खालील महात्मा बसवेश्वरांची वचने वाचुन अध्ययन करावे
*_महात्मा बसवेश्वर धर्मसंस्थापक का नाही ते ?_*
👇👇👇👇👇👇
जय शिवा जय शिवा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शिवा संघटनेच्या शिवा मावळ्यांनी तसेच सर्व वीरशैव-लिंगायत बंधुभगिनींनी या खालील २७ म.बसवेश्वरांचे वचनाचा अभ्यास करावा,मगच समजेल खरे सत्य काय आहे ते!
महात्मा बसवेश्वरांची संकल्पना वेगळ्या धर्माची होती का ?
महात्मा बसवेश्वरांचा ईश्वर प्राप्तीचा कोणता मार्गहोता?
महात्मा बसवेश्वरांनी कोणता महामंत्र अंगिकारीला ?
महात्मा बसवेश्वरांनी पुरातन धर्मशास्त्रे नाकारली का ?
महात्मा बसवेश्वरांनी कोणत्या शास्त्राधावर वचने लिहिली ? का नवीन धर्म शिक्षण पध्दत तयार केली?
वचनातुन पुरातन धर्मशास्त्रावर का टिका केली ?
अश्या बर्याच प्रश्नांची उत्तरे या खालील महात्मा बसवेश्वरांचे वचनातुन मिळतील तरी खाली दिलेली वचने शांततेने अभ्यासावी
काही मंडळी आपली दिशाभुल करीत आहे म्हणुनच हि वचने या ठिकाणी देत आहे.
सांगासांगी ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष महात्मा बसवेश्वरांची वचनेच अभ्यासा आणि यातील संदर्भ आपल्या महात्मा बसवेश्वर जयंती लेखात नोंदवा आणि सत्य जगासमोर आणावे.
शिवा संघटना हि सत्याचेच समर्थन करीत असते हे विसरू नका........
चला तर मग अभ्यास करु....
🌹१) *महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*दगडात सोने आहे, झाडात अग्नी आहे,*
*दुधात तुप आहे,अंतरंगात परशिव आहे.*
*हे सर्व असता अंधकार दिसायला नको आहे*
*पण हे कुडलसंगमदेवा, दाखवणारा गुरुच नाही.*
येथे महात्मा बसवेश्वर यांनी मानवी शरीरार्तंगत जीवातील शिवाचे , महाप्रभुचे अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी त्याची अनुभूती येण्यासाठी योग्य अशाच गुरुची आवश्यकता असते आणि गुरूपण शिवस्वरुपच हवा तरच तो आपल्या अंर्तमनातील शिवाची ओळख आपल्याला करुन देऊ शकतो असे आपल्या वरील (१)वचनातुन शिकवण दिली .
आणि याची प्रचिती महात्मा बसवेश्वरांनी कुडलसंगमक्षेत्रातील शिवस्वरूप गुरु ईशान्यदेव यांचे कडुन इष्टलिंग दिक्षा घेतल्यानंतर अनुभवली तेथेच त्यांना अंर्तमनातील परमात्म्या शिवाची खरी ओळख झाली . त्यांनी स्वतः आपल्या या खालील (२) वचनातुन ते स्पष्टपणे मांडले आहे श्री गुरुदेवांनीच इष्टलिंग महात्मा बसवेश्वरांचे तळहातावर दिल्याचे स्पष्टपणे केले आहे.
आणि योग्य गूरुशिवाय अर्तंमनातील शिवाची ओळख होऊ शकत नाही हे वरील (१) वचनातुन स्पष्ट केले आहे.
🌹२) *महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
अंतरंगातील निराकार लिंग साकार करूनी ,
*श्री गुरूदेवांनी करस्थली प्रदान केले इष्टलिंग* अंतरंगी व्याप्त होऊनी, अंतरंगेद्रिये किरणे बनुनी ,प्रकाशित चिदंशच प्राणलिंंग;ते मुल चैतन्यच भावलिंग ;जाणुनी , पाहूनी, भाव परीपूर्ण होऊनी ,अखंड परिपूर्ण सत्य तुम्हीच *कुडलसंगमदेवा.*
🌹३) *महात्मा बसवण्णाचे वचन*
*गुरुवचनाविना लिंग हे लिंग म्हणवुन घेणार नाही.*
*गुरुवचनाविना नित्य हे सत्य म्हणवून होणार नाही.*
*गुरुवचनाविना नित्य नेम साध्य होणार नाही.*
*रुंडरहित कबंधाचा पट्टाभिषेक करणाऱ्या उभयभ्रष्टांना*
*कसा संप्रीत होईल आमचा कुडलसंगमदेव ?*
महात्मा बसवेश्वरांनी या वरील(३) वचनातुन सत्य मांडले आहे जर आपणच बाजारातुन लिंग आणुन गळ्यात बांधले तर ते फक्त बाहेरुन दिसणार्यांना लिंग दिसेल पण त्यातुन अंर्तमनातील शिवाची ओळख करून देण्याचे तंत्र हे माहित नसल्यामुळे ती फक्त शोभेच्या वस्तुसमानच दिखावु राहील त्याची कितीही पुजा केली तर ते मुडके नसलेल्या धडास अभिषेक केल्यासमानच होय म्हणुनच जोपर्यंत गुरुपदेश होत नाही आणि शिवस्वरूप गुरुचे हस्ते आपल्या करस्थळी इष्टलिंग प्रदान (लिंगधारणा)होत नाही तोपर्यंत त्यातुन अंर्तमनातील शिवाची अनुभूती होणार नाही .
🌹४) *महात्मा बसवण्णाचे वचन*
*ओम नमःशिवाय हाचि पंचाक्षरी मंत्र*
*जप अहोरात्र, चालु द्यावा*
*गुरूमंत्र भस्म, चर्चुंनिया भाळी*
*न मिटी कदाकाळी, व्हावे ऐसे*
*मन चरणी वचना,असावी नम्रता*
*अनुभव तत्वता ,ऐक्यासाठी*
*शरण आलो' ध्वनी, येई माझ्या कानी*
*'*नम्र होय'म्हणी. इष्टलिंग*
*गुरूमंत्र दिक्षा,ललाट लिखित*
*अमिट हे सत्य ,कुडलसंगमदेवा.*
या वरील (४)वचनातुन महात्मा बसवेश्वरांनी जी शिकवण अथवा जे गुरुदेवाकडुन विधीवत लिंगदिक्षा घेऊन पंचाक्षरी शिवमंत्राद्वारे प्रत्यक्षात आलेले अनुभव मांडले.----
गुरुमंत्र दिक्षा घेऊन, पंचाक्षरी मंत्राद्वारे सिध्द केलेली विभुती म्हणजेच ओम नमःशिवाय मंत्रोच्चार करून सिध्द विभूती ललाटी चर्चिल्यानंतर ते ललाट लिखित मंत्रयुक्त भस्म कधीही मिटवू नये.अर्थात सद्गुरु कडून इष्टलिंग दिक्षा आणि मंत्रदिक्षा घेतल्यानंतर मध्येच खंड पडु न देता नित्योनेमोपचार करीत शिवानुभव प्राप्त करीत रहावे. वरील नेमाचारात शिखर गाठलेले महात्मा बसवेश्वर आपला अनुभव सांगताना म्हणतात "हे कुडलसंगमदेवा!*(परमेश्वरा)गुरूमंत्ररुपी भाळी* *चर्चिलेल्या विभुती भस्मातुन व ह्र्युदयावरील इष्टलिंगातुन 'शरण ये' ऐसा ध्वनी अहर्निश माझ्या कानी येत आहे.म्हणून गुरूमंत्र दिक्षा व विभुती भस्म हेच माझे ललाट लिखित होत .विधीलिखीत इत्यादी मला मान्य नाही.*
🌹५) *महात्मा बसवण्णाचे वचन* ___
हाय हाय मानवा,वेद आगम शास्त्र , पुराण तर्क तंत्र इतिहास ।
पठण करुनी काय,गाऊनी तरी
षडाक्षरी शिवाय, व्यर्थ होय ।।
*ॐ नमः शिवाय*,षडाक्षरी मंत्र, जात हेची तंत्र मजलागी ।
कुडलसंगमदेवा तुझे नामस्मरण तंत्र, मंत्र जाण साठियले ।।
या वरील (५)वचनातुन महात्मा बसवेश्वरांनी आपले दिक्षागुरु तसेच कुलगुरु ईशान्य देव यांचे आश्रमात आगम, वेदोपनिषधे , पुराण इतर विविध शास्त्राचा गुरुदेवाचे मार्गदर्शनात सखोल अध्ययन केले पण गुरुमंत्रातुन म्हणजेच ओम नमः शिवाय या षडाक्षरी शिवमंत्रातुन जी त्यांची अंर्तंत्म्याची ,अर्तमनाची शुध्दी झाली ,जीव शिवाचे मिलन झाले खरे आत्मज्ञान त्यांना याच षडाक्षरीतुन झाले म्हणुनच त्यांची सकल मानव जातीला दिलेल्या संदेशातुन वेद आगम शास्त्र , पुराण तर्क तंत्र इतिहास यात आत्मशुध्दी होऊन जीवा शिवाचे मिलन , लिंगांगसमरस्य होण्याचे परिपूर्ण ज्ञान नसुन ते फक्त षडाक्षरी ओम नमःशिवाय याच बीजमंत्रातच असल्याचे आपल्या स्वनुभवातुन सांगितले . या वचनातुन *शरणसंस्कृतीचा मुळमंत्र हा ओम नमःशिवाय हाच षडाक्षरी महामंत्र असल्याची ठाम भूमिका मांडुन ईतर मंत्र सर्व व्यर्थ असल्याचीपण अप्रत्यक्ष शिकवण यातुन शिवभक्त इष्टलिंधारी समुदायास मिळते*.
