Monday, June 22, 2020

सोनपेठ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आता प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ही सुसज्ज - गट विकास अधिकारी

सोनपेठ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आता प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ही सुसज्ज - गट विकास अधिकारी 



सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणू महामारी च्या संकटामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज असावी याकरिता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. राजेश दादा विटेकर यांचे सूचनेनुसार आणि जि. प. चे  मुख्य कार्यकारी अधिकारी  बि.पि.पृथ्वीराज यांचे नाविन्यपूर्ण संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना सद्यस्थितीत आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य ग्रामपंचायतीच्या सहकार्याने 14 वित्त आयोगातून नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले.  आणि या साहित्याच्या वापरही सुरू झाला आहे. 
   याच धर्तीवर सोनपेठ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ही सुसज्ज असावे , आहे त्या ठिकाणीच १००% संस्थात्मक प्रसूती सुलभ व्हावी, लहान बाळांचे आरोग्य संबंधाने आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध असावे,याकरिता पंचायत समिती स्तरावरुन ज्या ठिकाणी उपकेंद्र आहे अशा ग्रामपंचायतींना संबंधित वैद्यकीय साहित्याच्या उपलब्ध  करिता आवाहन करण्यात आले होते.  या आवाहनास तलुक्‍यातील नऊ आरोग्य उपकेंद्राच्या सर्वच नऊ ग्रामपंचायतीने सरपंच महोदयांनी,  ग्रामसेवक बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपकेंद्र करिता काय साहित्य आवश्यक आहे , याची तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कडून यादी बनवत उपकेंद्रा करिता सदर साहित्य उपलब्ध करून घेण्यात आले आहे . 
 कोरोना महामारी च्या धर्तीवर तालुक्याच्या  ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळता यावी आणि रुग्णांवर किमान प्राथमिक उपचार आहे त्याच ठिकाणी व्हावेत या बाबी आता या उपलब्ध झालेल्या वैद्यकीय साहित्याच्या माध्यमातून शक्य होणार आहेत . सदर ग्रामपंचायतीची नावे आवलगाव,  दिघोळ ,नरवाडी,  खडका, कान्हे, धामोनी , उखळी बु.,  लासीना, शिर्शी आहेत. 
  याकरिता सर्व संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्व संबंधित ग्रामसेवक यांचे पंचायत समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आभार. 
    सदर उपलब्ध झालेले साहित्य हे नियमित वापरात राहील याबाबत संबंधित उपकेंद्राचे कर्मचारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.


No comments:

Post a Comment