चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या पुतळ्याचे परभणीत दहन
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
भारत-चीन सीमेलगत गलवाऩ खो-यात चीनच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा परभणीतील ब्राम्हण समाजाच्या संतप्त युवकांनी बुधवारी (दि.17) सायंकाळी चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतळ्याचे दहन करीत तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.
चीन मधून प्रसारित झालेल्या कोरोना विषाणूमुळे सर्व जग कोरोनाविरूध्दच्या संघर्षात त्रस्त असतांना असताना चीनने लडाखच्या गलवान खोर्यात सोमवारी मध्यरात्री सीमा रेषेजवळ असलेल्या भारतीय जवानांच्या सोबत झटापट केली त्यात भारतीय जवान शहीद झाले. त्याचे पडसाद परभणीत देखील उमटले. विद्या नगर भागातील चौकात संतप्त युवकांनी एकत्र येवून चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या पुतळ्याचे दहन केले. तसेच सरकारने चीनला कठोर प्रतिउत्तर द्यावे, याचा बदला घ्यावा अशी मागणी करीत चिनी मालावर सर्वांनी बहिष्कार टाकून चीनला धडा शिकवावा, असे आवाहन केले.



No comments:
Post a Comment