🌹६) *महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇👇
*महादेव ज्यांचा आदिपुरुष आहे,*
*पुरातन ज्यांचा परिवार आहे,*
*त्या घरात जन्मलेला मातंगीपुत्र मी असे देवा.*
*विटाळ माझे नष्ट केले,जातिसुतक नष्ट केले*
*असा मातंगपुत्र असे मी देवा.*
*सर्पभुषण कुडलसंगमदेवा,*
*चेनय्या माझ्या पणजोबाच्या,*
*आजोबाचे वडील असती देवा.*
या वरील (६) वचनातुन महात्मा बसवेश्वरांनी परमात्मा देवाचा देव महादेव हाच आपला आदीपुरुष असल्याची स्पष्टपणे ग्वाही दिली असून त्याचा परिवार हा प्राचीन आहे म्हणजेच शिवसंस्कृती ,शिवपरिवार हा युगायुगाचा असुन याच परिवारात जन्म झालेला हा जातविरहीत होऊन तो शिवस्वरूप असतो आणि या अश्या शिवपरिवारात जन्मलेल्या शिवभक्त मातंगीचा मी पुत्र आहे हे, *सर्पभुषण कुडलसंगमदेवा , असे विचार देऊन समस्त शिवभक्तांमधे समानतेचा संदेश दिला आणि याच वचनात महात्मा बसवेश्वरांनी सर्पभुषण हा शब्द *परमात्मा महादेवास म्हणजेच आपले आराध्य दैवत यांना स्मरुन उल्लेखलेला आहे* हे विसरता येणार नाही. याच वचनात त्यांनी आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले शिवभक्त मदार चेनय्या यांना आपल्या पंजोबाच्या वडिल समान असल्याचे संबोधिले .
या वचनातुन महात्मा बसवण्णांचे शिकवणीतील , विचारधारेतील एक अत्यंत महात्वाचा धार्मिक पाया दिसुन स्पष्टपणे दिसुन येतो तो म्हणजे *महात्मा बसवण्णांनी अतीप्राचीन शिवसंस्कृतीला , शिवाचाराला उजाळा दिला पण कोणत्याही नवीन देवतेची वा दैवताची संकल्पना मांडलेली नाही आणि म्हणुनच महात्मा बसवेश्वरांना धर्मसंस्थापक म्हणता येणार नाही हे स्पष्ट होते.*
🌹 *७)महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*समुद्रासी म्हणू कैसे थोर*
*तो दडे धरणीवर !*
*धरणीस कैसे म्हणू घन ?*
*ती वसे नागेंद्राचे फणीवर !*
*नागेंद्रास कसा म्हणू घन ?*
*तो पार्वतीच्या करंगळीची आंगुठी सान !*
*पार्वतीस कैसे म्हणू थोर ?*
*ती असे परमेश्वराची नार !*
*परमेश्वरास कैसे म्हणू घन ?*
*तो कुडलसंगम शरणांच्या अग्रभागीलीन !*
या वरील (७) वचनातुन महात्मा बसवण्णांनी परमेश्वर भक्ताची महानता वर्णन केलेली ती पुढील प्रमाणे
समुंद्रा कसा महान तो तर भुमीच्याच्या सहारा घेऊन आहे , भुमी पण कशी काय महान ती तर नागाच्या फण्यावर विराजीत आहे नाग कसा महान तो तर माता पार्वतीच्या करंगळीतील अंगठी होऊन शोभा वाढवित आहे ,माता पार्वती कशी महान ती तर कुडलसंगम देवाची ( परमेश्वर महादेव) अर्धांगिनी शोभे , कुडलसंगम देव ( परमेश्वर महादेव) कसे महान तो तर शिवभक्तांच्या समोर लीन !
