परभणी जिल्हा परिषद कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संपन्न
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे आयोजीत करण्यात आली होती. या सभेमध्ये जिल्ह्यातील महत्वपूर्ण विकास कामांसह निविदांना मंजुरी बहाल करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये असलेल्या निजामकालीन शाळांचा प्रश्न खूप दिवसांपासून रखडलेला होता. यामधील १३ निजामकालीन शाळांच्या बांधकामासाठी प्रत्येकी १ कोटी ३१ लक्ष रुपयांची तरतूद या सभेमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर आसेगाव येथील आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली.तसेच जिल्ह्यामध्ये नवीन १२ आरोग्य उपकेंद्रांना देखील मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडीसंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या कडून सुचवण्यात आलेल्या संकल्पनेवर चर्चा करण्यात आली व लवकरच ती आमलात आणल्या जाईल. ही सभा अध्यक्षा श्रीमती.निर्मलाताई विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. या सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज, जि.प.उपाध्यक्ष अजय चौधरी सभापती सौ.मीराताई टेंगसे, सभापती सौ.शोभाताई घाटगे, सभापती सौ.अंजली आनेराव, सभापती रामराव उबाळे यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा सचिव सौ.मंजुषा जाधव-कापसे, मुख्यलेखा व वित्त अधिकारी ज्योती भोंडे यांच्यासह अन्य विभागप्रमुख हजर होते.




No comments:
Post a Comment