Friday, June 19, 2020

तीन दिवस प्रायोगीक तत्वावर बाजारपेठ खुल्या जिल्हा प्रशासनाचा निर्णयः आजपासूनपासून अंमलबजावणी

तीन दिवस प्रायोगीक तत्वावर बाजारपेठ खुल्या 
जिल्हा प्रशासनाचा निर्णयः आजपासूनपासून अंमलबजावणी


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर 31 मे रोजी अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात ज्या अस्थापनांना व अत्यावश्यक बाबींना सुट दिली. त्या सर्व अस्थापना व अत्यावश्यक बाबी 19 जून ते 21 जून या दरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी शुक्रवारी(दि.19) एका शुध्दीपत्रकाद्वारे म्हटले आहे. ज्या अस्थापना, दुुकाने यांना सुट दिलेली नाही. ती बंदच राहतील, असे नमुद केले आहे. 
दरम्यान, या शुध्दीपत्रकाप्रमाणे या तीन दिवसांत सर्वच दुकाने निर्धारीत केलेल्या वेळेत सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने मुभा बहाल करण्यात आली आहे. याआधी 31 मे रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार काही दुकानांना उदा-कपडा, रेडीमेड वगैरे दुकानांना वेळ व वार निहाय वेळापत्रक दिल्या गेले होते.या तीन दिवसांत त्या आदेशाप्रमाणे मुभा दिलेली दुकाने उघडी राहतील. तसेच बार, रेस्टॉरेंट, सलून, हॉटेल्स वगैरेंना प्रशासनाद्वारे पूर्णतःपरवानगी बहाल करण्यात आलेली नाही.

No comments:

Post a Comment