनाने दिले नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सुरक्षा कवच



सोनपेठ (दर्शन) :- 

राज्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संलग्नीकरण करून एकत्रित स्वरूपात मे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने दि.01 एप्रिल 2020 पासून अंमलात आली आहे.  या योजनेत सुमारे 85 ते 90 टक्के नागरिकांचा लाभार्थी म्हणून समावेश होत असून उर्वरित नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत.  महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची अंमलबजावणी व संनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत केले जाते.  
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पिवळी, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिकाधारक कुटुंबे आणि अवर्षणग्रस्त 14 जिल्ह्यांमधील (औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा) शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जीवित नोंदणीकृत लाभार्थी कुटुंबे समाविष्ट आहेत.  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना 2011 मधील नोंदीत लाभार्थी कुटुंबे समाविष्ट असून ग्रामीण भागासाठी स्वाभाविक निकष व शहरी भागांसाठी व्यावसायिक निकष ठेवण्यात आले आहेत. 
सध्या जगभर पसरलेल्या करोना विषाणूची लागण देशभरात झाली असून करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र राज्यातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची संख्या झालेली आहे.  त्यामुळे राज्यातील करोना संशयित रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता अधिकाधिक रुग्णालयात उपचारांची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये काही ठिकाणी शासकीय रुग्णालये covid-19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.  
या पार्श्वभूमीवर covid-19 रुग्णांना अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक बोजा पडू नये तसेच covid-19 महामारीच्या संकटामध्ये सर्वच नागरिकांना आरोग्य विषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी मर्यादित कालावधीसाठी योजनेची व्याप्ती सर्व नागरिकांसाठी वाढविण्याचा प्रस्ताव राज्य आरोग्य हमी सोसायटी कडून पाठविण्यात आला होता.  महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांचा लाभ लाभार्थी रुग्णांबरोबर इतर रुग्णांना देखील मिळावा आणि शासकीय रुग्णालयाकरिता राखीव असलेल्या उपचार पद्धती उपलब्ध व्हाव्यात व योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयातील डॉक्टर, इतर कर्मचारी व अनुषंगिक कर्मचारी यांना covid-19 साथरोग प्रतिबंध संदर्भात आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध व्हावी, याबाबत राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार शासनाने घेतलेल्या निर्णयात कोणत्या बाबींचा समावेश आहे, हे जाणून घेऊ या… या लेखातून..
• Covid-19 उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता लाभार्थी रुग्णांबरोबरच राज्यातील या योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये covid-19 साठी उपचार अनुज्ञेय राहील.  
• याबाबत राज्य आरोग्य हमी सोसायटीने विहित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी. लाभार्थ्याला रहिवासी पुरावा म्हणून वैध पिवळे, केशरी, शुभ्र शिधापत्रिका, तहसिलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा यापैकी एक पुरावाजन्य कागदपत्र सादर करावे लागेल. त्याबरोबरच शासनमान्य फोटो ओळखपत्र देणे आवश्यक राहील. 
• करोनाच्या साथीचे गांभीर्य, उपचाराची तातडी पाहता उपचारासाठी आवश्यक कागदपत्राबाबत शिथिलता देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई यांना देण्यात येत आहेत. 
• सद्य:स्थितीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 996 उपचार व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 1 हजार 209 उपचार पुरविले जात असून याचा लाभ राज्यातील दोन कोटी 23 लक्ष कुटुंबांना मिळत आहे. 
• या अंतर्गत राज्यातील सुमारे 85 टक्के लोकसंख्येचा समावेश होतो.  
• तथापि राज्यातील covid-19 उद्रेकाची सद्य:स्थिती पाहता या परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील सर्व रहिवासी असलेल्या उर्वरित नागरिकांनासुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अनुज्ञेय 996 उपचारपद्धतीचा लाभ मान्यताप्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.  
• शासकीय रुग्णालयाकरिता राखीव असलेल्या 134 पैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवणयंत्राचा उपचार वगळता 120 उपचार अंगीकृत खासगी रुग्णालयांना दि. 31 जुलै 2020 पर्यंत मान्यताप्राप्त दराने देण्यात यावेत.  
• योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या खर्चाची प्रतिपूर्ती विमा कंपनीकडून योजनेंतर्गत लाभार्थी नसलेल्या कुटुंबांच्या उपचाराची खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित रुग्णालयास राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई यांच्यामार्फत हमी तत्त्वावर करण्यात येईल.
• या शासन निर्णयातील प्रपत्र क मध्ये समाविष्ट असलेले काही किरकोळ व काही मोठे उपचार व काही तपासण्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत. 
•  त्या उपचार व तपासण्या या योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये सर्व लाभार्थ्यांना (योजनेंतर्गत लाभार्थी असलेले व लाभार्थी नसलेले) सीजीएचएस च्या दरानुसार उपलब्ध करून देण्यात येतील. 
• या खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित रुग्णालयास राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई यांच्यामार्फत हमी तत्वावर करण्यात येईल. 
• Covid-19 साठी शासनाने जाहीर केलेल्या खाजगी अंगीकृत रुग्णालयांकडून करोना संशयित रुग्णांवर उपचार करण्याकरिता पीपीई किट व एन-95 मास्कचा आवश्यक वापर करण्यात येईल. 
• या प्रमाणात प्रत्यक्ष शासनाने ठरविलेल्या धोरणानुसार निधी देण्यात येईल. 
• याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत नियंत्रण केले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक यांची राहील. 
• तसेच प्रतिपूर्ती करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही, याची खबरदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी यांची राहील.
• ही योजना 31 जुलै 2020 पर्यंत अंमलात राहील. त्यानंतर याबाबत आढावा घेऊन मुदतवाढीचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात येणार आहे. 
हा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने शासनाने दि. 23 मे  2020 निर्गमित केला आहे.तसेच नागरिकांना हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 202005231250562117 या संकेतांकाद्वारे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

                                                                 (मनोज शिवाजी सानप                        जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

परभणी जिल्हा उद्या पासुन सुरक्षीत अंतर ठेऊन अशी असेल बाजारपेठ टाईम-टेबल

परभणी जिल्हा उद्या पासुन सुरक्षीत अंतर ठेऊन अशी असेल बाजारपेठ टाईम-टेबल



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा महसुल प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दि.1 जून पासून पुढील आदेशापर्यंत दुपारी तीन ते सकाळी सात वाजेपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला असून या संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त कोणालाही फिरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता दुकाने व अस्थापने सुरू करण्या संदर्भात दिवस, वेळ व वार निश्‍चीत केेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दै.दिलासासह माध्यमांना दिली.
सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे व्यवहार सुरू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिले आहे. त्या संदर्भातील एक यादीच प्रशासनाने दै.दिलासासह रविवारी(दि.31) माध्यमांना दिली. त्याप्रमाणे बाजारपेठेतील  विविध दुकानांचे व्यवहार हे पुढील वार व वेळ पुढील प्रमाणे
**********
गुरूवार, शुक्रवार, शनिवार
वेळ- सकाळी 7 ते दुपारी 3
ही दुकाने राहणार सुरूः
इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, मोबाईल्स, टॉवर्स, बॅटरी, अ‍ॅटोमोबाईल्स, भांडी, स्टेशनरी, कटलरी, जनरल स्टोअर्स, प्लॉस्टीक- रस्सी, क्रॉकरी, गिफ्ट अर्टिकल, फर्निचर

सोमवार, मंगळवार बुधवार
वेळ- सकाळी 7 ते दुपारी तीन
कपड़े/ रेडिमेड कपडे, टेलर्स, घडयाळ, सराफा, बेल्टींग/बॅक्स/सुटकेस, इमिटेशन ज्वेलरी, पुस्तक, सायकल, स्टील ट्रेडर्स, सिमेंट, स्क्रॉप मर्चंट,हार्डवेअर, बिल्डींग मटेरिअल, पेंट, फुटवेअर, प्लायवूड,उर्वरीत सर्व अस्थापना

आठवड्यातील सर्व दिवस
सकाळी 7 ते दुपारी 3(रविवारी दुध विक्री 7 ते दुपारी 12 या वेळेत)
शेतीविषयक बि-बियाणे, औषधी इत्यादी
किराणा, खाद्य पदार्थ विक्री(स्वीटमार्ट, बेकरी, फास्ट फुड इतर)
दुध विक्री, खासगी अस्थापना(सी.ए.कार्यालय, विधिज्ञ कार्यालय इत्यादी), ऑप्टीकल स्टोअर्स, कापूस खरेदी,

आठवड्यातील रविवारसह सर्व दिवस
टीव्ही, फ्रिज, एसी इतर मेकॅनिकल फक्त घरी जावून दुरूस्त करणे
दुरूस्ती करणारे व सेवा देणारे कारागीर
सलून सेवा फक्त घरी जावून

आठवड्यातील रविवारसह सर्व दिवस
वेळेचे बंधन नाही
हॉस्पीटल, मेडिकल, आरोग्य विषयक सेवा

आठवड्यातील रविवारसह सर्व दिवस
सवर्र्साधारण अनुज्ञेय वेळेनुसार
लॉन्ड्री(हॉस्पीटल मधील कपड्यासाठी व इतर)
पेट्रोलपंप
वृत्तपत्र मुद्रण व विक्री
हायवेवरील ऑटोमोबाईल्स व गॅरेज
तसेच अधिकृत सर्व्हिस सेंटरमधील वाहनांच्या व्यवहारा संबंधी कागदोपत्री कारवाई पूर्ण करण्याचे कामकाज
इतर सर्व अत्यावश्यक सेवा.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

सर्व दिव्यांगांनी 15 जूनपर्यंत नोंदणी करावी - जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर

सर्व दिव्यांगांनी 15 जूनपर्यंत नोंदणी करावी - जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

कोरोना महामारी आणि त्यामुळे विषाणुचा प्रसार होऊ नये म्हणुन लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर परभणी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शासकीय अन्नधान्य वितरण व अन्य मदत सुलभतेने होण्याच्या दृष्टीकोणातून जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची माहिती ऑनलाईन संकलीत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे  जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी  जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी सोमवार दि. 15 जून 2020 पर्यंत नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
           जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे  https://parbhani.gov.in/registration-for-divyang ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी या ऑनलाईन प्रणालीत दिव्यांग व्यक्तींचे नातेवाईक , मित्र किंवा संपर्कातील अन्य कोणीही दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करू शकतील. दिव्यांगांची नोंदणी करतांना दिव्यांग व्यक्तींचे नाव , संपुर्ण पत्ता , दिव्यांग व्यक्तीचा किंवा संपर्कासाठी इतरांचा मोबाईल क्रमांक , मतदार यादीत नाव असल्यास भाग क्रमांक , गाव  व अनुक्रमांक तसेच आधार क्रमांक , दिव्यांगाचा प्रकार , टक्केवारी , जन्मतारीख , शिधापत्रिका असल्यास शिधापत्रिकेचा क्रमांक , दिव्यांग प्रमाणपत्राचा क्रमांक आणि दिनांक या संपूर्ण माहितीसह सोबत दिव्यांगाचा फोटो अपलोड करावयाचा आहे. ही लिंक दि. 31 मे 2020 पासून कार्यान्वित झाली असून जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी नोंदणी दि. 15 जून 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण करावी. असेही  कळविण्यात आले आहे.

           -*-*-*-*-


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
           यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
                   -*-*-*-*-

14 व्या वित्त आयोगातून शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास साहित्य मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण

14 व्या वित्त आयोगातून शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास साहित्य मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण 



सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज बनवणे कामी ग्रामपंचायत च्या 14 वा वित्त आयोगाच्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राला आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
        मुख्य कार्यकारी अधिकारी बि.पी.पृथ्वीराज, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, माजी जी.प. सदस्य लक्ष्मिकांत देशमुख यांचे प्रेरणेतून रविवार 31 मे 2020 रोजी शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
            तालुक्यातील शेळगाव येथे नुकतेच  प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असलेल्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधूतून वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले आहे.  
             वैद्यकीय साहित्य प्राप्त झाल्यानंतर त्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राला लोकार्पण करण्यात आले . यावेळेस कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांत देशमुख, प.स.सभापती प्रतिनिधी भगवान राठोड, गट विकास अधिकारी सचिन खुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष पवार, सरपंच सुधाकर मुलगुर आदिसह माजी पंचायत समिती सभापती ग्रामपंचायत सदस्य आदीची यावेळी उपस्थिती होती.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

14 व्या वित्त आयोगातून शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास साहित्य मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण

14 व्या वित्त आयोगातून शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास साहित्य मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण 



सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज बनवणे कामी ग्रामपंचायत च्या 14 वा वित्त आयोगाच्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राला आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
        मुख्य कार्यकारी अधिकारी बि.पी.पृथ्वीराज, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, माजी जी.प. सदस्य लक्ष्मिकांत देशमुख यांचे प्रेरणेतून रविवार 31 मे 2020 रोजी शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
            तालुक्यातील शेळगाव येथे नुकतेच  प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असलेल्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधूतून वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले आहे.  
             वैद्यकीय साहित्य प्राप्त झाल्यानंतर त्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राला लोकार्पण करण्यात आले . यावेळेस कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांत देशमुख, प.स.सभापती प्रतिनिधी भगवान राठोड, गट विकास अधिकारी सचिन खुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष पवार, सरपंच सुधाकर मुलगुर आदिसह माजी पंचायत समिती सभापती ग्रामपंचायत सदस्य आदीची यावेळी उपस्थिती होती.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

नागठाण शिवाचार्य यांच्या क्रूर हत्तेची सीबीआय चौकशी ; साधु-संतांना संरक्षण कायदा व सर्व शिवाचार्य यांना संरक्षणाची मागणी

नागठाण शिवाचार्य यांच्या क्रूर हत्तेची सीबीआय चौकशी ; साधु-संतांना संरक्षण कायदा व सर्व शिवाचार्य यांना संरक्षणाची मागणी



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ जिल्हा परभणी येथील श्री ष.ब्र. 108 नंदिकेश्वर शिवाचार्य मठ संस्थांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना मार्फत माननीय तहसीलदार यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार साहेबराव घोडके यांना नुकतेच एक निवेदन सादर करून त्या निवेदनात स्वर्गीय श्री गुरु ष.ब्र.निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज नागठाण तालुका उमरी जिल्हा नांदेड यांची दिनांक 24 मे 2020 रविवार रोजी क्रूर हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा तसेच सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, सर्व साधु-संतांना संरक्षण कायद्याची निर्मिती करून तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील सर्व विरशैव मठ संस्थांनच्या मठाधिपती शिवाचार्य यांना तात्काळ संरक्षण पुरविणे आदी मागण्यांचे निवेदन देऊन विनंती करण्यात आली या निवेदनावर मठाधिपती श्री गुरु ष.ब्र. 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, संतोष प्रभुअप्पा निर्मळे, किरण रमेश स्वामी, महेश पद्माकर स्वामी, सुरेश रामलिंग पोपडे, अमृत महालिंग स्वामी, सुहास सुभाषअप्पा नित्रुडकर, प्राध्यापक महालिंग मेहत्रे सर आदिंच्या स्वाक्षरी आहेत.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

Saturday, May 30, 2020

1 जूनपासून रेशन कार्डबाबत नवे नियम, नेमके बदल काय ?