महात्मा बसवेश्वरांनी या वरील(७) वचनातुन आपले श्रध्दास्थान कुडलसंगमदेवा ची अर्धांगिनी माता पार्वतीस संबोधिले आहे यावरुन एक सप्रमाण सिद्ध होते कि महात्मा बसवेश्वरांचे दैवत पुरातनच शिवपार्वतीच आहे दुसर्या कोणत्याही देवाची संकल्पना महात्मा बसवेश्वरांनी मांडली नाही वा मान्य केली नाही म्हणुनच महात्मा बसवेश्वरांचे शिकवणीतील धर्मसंस्कृती हि पुरातनच शिवसंस्कृतीच होती. नवीन कोणतीही धर्मसंस्कृती महात्मा बसवेश्वरांनी अनुभवमंडपातुन वा आपल्या वचनसाहित्यातुन जनसामान्यांना शिकवलेली नाही हे स्पष्ट होते.
🌹 *८)महात्मा बसवण्णांचे वचन*
👇👇👇👇👇👇
*भक्तिसी बघुनी जोडी जो हात,*
*तोच खरा भक्त जाण या जगी !*
*मृदुवाणितचि असे सारे जप!*
*मृदुवचनि असे सारे तप !*
*सदविनयाने सदाशिवाची होई करुणा,*
*कुडलसंगमेशासी न रुचे याविना !*
या वचनात (८) महात्मा बसवण्णांनी परमात्मा सदाशिवाची कृपा होण्याचे मर्म सांगितले आहे ते पुढप्रमाणे....
शिवभक्ताला पाहुन जो आदरयुक्त भावनेने हात जोडुन त्याचा सम्मान करतो तोच खरा या भुमीवरील शिवभक्त ,जो आपल्या मधुर बोलण्यातुन सदैव जप करीत असेल आणि ज्याचे मधुर वचनात तपोसाधना विराजित असेल अशाच विनयशील शिवभक्तावर परमात्मा सदाशिवाची सदैव कृपादृष्टि असते याशिवाय इतर काहीही कुडलसंगमदेवाला आवडणार नाही.
आता या वचनात शिवाचे पर्यायी नाम सदाशिव लिखीत आहे जर *महात्मा बसवेश्वर स्वतः आपल्या विवीध वचनातुनच महादेव , सदाशिव ,पार्वती ,शंकर,पशुपती ,जगदीश असे एकाच पुरातन शिवतत्वाशी , शिवसंस्कृतीशी परमात्मा शिवाशी संबधीत , शिवपरिवारातील नावे येत असेल तर महात्मा बसवेश्वरांना नवीन धर्माचे पुरस्कर्ता कसे म्हणता येईल ?*
हा १२ व्या शतकातील नवीन धर्म नसुन बसवपुर्वकालीन पुरातनच,शिवधर्माची शिवाचाराची उजळणी आहे .
🌹 *९)महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇👇
*मन माझे न धावे सौरावैरा !*
*हे कथितो मी शपथेवर शंकरा !*
*पर सतीस मानितो मी महादेवी,*
*देवा कुडलसंगमनाथ,*
*वाहतो तुमच्या प्रथमगणांची शपथ !*
या वरील (९) वचनातुन महात्मा बसवेश्वरांनी कुडलसंगमदेवाच्या म्हणजेच शिवाच्या ( महादेवाच्या) प्रथम शिवगणांची शपथ घेऊन आपल्या निस्सीम शिवभक्तीचा एकनिष्ठ पणा दर्शविला यातुन महात्मा बसवेश्वरांनी आपले अंर्तमनातील सत्य प्रगट केले ते असे...
