परभणी जिल्हा कोरोना अपडेट पुन्हा गुड न्युजः आणखीन दोघांना डिस्चार्ज ; केवळ तिन रुग्नांवर उपचार सुरु तर प्रलंबित स्वॕब 9....
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षातील कोरोनाबाधित 5 रुग्णांपैकी ब-या झालेल्या 2 रुग्णांना प्रशासनाने बुधवारी (दि.17) सर्व सोपस्कार पूर्ण करीत डिस्चार्ज दिला. त्यात गंगाखेड तालुक्यातील नागठाणा व मानवत शहरातील दत्त मंदिर परिसरातील दोघा पुरूषांचा समावेश आहे.
रूग्णालयातील संक्रमीत कक्षात आता अवघे कोरोनाबाधित 3 रुग्ण उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सा.सोनपेठ दर्शनशी बोलतांना दिली.
दरम्यान, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेकडून गेल्या 24 तासात प्राप्त 11 स्वॅबपैकी जांब येथील एका महिलेचा स्वॅब पॉझीटीव्ह आला तर 6 संशयित जणांचे स्वॅब निगेटीव्ह व 4 जणांचे स्वॅब तपासणीस आवश्यक नसल्याचा अभिप्राय नोंदविण्यात आला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बुधवारी नव्याने 5 संशयित दाखल झाले असून एकूण संशयितांची संख्या 2544 झाली आहे. बुधवारपर्यंत घेण्यात आलेल्या एकूण स्वॅबची संख्या 2740 झाली असून एकूण 2510 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले असून एकूण प्रलंबीत स्वॅबची संख्या अवघी 9 राहिली आहे. तर 80 अनिर्णायक 47 स्वॅब तपासणीस आवश्यक नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 94 रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला. 88 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला. आता रुग्णालयात अवघे "3" कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. त्यांचीही प्रकृती स्थिर आहे.


No comments:
Post a Comment