1 जूनपासून रेशन कार्डबाबत नवे नियम, नेमके बदल काय ?



मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन)  : -

देशभरात 1 जून पासून ‘वन नेशन वन रेशन कार्ड‘ ही योजना लागू होणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी 1 जून पासून काही महत्त्वपूर्ण नियम बदलणार आहेत. या नियमांमुळे रेशन कार्डधारक देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातून सरकारने ठरवलेल्या दरात अन्नधान्य विकत घेऊ शकणार आहेत

आतापर्यंत रेशन कार्ड धारक ज्या जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड तयार करत त्याच जिल्ह्यात त्यांना रेशन घेता येत होतं. मात्र, आता सर्व लाभार्थ्यांना देशभरातील कोणत्याही ठिकाणावरुन रेशन घेता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने देशात अशा प्रकारची योजना लागू व्हावी यासाठी केंद्र सरकारला आदेश दिले होते. अखेर ही योजना 1 जून पासून संपूर्ण देशभरात लागू होत आहे.

*17 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश योजनेत सहभागी*

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेत आतापर्यंत देशातील 17 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले आहेत. तर उदिसा, मिझोराम आणि नागालँड या राज्यांनीदेखील या योजनेत सहभागी होण्यास तयारी दर्शवली आहे.

*लाभार्थ्यांना मदत कशी मिळेल?*

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत पीडीएस मशीनद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटवली जाईल. पीडीएस मशीनच्या आधारे लाभार्थ्यांना ओळखले जाईल. या योजनेसाठी सरकारला सर्व रेशन दुकानांवर पीडीएस मशीन बसवावी लागेल.

*नवं रेशन कार्ड बनवायची आवश्यकता नाही*

या योजनेसाठी नवं रेशनकार्ड बनवायची किंवा जुनं रेशन कार्ड जमा करण्याची आवश्यकता नाही. लाभार्थी आपल्या जुन्या रेशन कार्डमार्फतही योजनेचा लाभ घेऊ शकतात. रेशन कार्ड दोन भाषांमध्ये राहतील. पहिली म्हणजे स्थानिक भाषा आणि दुसरी भाषा ही हिंदी किंवा इंग्रजी असेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला 3 रुपये किलोने तांदूळ तर 2 रुपये किलोने गहू मिळतील. दरम्यान, ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही, ते ऑनलाईन अर्ज दाखल करुन रेशन कार्ड मिळवू शकतात.

*रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा दाखल करायचा?*

सर्वात अगोदर राज्याच्या खाद्य विभागाच्या वेबसाईटवर जावं लागेल

तिथे भाषा निवड केल्यानंतर आणखी काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. त्यामध्ये गाव, शहर, जिल्हा, तालुका इतर गोष्टी असतील.

त्यानंतर कोणत्या प्रकारचं रेशन कार्ड हवं आहे, ते ठरवावं लागेल

त्यानंतर कुंटुंबासंबंधित वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. त्यामध्ये कुटुंबप्रमुख, आधारकार्ड नंबर यांचा समावेश आहे.

सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करावं. त्यानंतर त्या माहितीची प्रिंट काढून स्वत:कडे ठेवावी.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752. 

परभणी जिल्ह्यातील व्यापारास एक दिवसाआड का आसेना सर्व दुकानांना मुभा द्या.....

परभणी जिल्ह्यातील व्यापारास एक दिवसाआड का आसेना सर्व दुकानांना मुभा द्या.....


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या 67 दिवसांपासून अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त छोटे-मोठे व्यवसाय पूर्णतः बंद असून त्याचा परिणाम दुकान मालकांसह नोकरदार व अन्य अभुतपुर्व अडचणीत सापडले आहेत. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने एक दिवसाआड का होईना छोटया-मोठ्या व्यवसायांना अटी व शर्तीवर परवानगी बहाल करावी, अशी मागणी महापौर सौ.अनिता रविंद्र सोनकांबळे व उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी शनिवारी (दि.30) जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांची भेट घेवून केली.
महापालिकेतंर्गत या दोघा पदाधिका-यांसह मनपा सदस्य सचिन अंबिलवादे, गुलमीर खान यांच्यासह विनोद कदम, नागनाथराव काकडे, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संपत सवणे आदीनी शनिवारी दुपारी जिल्हाधिका-यांची भेट घेतली. त्यातून एक तपशीलवार निवेदन सादर केले. त्यात कापड दुकान, चप्पल-बुट, रेडिमेड, सोनार कारागीर, जनरल स्टोअर्स, बांगडी, मोबाईल शॉपी व रेपेरिंग, घडयाळ दुरूस्ती व विक्री, भेळपुरी, पंक्चर, हॉटेल पार्सल, हेअर सलुन, क्राप, ब्युटी पार्लर, स्टेशनरी, मिठाई, फोटो स्टुडिओ, फोटो प्रेममेकर, डिस्पोजल दुकाने, क्रॉकरी, फर्निचर वगैरे दुकांनाना कमीत कमी एका दिवसाआड का होईना परवानगी बहार करावी, असे या शिष्टमंडळाने म्हटले आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752. 

Friday, May 29, 2020

अ.म.वी.लिं.शिवाचार्य महासभा कार्यकारिणी जाहीर ; सहप्रवक्तापदि अमृतेश्वर शिवाचार्य जिंतूर तर संपर्क प्रमुख काशीनाथ शिवाचार्य पाथरी यांची निवड

अ.म.वी.लिं.शिवाचार्य महासभा कार्यकारिणी जाहीर ; सहप्रवक्तापदि अमृतेश्वर शिवाचार्य जिंतूर तर संपर्क प्रमुख काशीनाथ शिवाचार्य पाथरी यांची निवड


सोनपेठ (दर्शन) :-

हजारो वर्षांपासून सर्व ऋषी मुनी देवदेवता आणि आखाडे व मठमंदीरांचे गुरुत्व असलेले वीरमाहेश्वर जंगम शिवाचार्यांची जगद्विख्यात परंपरा कश्मीर नेपाळ ते रामेश्वर श्रीलंकेपर्यंत व्यापलेली असून सर्वत्र जंगममठ जंगमवाडीमठ ते विविध मठ रूपात अविरतपणे चालू आहेत.शेकडो पिढ्यांचा इतिहास असलेल्या या वीरशैव लिंगायत संप्रदाय शिवाचार्य मठाच्या संस्था म़ंडळे परिषद व संघटना अखिल भारतीय म्हैसूर मुंबई हैद्राबाद तेलंगणा आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा प्रांत व कोकण प.महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश अशाप्रकारे विविध विभागात आपापल्या परीने कार्यरत आहेत परंतू संपूर्ण महाराष्ट्रातील शिवाचार्य एकत्र करून त्याची एक नूतन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली ...
नूतन पदाधिकारी व सदस्य पुढील प्रमाणे आहेत...

|| अखिल महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा ||
*गौरवाध्यक्ष*
खा डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य 
*मार्गदर्शक*
सिद्धलिंग शिवाचार्य साखरखेर्डा 
मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापूर 
शिवयोगी शिवाचार्य मैशाळ
शिवानंद शिवाचार्य तमलूर
पण्डिताराध्य शिवाचार्य वडांगळी
राजेश्वर शिवाचार्य मेहकर
सिद्धलिंग शिवाचार्य शिखर शिंगणापुर
*अध्यक्ष* 
डॉ विरूपाक्ष शिवाचार्य मन्मथधाम  
*उपाध्यक्ष* 
नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर
रेणुक शिवाचार्य मंद्रूप 
शंभोलिंग शिवाचार्य उदगीर
*कार्याध्यक्ष*
विरुपाक्ष शिवाचार्य मुखेड 
*सचिव* 
महादेव शिवाचार्य वाई 
*सहसचिव*
सिद्धदयाळ शिवाचार्य बेटमोगरा
शिवानंद शिवाचार्य वाळवा
*प्रवक्ता*
दिगंबर शिवाचार्य वसमत 
*सहप्रवक्ता* 
अमृतेश्वर शिवाचार्य जिंतूर 
*कोषाध्यक्ष* 
श्रीकंठ शिवाचार्य नागणसूर 
*सहकोषाध्यक्ष* 
डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य होटगी
*संपर्क प्रमुख*
काशीनाथ शिवाचार्य पाथरी
शंभूलिंग शिवाचार्य अंबाजोगाई
राचलिंग शिवाचार्य परांडकर
गुरुपादेश्वर शिवाचार्य गिरगाव
दि.29 मे 2020 शुक्रवार रोजी सर्वांची निवड झाली आहे या गुरुदेव सर्वांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752. 

Thursday, May 28, 2020

स्वातंत्रयवीर सावरकर यांच्या जंयती निमित्य जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

स्वातंत्रयवीर सावरकर यांच्या जंयती निमित्य जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
  
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जंयती निमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री.दि.म.मुगळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी, मनपा आयुक्त देवीदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, महसुल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्या सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कंन्टेनमेंट झोन सोडून अन्यत्र बाजारपेठा खुली करा - आ.डॉ.राहूल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कंन्टेनमेंट झोन सोडून अन्यत्र बाजारपेठा खुली करा - आ.डॉ.राहूल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कंन्टेनमेंट झोन वगळून अन्यत्र बाजारपेठ लवकरात लवकर सुरु करून व्यापा-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक आ.डॉ.राहूल पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी स्थानिक आमदार पाटील यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सने संवाद साधला. त्यातून मागील आठवड्यापासून परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे, हे निदर्शनास आणून दिले. सुरुवातीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी असताना तिस-या आणि चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.  जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत. परंतू मागील पंधरा दिवसांपासून मुंबई-पुणे आणि इतर मोठ्या शहरातून अनेक नागरिक आणि कामगार जिल्ह्यात परतत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात आणि ग्रामीण भागात वाढल्यचे आ.पाटील यांनी नमुद केले. सद्यस्थितीत रुग्णांचे स्वब नांदेड येथील प्रयोगशाळेकडे पाठविले जात आहे. परंतू तेथील रिपोर्ट येण्यास विलंब होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. येथील सामान्य रुग्णालयास मंजूर करण्यात आलेली प्रयोगशाळा चाचणी अवस्थेत आहे, असेही निदर्शनास आणून दिले. 27 मे पर्यंत जिल्ह्यात 67 कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळले असून एकंदरीत 171 कोरोना रुग्णांचे स्वॅबचे रिपोर्ट प्रलंबित असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752. 

आरोग्य सेतू हे भारत सरकारद्वारे विकसित डिजिटल सेवा पुरवणारे मोबाईल ॲप्लिकेशन आहे आणि कोविड १९ संबंधित आरोग्य सेवा भारताच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने बनविले आहे. भारत सरकारच्या उपक्रमांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने हे बनविले आहे, ज्यामध्ये लोकांना त्यांच्या कोविड १९ संक्रमणाच्या संभाव्य जोखीमेबाबत कळविणे आणि निरोगी राहण्यासाठी अमलात आणायच्या सर्वोत्तम पद्धती तसेच कोविड १९ महामारीशी संबंधित लागू व निवडक वैद्यकीय ॲडव्हायजरी पुरविणे याचा समावेश होतो.

भारतात पसरत चाललेल्या कोरोनाव्हायरस महामारीला रोखण्यासाठी आरोग्य सेतू आपला कॉमन ब्रिज आहे. आरोग्य सेतू हे तुम्ही सामान्य कृती करीत असताना तुम्ही ज्या व्यक्तींच्या संपर्कात आला असाल त्या सर्वांचे तपशील रेकॉर्ड करण्यास काँटॅक्ट ट्रेसिंग वापरते आणि जर त्यापैकी कोणाचेही नंतर कोविड १९ पॉझिटिव्ह म्हणून निदान झाले तर तुम्हाला कळविले जाईल आणि तुमच्यासाठी सक्रिय वैद्यकीय मदत दिली जाईल.

संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी जोखीमेची संभावना असलेल्या नागरिकांना वैद्यकीय मदत आणि ॲडव्हायजरी पुरवणे महत्त्वाचे आहे, आणि त्यातही विशेषतः लक्षणे नसलेल्या नागरिकांना म्हणजेच जे कमी प्रमाणात संक्रमित झाले असतील मात्र अद्याप त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. आरोग्य सेतू काँटॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून लवकर ओळख पटवण्यास आणि संभाव्य जोखीम रोखण्यास सक्षम करते, याचाच अर्थ तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंब व समुदायासाठी एकप्रकारे ढाल म्हणून काम करते.तसेच, जेव्हा तुम्ही तुमच्या लोकेशन माहितीसह तुमच्या लक्षणांशी तुलना करून आरोग्य सेतू ॲपवर स्वयं-मूल्यांकन चाचणी घेता तेव्हा यामुळे भारत सरकारला हॉटस्पॉट ओळखण्यास मदत मिळते, जेथे या विषाणूचा जलदगतीने होणारा प्रसार रोखता येऊ शकतो.

तुमच्या स्मार्टफोनवर आरोग्य सेतू वापरण्यासाठी तुम्हाला प्लेस्टोअर (अँड्रॉईड डिव्हाईसकरिता) आणि ॲपस्टोअर (आयओएस डिव्हाईसकरिता) येथून ॲप डाउनलोड करावे लागेल. वैकल्पिकरित्या, तुम्ही खालील लिंकवरून ॲप डाउनलोड करू शकता: https://web.swaraksha.gov.in/in/

जिओ फोन (केएआयओएस) करिताची ॲप व्हर्जन लवकरच डाउनलोडसाठी उपलब्ध होईल.

तुम्ही त्यास इंस्टॉल केल्यानंतर ॲप त्याच्या सोप्या आणि सहज ऑनबोर्डिंग प्रक्रियेमार्फत तुम्हाला नोंद करण्यास मार्गदर्शन करते. युजरला त्यांचे ब्लूटूथ ऑन ठेवण्यास आणि त्यांचे लोकेशन शेअरिंग “नेहमी” असे सेट करण्यास विनंती करण्यात येत आहे कारण आरोग्य सेतू तुमच्या व तुमच्या समुदायाच्या हितासाठी काम करते. स्क्रीन-बाय-स्क्रीन डेमोसाठी तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ .आयसीएमआर मंजूर लॅब पहा

आरोग्य सेतूची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
ब्लूटूथ वापरून ऑटोमॅटिक काँटॅक्ट ट्रेसिंग
ICMR मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वयं-मूल्यांकन चाचणी
कोविड १९ संबंधीचे अपडेट्स, ॲडव्हायजरी आणि सर्वोत्तम उपचार पद्धती
ई-पासचे संकलन
      टेलिमेडिसीन आणि व्हिडिओद्वारे सल्लामसलत सुविधा (लवकरच येत आहे)

तुमच्या फोनमध्ये असलेले आरोग्य सेतू ॲप हे तुमच्या फोनच्या ब्लूटूथ निकटतेमध्ये आलेल्या आरोग्य सेतू ॲप इंस्टॉल असलेल्या डिव्हाईसना शोधून काढते. जेव्हा हे घडते तेव्हा दोन्ही फोन वेळ, निकटता आणि कालावधीसह या संपर्काची डिजिटल सिग्नेचर सुरक्षितपणे एक्सचेंज करते. जर दुर्दैवाने तुम्ही मागील १४ दिवसांत अशा व्यक्तींच्या संपर्कात आला असाल, जी व्यक्ती कोविड १९ पॉझिटिव्ह ठरली आहे, तेव्हा ॲप तुमच्या संपर्काची नूतनता आणि निकटतेच्या आधारावर तुमच्या संक्रमणाची जोखीम कॅल्क्युलेट करते आणि तुमच्या होम स्क्रीनवर त्याप्रमाणे करावयाची समर्पक कृती दर्शविते. आवश्यकतेनुसार समर्पक वैद्यकीय उपचार मिळणेबाबत भारत सरकार तुमच्या अपडेटेड संक्रमणाच्या जोखीमेचे विश्लेषण करते.

आयसीएमआर मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वयं-मूल्यांकन चाचणी तुमच्या स्वयं-नोंद केलेली लक्षणे आणि प्रवास, वय आणि लिंग यासारख्या अन्य संबंधित माहितीच्या आधारे कोविड १९ संक्रमणाचे मूल्यांकन करते. हे मूल्यांकन ॲपवर होते आणि त्याचे निष्कर्ष तुम्हाला उत्तरोत्तर होत जाणारी संक्रमणाची उच्च संभाव्यता दर्शविणारे हिरवे, पिवळे किंवा नारंगी रंगात त्वरित कळविले जातात. जर, तुमच्या स्वयं-नोंद केलेल्या माहितीच्या आधारे, तुम्ही संक्रमित असल्याची शक्यता असते तेव्हा ॲप तुमच्या स्वयं-मूल्यांकन चाचणीचा निष्कर्ष अपलोड व शेअर करण्यास तुमची संमती मागते, जेणेकरून भारत सरकार योग्य वैद्यकीय व प्रशासकीय उपाययोजना अमलात आणेल.

प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही आरोग्य सेतू युजरच्या संपर्कात येता तेव्हा तुमचे ॲप वेळ, निकटता, लोकेशन व कालावधीसह या संपर्काची डिजिटल सिग्नेचरची नोंद करते. जर काही दिवसांनी, तुम्ही अशा व्यक्तींच्या संपर्कात आला असाल जी व्यक्ती कोविड १९ पॉझिटिव्ह ठरली आहे, तेव्हा आरोग्य सेतू अशा व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संपर्काची नूतनता आणि निकटतेच्या आधारावर तुमच्या कोविड १९ संक्रमणाची जोखीम कॅल्क्युलेट करते आणि नोटिफिकेशनमार्फत व जर आवश्यक असल्यास होम स्क्रीनवर अपडेट करण्याद्वारे तुमच्याशी संक्रमणाची जोखीम स्पष्ट करते. ही शक्यता नंतरच्या काँटॅक्ट्सच्या आधारावर सातत्याने सुधारित केली जाते. आवश्यकतेनुसार समर्पक वैद्यकीय उपचार मिळणेबाबत भारत सरकार तुमच्या अपडेटेड संक्रमणाच्या जोखीमेचे विश्लेषण करते.

होम स्क्रीनवर चार रंगात वर्गीकरण आहे, जे संक्रमणाची जोखीम स्पष्ट करते: हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल.
- हिरवा: तुमच्या स्क्रीनवरील हिरवे वर्गीकरण तुमच्या संक्रमणाची जोखीम कमी असल्याचे दर्शविते: एकतर तुम्ही कोविड १९ पॉझिटिव्ह निदान झालेल्या व्यक्तीला भेटला नाहीत किंवा स्वयं-मूल्यांकन करताना तुमच्यामध्ये कोविड १९ संबंधित कोणतीही लक्षणे व स्थिती आढळली नाहीत किंवा
-पिवळा: तुमच्या स्क्रीनवरील हिरवे वर्गीकरण तुमच्या संक्रमणाची जोखीम मध्यम असल्याचे दर्शविते:
 •तुम्ही कोविड १९ पॉझिटिव्ह निदान झालेल्या व्यक्तीला भेटला नाहीत किंवा
 • तुम्ही कोविड १९ पॉझिटिव्ह निदान झालेल्या व्यक्तीला भेटला असाल मात्र तुमचा संपर्क मर्यादित होता आणि सामाजिक अंतर राखून होता किंवा
 •स्वयं-मूल्यांकन करताना तुमच्यामध्ये कोविड १९ संबंधित स्थितीपैकी काही आढळून आले.
• नारंगी: तुमच्या स्क्रीनवरील नारंगी वर्गीकरण तुमच्या संक्रमणाची जोखीम उच्च असल्याचे दर्शविते:
 तुम्ही अलीकडेच कोविड १९ पॉझिटिव्ह निदान झालेल्या व्यक्तीला भेटला आहात किंवा
 •स्वयं-मूल्यांकन करताना तुमच्यामध्ये कोविड १९ संबंधित लक्षणे आणि/किंवा स्थिती आढळली आहे.
- लाल: तुमच्या स्क्रीनवरील लाल वर्गीकरण तुम्ही कोविड १९ पॉझिटिव्ह असल्याचे दर्शविते.

आरोग्य सेतू सध्या युजरला कोविड १९ पॉझिटिव्ह असल्याचे मार्क करण्यास अनुमती देत नाही. जेव्हा कोणाचे कोविड १९ पॉझिटिव्ह निदान झाले असेल तर चाचणी प्रयोगशाळा ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) – कोविड १९ चाचणीसाठी मध्यवर्ती सरकारी संस्था, यांच्याकडे शेअर करते. आयसीएमआर, ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस (एपीआय) मार्फत कोविड १९ पॉझिटिव्ह व्यक्तींची यादी आरोग्य सेतू सर्व्हरवर शेअर करते. जर कोविड १९ पॉझिटिव्ह निदान झालेल्या व्यक्तीकडे आरोग्य सेतू ॲप इंस्टॉल केलेले असेल तर सर्व्हर ॲप स्टेटस अपडेट करते आणि या व्यक्तीसाठी काँटॅक्ट ट्रेसिंग सुरू करते.