माझे मन हे कोठेच सैरावैरा न धावता न भरकटता सदैव तुझ्या भक्तीतच रमलेले असते , हे मी हे शपथेवर सांगतो शंकरा !, परस्त्री ला मी माता महादेवी (माता पार्वती) समानच मानतो देवा कुडलसंगमनाथा हे मी तुझ्या मुख्य गणाधिशाची म्हणजेच नंदिकेश्वराची शपथ घेऊन सांगतो असे मोठ्या विनयशिलपणे महात्मा बसवेश्वरांनी आपले मन कुडलसंगमदेवा समोर प्रगट केले ,आपल्या मनातील सत्य सांगितले.
🌹 *१०)महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*ब्रम्हपदवीची मज नको देवा आशा !*
*विष्णुपदावी मज नको ईशा !*
*रुद्रपदवी मज कशाला देवेशा ?*
*अन्य पदवी मज नको जगदीशा !*
*कुडलसंगा तव भक्तांची सेवा मज द्यावी !*
*त्यातच घडे मज महा पदवी !*
या वरील (१०) वचनातुन महात्मा बसवेश्वर परमेश्वर जगदिशाला एक साकडे घालतात....
देवा ,मला तुझ्याकडून ब्रम्ह पदाची आशा नाही ,
देवा , माझे मनी विष्णु पदाची ईच्छा नाही ,
देवा ,मला रुद्रपद कशासाठी ?
मला अन्य कोणतेही पद नको *जगदीशा !* ,
कुडलसंगमदेवा मला फक्त तुझ्या शिवभक्तांच्या सेवेतुनच महापदवी प्राप्त होणार .
या वचनात *महात्मा बसवेश्वर परमात्मा शिवास म्हणजेच जगदीशा कडे वरील वचनातुन शिवभक्तांची सेवा करण्याची मागणी करतात*
🌹 *११)महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇
*महात्मा बसवण्णाचे*
*सर्वात सुंदर वचन*
👇👇👇👇👇👇
*स्वामी नीनु ,शाश्र्वत नीनु,*
*एत्तिदे बिरिद जगवेल्लरियलु,*
*महादेव , महादेव ,*
*इल्लिंद मे$ले शब्दविल्ल.*
*पशुपती जगक्के$को$द्$व*
*स्वर्ग मर्त्य पाताळदोळगे*
*ओब्बने$ दे$व कुडलसंगमदेव.*
प्रभो ,तुच या जगताचा मालक आहेस . तु अविनाशी अक्षय . तुझ्यामुळेच या विश्र्वाचे अस्तित्व.
*देवाधिदेवा ! ' *महादेव , महादेव '* यानंतर शब्दच नाही. तुझे माहात्म्य वर्णनास आमचे जवळ शब्दच नाहीत.अखिल जीव जगताचा तुच एकटा पालनकर्ता आहेस म्हणुन तुला *पशुपती* म्हणतात.जगचैतन्याचा तु जनिता महादेवा हे चैतन्यरुप प्रभो , तीनही लोकांना भरुन उरलेल्या माझ्या देवा कुडलसंगमदेवा , !
या वरील (११) वचनातुन महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला आलेल्या अनुभूतीतुन अगदी छोट्याशा वचन शब्दरचनेतुन पशुपती महादेवाची महानता ,व्याप्ती सांगलेली आहे .
थोडक्यात महादेव,पशुपती हा संपूर्ण जगाचा ,ब्रम्हांडाचा अधिपती असुन तो सर्वत्र व्यापलेला असुन तो अविनाशी ,अक्षय आहे.
🌹*१२)महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇
*भवरोगवैद्य म्हणुनी मी तुम्हा शरणागत,*
*भक्तीप्रदायक तुम्ही, करुणा करा लिंगतात.*
*जय जय श्री महादेव,जय जय श्री महादेव,*
*जय जय श्री महादेव ,ऐसे जपताहे माझे मन,*
*कुडलसंगमदेवा, तुझ्याठायी शरणागत माझे मन.*
देवा, षडरीपुंचे तुम्ही वैद्य आहात मी तुम्हाला शरण आलो आहे .भक्तीमार्गाने प्रसन्न होणार्या लिंगदेवा माझ्यावर कृपा करा.
जय जय श्री महादेव,जय जय श्री महादेव ,जय जय श्री महादेव या तुझ्याच नावाचा जप माझे मानात सुरू आहे ,कुडलसंगमदेवा.
माझे मन सदानकदा तुझ्यातच लिन झाले आहे. महात्मा बसवेश्वरांचे मन त्यांचे आराध्य दैवत ,आदीपुरुष शिवाच्याच जय जय श्री महादेव,जय जय श्री महादेव ,जय जय श्री महादेव नावाचा सदैव जप करीत असते.
🌹 *१३)महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*जप,तप,नित्य नेम हाचि हाचि बोध मजलागी.*
*रे शिवा ,तुझे नामचि मंत्र तंत्र मजलागी.*
*कुडलसंगा,तव नाम कामधेनु मजलागी.*
हे शिवा नावातच मला जप,तप नित्य ,नेम हाच उपदेश आहे तुझे नावच तंत्र,मंत्र सर्व काही मला देवुन जाते,कुडलसंगमदेवा. माझी मनोकामना पुर्ण करणारा तुच आहे देवा ज्याप्रमाणे कामधेनु मागणार्यांच्या सर्व इच्छा पुर्ण करीत असे त्याच प्रमाणे तु पण माझ्या मनोवांछित इच्छा पुर्णत्वास नेतो.
🌹 *१४)महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*माझ्या मनी नाही वाव आणिकासी,*
*ओम नमःशिवाय, ओम नमःशिवाय,*
*हाचि मंत्र नि हाचि जप मजसी.*
*कुडलसंगमदेवा, शेष तुच जाणसी.*
देवा ,माझ्या मनात तुझ्या भक्ती शिवाय इतरांचे भक्तीसाठी जागाच नाही आहे. माझे रोमरोम ओम नमःशिवाय याच मंत्राचा सदानकदा जप करीत असते ओम नमःशिवाय हाच माझा मंत्र आहे आणि याचाच जप सदोदित माझे अंर्तमनात सुरू असतो,कुडलसंगमदेवा .हे फक्त तुच जाणतो.
या महात्मा बसवेश्वरांचे वचनातुन ओम नमःशिवाय हाच षडाक्षरी मंत्र परमात्मा शिवमार्गकडे नेणारा असल्याची शिकवण देण्यात आली आहे. याशिवाय कोणताही दुसरा मंत्र त्यांना मान्य केलेला नाही , अंगिकारण्यास सांगितले नाही.
🌹 *१५)महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*नर -काननी मज सान राघु बनवा,*
*करुनी पालन `शिव शिव' बोल पढवा ;*
*भक्तीच्या पिंजर्यात सुखरूप ठवोनी*
*मज साभाळावे बा कुडलसंगमदेवा.*
या वरील (१६) वचनातुन महात्मा बसवेश्वरांनी आपले आराध्य दैवत शिवस्वरूप कुडलसंगमदेवास विनवणी केली ,देवा मला तुमच्या ह्र्युदयातील अंर्तमनाच्या पिजर्यात जागा देऊन माझे मुखातुन पढवलेल्या पिंजर्यातील पोपटाप्रमाणे शिव शिव बोलणे शिकवा तुमच्या अंर्तमनातील भक्तीच्या पिंजर्यात मला जागा देऊन मला सुखरुप ठेव ,माझा सांभाळ कर कुडलसंगमदेवा
या वचनातुन महात्मा बसवेश्वरांनी त्यांचे ध्यानी,मनी शिवाचेच नामस्मरण असावे अशी भक्तीभावाची विनवणी आपल्या कुडलसंगमदेवा कडे केली आहे .
🌹 *१६)महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*जगती मज घातले जन्मास जसे,*
*हरा,चालवावे शिवपथावरी तसे.*
*पथभ्रमित मी ,मजला दावा सुपथ,*
*हात सोडिता होई तुमचेच हसे.*
*शरणगण हो,आइका मम आर्तस्वर ,*
*सताविती पहा मज कुडलसंगमेश्वर.*
देवा,जसे या जगात मला तु जन्मास घातले पण माझी बुद्धी स्थीर नसुन ती इकडेतिकडे भरकटत आहे या माझ्या भ्रमित बुध्दीला , मनाला तुच सन्मार्ग दाखव देवा जर तुम्ही मला तुमच्या पासुन दुर ठेवून असेच इतरत्र भरकटत ठेवले तर तुमचेच हसे होईल पहा शरणांनो माझी कळवळीची आर्त विनवणी हा माझा कुडलसंगमदेवा मला कसा सतावत आहे त्याचे सत्यस्वरुप दाखविण्यासाठी !
