जिल्ह्यातील पशुपालकांनी अर्ज करावेत
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
सन 2020-21 मध्ये “ राज्यातील गाई म्हशीची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्व समावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम' या योजनेत सहभागी होण्याकरीता पशुपालकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज दि. 16 ते 30 जून 2020 या कालावधीत सादर करावेत. तरी सर्व शेतकरी बांधव व पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधून जातीवंत गायी व म्हशींचे अर्ज भरून द्यावेत. असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , परभणी यांनी केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment