गुड न्युजः आणखीन एकास डिस्चार्ज
एकही स्वॅब प्रलंबीत नाही
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षात उपचार घेत असलेला एक रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने शनिवारी (दि.20) डिस्चार्ज देण्यात आला. त्यात शहरातील सरफराजनगर भागातील व्यक्तीचा समावेश आहे.
शनिवारी संशयितांची संख्या 2563 झाली आहे.घेण्यात आलेल्या एकूण स्वॅबची संख्या 2759 झाली असून एकूण 2537 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. शनिवारी एकही स्वॅब नांदेड येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबीत नव्हते. आतापर्यंत 80 अनिर्णायक 47 स्वॅब तपासणीस आवश्यक नसल्याचा अहवाल नांदेड प्रयोगशाळेद्वारे प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 95 रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला. 89 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला. आता रुग्णालयात अवघे 3 कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. त्यांचीही प्रकृती स्थिर आहे.

No comments:
Post a Comment