परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीबाबत आवाहन
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी केला जाणार आहे . तसेच ज्या नोंदणीकृत शेतकऱ्यांनी आपला कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विकलेला असेल त्यांनी तसे संबंधित बाजार समितीस कळवावे व आपले नोंदविलेले नाव यादीमधून कमी करुन घ्यावे. ज्या नोंदणीकृत शेतकऱ्यांचा एफ.ए.क्यू दर्जाचा कापूस विक्री करणे शिल्लक आहे त्यांनी बाजार समितीने दुरध्वनीद्वारे कळविल्यानंतरच कापूस विक्रीसाठी आणावा. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, परभणी यांनी केले आहे.
नोंदीत शेतकऱ्यांनी आपल्याकडील एफ.ए.क्यू. दर्जाचा कापूस शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी बाजार समितीकडून एस.एम.एस.प्राप्त झाल्यानंतरच घेवून यावा तसेच नोंदणीकृत शेतकऱ्यांनी इतरांचा कापूस, व्यापाऱ्यांचा कापूस त्यांचे नावाने विक्री करु नये अथवा आपला 7/12 व्यापाऱ्यांना देवू नये, असे गैरप्रकार उघडकीस आल्यास संबंधिताविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल व त्यांच्या कापसाचे येणे अदा करण्यात येणार नाही. तसेच यापुढे संबंधित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था , कापूस पणन महासंघ , सी.सी.आय. यांचे ग्रेडर व बाजार समिती सचिव यांच्या समन्वयाने संबंधित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या नियंत्रणात संबंधित बाजार समिती यांचे मार्फत कापूस खरेदीसाठी दुसऱ्या दिवशी बोलविण्याकरीता ऑनलाइन नोंदणी मधील शेतकऱ्यांची यादी व संबंधित शेतकऱ्यांना टोकन दिले जातील. बाजार समित्यांमार्फत टोकन देण्यामध्ये होणारी अनियमितता खपवून घेतली जाणार नाही. असे प्रकार आढळल्यास संबंधिताविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. असेही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-


No comments:
Post a Comment