🌹 *१७)महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*मजलागी तव आठवचि उदय,*
*मजसाठी तव विसरचि अस्त.*
*मजलागी तव स्मरणचि जीवन,*
*मजसाठी तव स्मरणचि प्राण.*
*ह्रदयी तव चरणमुद्रा उमठवा,*
*आणिक ओठांवरी षडक्षरी लिहा,*
*अगा मायबापा,कुडलसंगमदेवा.*
या वरील (१८)व्या वचनातुन महात्मा बसवेश्वरांनी परमात्मा शिवात एकरुप होण्याचे लक्षण सांगितली आहेत ...
प्रत्येक दिवशी तुझेच नामस्मरणात राहो हेच माझ्या जीवनातील अंतिम ध्येय आहे हाच माझे जीवनाचा उषःकाल आहे, तुझ्या नामस्मरणाने माझे अंर्तमन प्रकाशमान होऊन तुझ्यात तेजोमय रुपात एकरुप होते त्यातच मला धन्याता वाटते
तुझे नामस्मरण विसल्यास माझे जीवन अंधकारमय आहे,देवा .
तुझे नामस्मरणाच माझे प्राण आहे माझ्या अंर्तमनात तुमचाच निवास असावा आणि माझे मुखात ,ओठांवरी तुमच्याच षडाक्षरी नामाचा जप असावा. अहो माझे मायबाप कुडलसंगमदेवा. यातुन महात्मा बसवेश्वरांनी परमात्मा शिवाला आपलेसे करण्यासाठी एक शिकवण दिली आहे ती म्हणजे मुखातुन ओम नमःशिवाय या जपाचे निरंतर उच्चारण करत राहणे आणि आपल्या अंर्तमनात शिवाची प्रतिमा हि निरंतर वास करुन रहावी यातुनच आपल्याला शिवरुप प्राप्त होऊ शकते.
🌹 *१८) महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*सुपाच्या कोपर्यात राहणार्या क्षुद्र देवतेला*
*बळी दिला बकरीचा म्हणून थय थय नाचतात,*
*बकरी मरुन रक्षण करणार का,*
*शिवाचा कोप झालेल्यांचे ?*
*बकरी नको ,कोकरु नको,*
*फक्त बेलपत्र आणुन न विसरता*
*पुजा कर आमच्या कुडलसंगमदेवाची*
गावाचे कोपर्यात राहणाऱ्या क्षुद्र देवतांचे नावे बळी दिललाम्हणुन त्या प्रसन्न होऊन आनंदाने नाचतात पण शिवाचा प्रकोप झाल्यास बकरी मारुन तुमचे रक्षण होईल का ? नाही त्या परमात्मा शिवाला ना बकरीची लालसा आहे ना कोकराची फक्त बेलपत्र न विसरता पुजा करा माझे कुडलसंगमदेवाची त्यामुळे तो सत्वर प्रसन्न होईल असे महात्मा बसवेश्वर आपल्या वचनातुन एका बेलाच्या पानचा भुकेला परमात्मा असल्याचे सांगतात ना त्यास धन ना बळी फक्त त्यास प्रिय असलेले बेलपत्रच प्रसन्न करु शकते.
🌹 *१९) महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇👇
*कितीक वाचले तरी काय?*
*कितीक ऐकले तरी काय ?*
*चर्तुवेद तोंडपाठ झाले तरी काय ?*
*लिंगार्चनविहीन झाल्यास, शिवशिवा,*
*तयासी ब्राह्मण म्हणावे का ?*
*म्हणता न येई.*
*'जन्मना जायते शूद्र: कर्मणा द्वीज उच्चते ।*
*श्रुतेन श्रोचियश्चैव ब्रम्ह चरति ब्राह्मण:।।'*
*या कारणे,*
*'ब्रम्हनास्ति श्वपचरधम' म्हणुनी,*
*या कारणे कुडलसंगमदेवा,*
*'वेदभार भराक्रांता ब्राम्हणा:गर्दभा म्हणेन.*
कितीपण धर्मशास्त्राचे वाचन केले ? कितीपण कानाने त्यातील श्रवण केले ? चारही वेद मुखपाठ झाले तरी काय ? अशांनी लिंगधारण केलेले नसेल तर शिवशिवा , त्यांना ब्राह्मण म्हणता येईल का ? या कारणास्तव कुडलसंगमदेवा.