आरोग्य सेतू केवळ नंतरच्या काळात कोविड १९ पॉझिटिव्ह म्हणून निदान झालेल्या व्यक्तीच्या तुमच्या संपर्काच्या आधारावर संक्रमणाची शक्य जोखीम कॅल्क्युलेट करते. आरोग्य सेतू केवळ अशा व्यक्तींना कोविड १९ पॉझिटिव्ह म्हणून मार्क करते ज्याची माहितीआयसीएमआर कडून प्राप्त झालेली आहे.
जर तुमचे ॲप तुमच्या शेजारील व्यक्तीच्या ॲपसह ब्लूटूथ मार्फत कनेक्टेड असेल आणि तुमच्या शेजारील व्यक्तीचे कोविड १९ पॉझिटिव्ह म्हणून निदान झाले असेल तर आरोग्य सेतू या ब्लूटूथ कनेक्शनचे विश्लेषण करेल. शेजारील व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला जोखीम संभवते जर तुम्ही ठराविक कालावधीकरिता सामाजिक अंतराच्या (सामान्यपणे ६ फूट किंवा कमी) आत त्याच्याशी संपर्कात आला असाल. जर तुम्ही दोघेही प्रत्यक्ष संपर्कात आला नाहीत आणि तुम्ही घरातच असाल तर तुमच्या संक्रमणाची जोखीम उच्च असण्याची शक्यता कमी आहे.
जरी तुम्हाला उच्च जोखीम म्हणून मार्क केले असेल तरीही आरोग्य विभागाचे अधिकारी कोणतीही करावयाची कृती निर्दिष्ट करण्यापूर्वी तुमच्या स्थितीचे मूल्यांकन करतील आणि तुमच्या शेजारील व्यक्तीशी कोणताही प्रत्यक्ष संपर्क झाला नसून तुम्ही घरातच राहिला आहात, या बाबीची नोंद घेतील. जर तुम्हाला कोणतीही शंका असेल किंवा स्पष्टीकरण हवे असेल तर तुम्ही तुमच्या ॲपच्या होम स्क्रीनवर दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करू शकता.

आरोग्य सेतू होम स्क्रीन तुमच्या लोकेशनकरिता चार आकडेवारी दर्शविते (नोंद: हे तुमच्या फोनचे लाईव्ह लोकेशन आहे):
 · तुमच्या लोकेशनच्या १ किमी च्या परिसरातील स्वयं-मूल्यांकन चाचणी केलेल्या युजरची संख्या
  ·तुमच्या लोकेशनच्या १ किमी च्या परिसरातील कोविड १९ च्या लक्षणांपैकी एक किंवा अधिक आढळलेल्या युजरची संख्या
  ·तुमच्या लोकेशनच्या १ किमी च्या परिसरातील कोविड १९ पॉझिटिव्ह असलेल्या युजरची संख्या
 · तुमच्या लोकेशनच्या १ किमी च्या परिसरातील कोविड १९ पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींच्या थेट संपर्कात आलेल्या युजरची संख्या

आरोग्य सेतू सध्या बारा भाषांमध्ये उपलब्ध आहे: इंग्रजी, हिंदी, गुजराती, पंजाबी, तेलुगू, ओडिया, मराठी, बंगाली, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि आसामी. ॲप लवकरच भारताच्या सर्व २२ अनुसूचित भाषांमध्ये उपलब्ध होईल

सेवेच्या अटी येथे पाहू शकता ही लिंक आणि गोपनीयता धोरण येथे पाहू शकता ही लिंक.

तुम्ही प्लेस्टोअर/ ॲपस्टोअर वर कमेंट करू शकता. तुम्ही आम्हाला येथे ईमेल करू शकता: support.aarogyasetu@gov.in . आमची टीम लवकरात लवकर तुमच्या शंका रिव्ह्यू करण्यास व त्यांना प्रतिसाद देण्यास कटीबद्ध आहे.

गोपनीयता

ॲपवर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागतो. याव्यतिरिक्त, तुम्हाला तुमचे नाव, लिंग, वय, व्यवसाय, मागील ३० दिवसांत तुम्ही भेट दिलेले देश आणि गरजेनुसार स्वयंसेवी होण्याची इच्छा देखील विचारले जाते. ही माहिती आरोग्य सेतू सर्व्हरवर एन्क्रिप्ट व स्टोअर केली जाते.

जेव्हा तुम्ही पर्यायी स्वयं-मूल्यांकन चाचणीची निवड करता, तेव्हा ॲपद्वारे चाचणीकरिता तुमचा प्रतिसाद कलेक्ट केला जातो आणि तुमचे लोकेशन रेकॉर्ड करते. ही माहिती आरोग्य सेतू सर्व्हरवर एन्क्रिप्ट व स्टोअर केली जाते. जेव्हा तुमचा स्मार्टफोन ज्यावर ऑन असलेल्या मोबाईल, ब्लूटूथ आणि जीपीएस सेवेसह ॲप ॲक्टिव्ह आहे, अशा अन्य मोबाईल किंवा हँडहेल्ड डिव्हाईसच्या रेंजमध्ये येतो, तेव्हा ॲप अशा अन्य डिव्हाईसमधून अन्य युजरचा अज्ञात यूजर डिव्हाईस आयडी आणि संवाद तपशील (वेळ, कालावधी, अंतर आणि लोकेशन) कलेक्ट करते. ही माहिती तुमच्या डिव्हाईसवर एन्क्रिप्ट व स्टोअर केली जाते.

जेव्हा तुम्ही नोंदणीवेळी तुमचा मोबाईल नंबर देता त्यावेळी आरोग्य सेतू सर्व्हर अज्ञात, रँडमरित्या डिव्हाईस आयडेंडिटी नंबर (डीआयडी) नियुक्त करतो आणि तुमच्या मोबाईल नंबरशी जोडला जातो. मोबाईल नंबर आणि डीआयडी हे दोन्हीही हाय एन्क्रिप्टेड सर्व्हरमध्ये सुरक्षितरित्या स्टोअर केले जातात. तसेच नोंदणीवेळी तुम्ही पुरविलेली अन्य वैयक्तिक माहिती तुमच्या डिव्हाईसला नियुक्त केलेल्या डीआयडी शी जोडली जाते आणि ती सुरक्षितपणे सर्व्हरवर एन्क्रिप्ट व स्टोअर केली जाते.

आरोग्य सेतू अॅप इंस्टॉल केलेल्या दोन्ही डिव्हाईसमधील आणि डिव्हाईस व आरोग्य सेतू सर्व्हर यामधील भविष्याकालीन संवाद केवळ डीआयडी चा वापरून पूर्ण केला जाईल. कोणतीही वैयक्तिक माहिती भविष्यातील संभाषण किंवा व्यवहारासाठी वापरली जाणार नाही.
·नोंदणीवेळी प्रदान करण्यात आलेली वैयक्तिक माहिती तुमच्या डिव्हाईसकरिता नियुक्त डीआयडी शी जोडली जाते आणि ती सुरक्षितपणे सर्व्हरवर एन्क्रिप्ट व स्टोअर केली जाते.
·ब्लूटूथ काँटॅक्ट ट्रेसिंगकरिता दोन्ही डिव्हाईसमध्ये एक्सचेंज करण्यात येणारी माहिती केवळ डीआयडी वापरून पूर्ण केली जाईल आणि डिव्हाईसवर एन्क्रिप्ट व स्टोअर केली जाते.
·स्वयं-मूल्यांकन चाचणीचा निकाल आणि लोकेशन तुमच्या डिव्हाईसला नियुक्त डीआयडी शी जोडले जाते आणि सुरक्षितपणे सर्व्हरवर एन्क्रिप्ट व स्टोअर केले जाते.
·आरोग्य सेतू सर्व्हरमार्फत नोटिफिकेशन आणि संक्रमण जोखमीच्या अपडेट सहितची सर्व संभाषणे केवळ डीआयडी वापरून पूर्ण केली जातात.

जेव्हा तुमचे कोविड १९ करिता पॉझिटिव्ह निदान होते किंवा संक्रमणाची जोखीम अधिक असते तेव्हाच तुमच्याकरिता आवश्यक वैद्यकीय उपाययोजना करण्यासाठी नियंत्रकासह तुमच्या डीआयडी ची तुमच्या वैयक्तिक माहितीसह पुन्हा ओळख पटविली जाते.

काँटॅक्ट ट्रेसिंग हे संभाव्य गोपनीय आक्रमक तंत्रज्ञान सोल्यूशन आहे मात्र जोपर्यंत योग्य काळजी घेतली जाते तोपर्यंतच. आरोग्य सेतूने “गोपनीयतेस पहिले प्राधान्य” याचा मुख्य तत्त्व म्हणून स्वीकार केला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोविड १९ महामारीच्या प्रसाराला अटकाव घालू शकतो. सध्याच्या परिस्थितीत त्याचा वापर योग्य आहे. तथापि, या तंत्रज्ञानाच्या बाबतीत गोपनीयतेच्या दृष्टीकोनातून निर्माण झालेल्या सर्व शंका विचारात घेता, आरोग्य सेतूच्या गोपनीय वैशिष्ट्यांमध्ये वाढ करण्याचे सर्व मार्गाने प्रयत्न केले जात आहे.

आरोग्य सेतू चार मार्गाने युजरच्या गोपनीयतेला संरक्षित करते:
nbsp;a. तुम्ही नोंदणीवेळी दिेलेली वैयक्तिक माहिती अनामिक केली जाते आणि सर्व नंतरचे व्यवहार आरोग्य सेतू सर्व्हरद्वारा तुम्हाला नियुक्त केलेल्या विशिष्ट डिव्हाईस आयडेंटिफिकेशन नंबर (डीआयडी) संबंधित आहेत.
 b. डिफॉल्टद्वारे, कलेक्ट केलेली सर्व काँटॅक्ट ट्रेसिंग आणि लोकेशन माहिती तुमच्या मोबाईल डिव्हाईसवर स्टोअर केली जाते. तुमचे कोविड १९ करिता पॉझिटिव्ह निदान झाल्यास तुमची माहिती आरोग्य सेतू सर्व्हरवर अपलोड केली जाते.
 c.  सर्व काँटॅक्ट ट्रेसिंग आणि मोबाईल डिव्हाईसवर स्टोअर केलेली आणि अपलोड न केलेली माहिती आरोग्य सेतू सर्व्हरवर ३० दिवसांच्या चक्रानंतर कायमस्वरुपी डिलिट केली जाते. सर्व प्रकारचे काँटॅक्ट ट्रेसिंग आणि लोकेशन माहिती अपलोड केल्याच्या तारखेपासून ४५ दिवसानंतर तुमचे कोविड १९ करिता पॉझिटिव्ह निदान नसल्यास संपूर्ण माहिती आरोग्य सेतू सर्व्हरवरून कायमस्वरुपी डिलिट केली जाते. जर तुम्हाला संक्रमण झाल्यास तुमचे सर्व काँटॅक्ट ट्रेसिंग आणि लोकेशन डाटा तुम्ही बरे झाल्याच्या घोषणेनंतर ६० दिवसांनी आरोग्य सेतू सर्व्हरवरून डिलिट केला जातो.
 d. शिवाय, गोपनीयता धोरण ज्या हेतूंसाठी हा डाटा वापरला जाईल त्या हेतू स्पष्टपणे मर्यादित करते म्हणजेच तुम्हाला सहाय्य करणे आणि कोविड १९ विरुद्धच्या लढाईत सरकारला माहिती पुरविणे यापेक्षा अन्य काही नाही.

ही वैशिष्ट्ये व्यापकपणे स्वीकारल्या गेलेल्या गोपनीय धोरणांनुसार अनामिकीकरण, डाटा कमी करणे, हेतू व वापराच्या मर्यादा आणि डाटा धारणा तत्त्वांना कार्यान्वित करतात आणि आरोग्य सेतू युजरच्या वैयक्तिक गोपनीयतेवर वाजवी निर्बंध दर्शवितात.

तुमच्या मोबाईल डिव्हाईसमध्ये स्टोअर केलेली माहिती ॲडव्हान्स्ड एन्क्रिप्शन स्टँडर्ड (एईएस) संरक्षित आहे. तुमच्या डिव्हाईसवर स्टोअर केलेला डाटा ऑपरेटिंग सिस्टीमची की चेन वापरून एईएस एन्क्रिप्टेड आहे: अँड्रॉईडकरिता कीस्टोअर आणि आयओएस करिता कीचेन.

डिव्हाईस ते सर्व्हर आणि पुन्हा सर्व्हर ते डिव्हाईस होणारे डाटा ट्रान्समिशन हे अज्ञात, आरएसए संरक्षित आणि सुरक्षित ट्रान्समिशन केले जाते. अॅप कडून सर्व्हरला केली जाणारी प्रत्येक विनंती प्रमाणित केली जाते. एडब्ल्यूएस टूल्स आणि सर्वोत्तम जागतिक प्रणाली वापरून उर्वरित बॅक-एंड डाटा स्टोरेज एन्क्रिप्ट केला जातो.

आरोग्य सेतू टीम मानांकित शैक्षणिक संस्था, टेक ऑडिट फर्म आणि सुरक्षेच्या भेदनाच्या दृष्टीने एकाधिक इथिकल हॅकर मार्फत सिस्टीमची एंड-टू-एंड तपासणी पूर्ण करते. कार्यपद्धतीचा भाग म्हणून प्रत्येक रिलीजपूर्वी टीमकडून सुरक्षेचे ऑडिट केले जाते.

ट्रेसटूगेदर व अन्य अशा ॲप्स पेक्षा भिन्न असून आरोग्य सेतू ॲप काँटॅक्ट ट्रेसिंगसह अन्य अधिक गोष्टी करणारे ॲप आहे. भारतामध्ये लोकसंख्येची घनता अधिक आहे, त्यामुळे भारत सरकारची धारणा अशी आहे की, केवळ परस्पर संपर्कात आलेल्या युजरला ओळखणे पुरेसे नाही तर त्यांचा संक्रमित व्यक्तीचा माग घेणे देखील आवश्यक आहे. जेणेकरून रोगाचे संक्रमण झालेल्या परिसरात सॅनिटायझेशन करता येईल आणि रोगाचे संक्रमण होऊनही आरोग्य सेतू अ‍ॅपवर काँटॅक्ट म्हणून ओळखले न गेलेल्या व्यक्तींचा शोध घेता येईल.

याव्यतिरिक्त, जेव्हा तुम्ही आरोग्य सेतू अॅपवर स्वयं-मूल्यांकन चाचणीद्वारे सदृश्य लक्षणांची माहिती तुम्ही तुमच्या लोकेशनच्या माहितीसह रिपोर्ट करता, तेव्हा रोगाच्या संक्रमणाला अटकाव घालण्यासाठी संक्रमण होण्याची शक्यता अधिक असलेले हॉटस्पॉट निर्धारित करणे भारत सरकारला शक्य होईल.

या सर्व कारणांकरिता आरोग्य सेतू अॅप जीपीएस माहितीचे कलेक्ट करते.

तुमच्या मोबाईल फोनवर सर्व युनिक संपर्काची काँटॅक्ट आणि लोकेशन माहिती स्टोअर केली जाते आणि कलेक्ट केल्यापासून ३० दिवसांच्या आत क्लाउडवर अपलोड न केल्यास ती माहिती कायमस्वरुपी डिलिट होते.

जर तुमची काँटॅक्ट आणि लोकेशन माहिती आरोग्य सेतू सर्व्हरवर अपलोड केल्यास आणि ती माहिती अपलोड केल्याच्या तारखेपासून ४५ दिवसानंतर तुमचे कोविड १९ करिता पॉझिटिव्ह निदान नसल्यास संपूर्ण माहिती आरोग्य सेतू सर्व्हरवरून कायमस्वरुपी डिलिट केली जाते.

जर तुमची काँटॅक्ट आणि लोकेशन माहिती आरोग्य सेतू सर्व्हरवर अपलोड केल्यास आणि तुमचे कोविड १९ करिता पॉझिटिव्ह निदान झाल्याच्या स्थितीत तुमचा डाटा तुम्ही कोविड १९ पासून बरे झाल्याच्या घोषणेनंतर ६० दिवसांनी आरोग्य सेतू सर्व्हरवरून डिलिट केला जातो.

आरोग्य सेतू तुमची वैयक्तिक ओळख किंवा तुमची वैद्यकीय माहिती अॅपच्या अन्य युजरला किंवा सार्वजनिक स्तरावर खुली करणार नाही. कदाचित भारत सरकार योग्य वैद्यकीय आणि प्रशासकीय उपाययोजनांच्या उद्देशाने तुम्ही संपर्कात आलेल्या व्यक्तींशी तुमच्या स्थितीची माहिती न देता संपर्क साधू शकतात. तुमची माहिती आमच्यासह सुरक्षित आहे.

समस्यानिवारण

आरोग्य सेतू रुट केलेल्या/जेलब्रोकन फोनवर इंस्टॉल होऊ शकत नाही कारण या प्रकारच्या फोनमधून सुरक्षा भेदण्याची व ॲपची सुरक्षा व गोपनीयता वैशिष्ट्ये धोक्यात टाकण्याची शक्यता अधिक आहे.

जर तुमचा डिव्हाईस रुट केलेला नसेल आणि तरीही तुम्हाला हा मेसेज येत असेल तर आम्ही तुम्हाला ॲप डिलिट करण्याची, फोन रिस्टार्ट करण्याची व प्लेस्टोअर / ॲपस्टोअर मधून ॲपचे नवीनतम व्हर्जन इंस्टॉल करण्याची विनंती करतो. जर ही समस्या कायम राहिली तर कृपया आम्हाला तुमच्या मोबाईलचे मॉडेल आणि ऑपरेटिंग सिस्टीमचे व्हर्जन नमूद करून support.aarogyasetu@gov.in वर ईमेल करा.

आरोग्य सेतू केवळ भारतामध्ये वापरण्यासाठी उपलब्ध आहे. कृपया तुम्ही भारतात असूनही ॲप डाउनलोड करण्यास असमर्थ असाल तर तुमची देशाची सेटिंग्स तपासा आणि बदला.

आयओएस डिव्हाईसकरिता, देशाची सेटिंग अशा प्रकारे बदलू शकताः सेटिंग à आय-ट्यून्स & ॲप स्टोअर्स > निळ्या रंगाच्या ॲपल आयडी वर क्लिक करण्याद्वारे >ॲपल आयडी पाहा > देश आणि प्रदेश > देश किंवा प्रदेश बदला.

अँड्रॉईड डिव्हाईसकरिता, गूगल प्ले स्टोअर उघडा, टॅप करा मेन्यू > अकाउंट > देश आणि प्रोफाईल्स.आयओएस

तांत्रिक

आरोग्य सेतू हे ब्लूटूथ तंत्रज्ञानावर अवलंबून आहे, जे ॲप इंस्टॉल असलेल्या अन्य डिव्हाईससह आलेला तुमचा काँटॅक्ट शोधून काढण्यास मदत करते. सध्या, ब्लूटूथ अन्य डिव्हाईससह आलेला तुमचा जवळचा काँटॅक्ट अचूकपणे वर्तविते. जर तुम्ही त्यास ‘ऑन’ ठेवले तर सर्व वेळ तुमच्या संपर्कात येणारे काँटॅक्ट कलेक्ट करण्यास मदत होईल.

आरोग्य सेतू अ‍ॅप ब्लूटूथ लो एनर्जीचा वापर करते. या प्रकारात नगण्य बॅटरी ड्रेन होते. याशिवाय आम्ही सातत्याने डिव्हाईसची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यरत आहोत आणि पुढील अपडेट्समध्ये ही वैशिष्ट्ये दिसून येतील.

तुम्हाला तुमचे लोकेशन शेअरिंग 'नेहमी' असे ठेवण्यास सांगितले जाते, त्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत: a.   लोकेशनचे विश्लेषण करण्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही संभाव्यपणे कोविड १९ संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल; b.   भारत सरकारला अचूक माहितीच्या आधारावर सबंध भारतभरातील ज्या ठिकाणी महामारीचे हॉटस्पॉट विकसित होत असतील अशा ठिकाणी आवश्यक वैद्यकीय आणि प्रशासकीय उपाययोजना करण्यासाठी. तुमच्या डिव्हाईसवर स्टोअर केलेली किंवा आरोग्य सेतू सर्व्हरवर अपलोड केलेली सर्व लोकेशनची माहिती तुमच्या डिव्हाईस आयडी संबंधित आहे आणि तुमची वैयक्तिक माहिती नाही.

आरोग्य सेतू हे आयओएस आणि अँड्रॉईड या दोन्ही सिस्टीमच्या युजरसाठी उपलब्ध आहे. आरोग्य सेतू सध्या अँड्रॉईड ५.० आणि त्यानंतरचे व्हर्जन व आयओएस १०.३ आणि त्यानंतरचे व्हर्जन या सिस्टीमवर कार्यरत आहे. केएआयओएस करिता ॲपचे व्हर्जन लवकरच उपलब्ध होईल.

कोविड १९ करिता पॉझिटिव्ह निदान झालेल्या व्यक्तींचे सध्याचे प्रमाण पाहता भारत सरकारची धारणा आहे की स्टॅटिक डिव्हाईस आयडी वापरणे ही तातडीची चिंता नाही. जागरुकतेच्या दृष्टीने स्टॅटिक आयडी असणे ही मोठ्या प्रमाणावर चिंतेची बाब आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आणि युजरसाठी विशिष्ट काळाकरिता डायनॅमिक डिव्हाईस आयडी निर्माण करण्याची कार्यप्रणाली.

quote