त्या लिंगधारणे विरहित वेदाचा भार सांभाळणार्या ब्राम्हणाला(विद्वानाला) ओझे वाहणारे गाढव म्हणेन. यावचनातुन महात्मा बसवेश्वरांनी कोणी सर्व धर्म शस्त्रपरांगत झाला तरी जोपर्यंत तो आपल्या शरीरावर लिंगधारण करीत नाही तोपर्यंत त्यास ब्राह्मण म्हणता येणार नाही तो ओझे वाहणाऱ्या गाढवा सारखाच आहे .तत्पर्य महात्मा बसवेश्वरांने ब्राह्मण हे कोणास संबोधले ते अभ्यासावे जो लिंगधारण करुन धर्मशास्त्राभ्यासात निपुण आहे त्यालाच महात्मा बसवेश्वरांनी ब्राह्मण म्हटलेले आहे .त्यालाच लिंगीब्राम्हण ,शैवब्राम्हण म्हणणेच योग्य म्हणुनच यावरून एक सिद्ध होते महात्मा बसवेश्वर हे एक शिवभक्त इष्टलिंधारी लिंगीब्राम्हण, शैवब्राम्हणच होते.
आणि महत्त्वाचे म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी जे वेदागमनोपनिषद, शास्त्र, पूराण परांगत आहे पण लिंगधारी नाही अशांवर टिका केलेली आहे पण शास्त्रपुराण, वेदागमनोपनिषद यांस पुर्णतः नाकारले नाही कारण महात्मा बसवेश्वर यांनी स्वतः शास्त्रपुराण, वेदागमनोपनिषद याचे कुलगुरूचे आश्रमी सखोल अध्ययन केलेले होते , ते त्यात परांगत होते.
🌹 *२०) महात्म्य बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*"ओम नमः शिवाय" या मत्राची*
*बरोबरी करू न शकल्याने थांबले वेद;*
*"ओम नमः शिवाय" या मत्राची*
*बरोबरी करू न शकल्याने थांबले शास्त्र;*
*"ओम नमः शिवाय" या मत्राची*
*बरोबरी करू न शकल्याने थांबले तर्क;*
*भयंकर भ्रमित झाले मंत्र-तंत्र,*
*शिवाचे रहस्य न जाणल्याने चिंतीत झाले लोक !*
*कुडलसंगमदेवाने श्वापचोध्दार केल्याने*
*जातिभेद होऊ शकत नाही.*
या वरील(२२)वचनातुन महात्मा बसवण्णाने ओम नमःशिवाय या षडाक्षरी महामंत्राची व्याप्ती ,महती विशद करतांना सांगितले की ओम नमःशिवाय या षडाक्षरी मंत्राची महानता शोधता शोधता वा तिचे वर्णन करता करता वेदशास्त्राचे , शास्त्राचे ,तर्काचे ज्ञान पण कमी पडते ,जप तप साधना भ्रमित झाल्याप्रमाणे भरकटत असते .
शिवाचे शिवतत्व ,शिवरहस्य यांचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त न झाल्याने लोक चिंतीत झालेत.
कुडलसंगमदेवाने यांना आपलेसे केल्याने त्यांचेत कोणताही भेदभाव होत नाही.
महात्मा बसवेश्वरांचे अशा काही वेदशास्त्रागमनादी धर्मशास्त्रीय टिकात्मक वचनाचा गैरअर्थ लावुन अशा वचनाचा गैरसमज समाजात पसरवुन महात्मा बसवेश्वरादी शरण वेदशास्त्रागमनादी धर्मशास्त्र विरोधी होते आणि त्यांनी वेद ,आगम,,पुराण,वशिष्ठ आदि धर्मशास्त्रास नाकारले असा अपप्रचार समाजात पसरवुन समाजाची दिशाभुल केली समाजाला महात्मा बसवेश्वरांचे विचारातील त्यांचे वचनातील सत्य कळुच दिले नाही.
🌹 *२१)महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*हे। देवा,माझी विनंती ऐकावी बा.*
*विप्र श्रेष्ठ, अंत्यज कनिष्ठ न मानता,*
*शिवभक्त सारे समानज म्हणेन,*
*ब्राह्मण श्रेष्ठ, श्वपच कनिष्ठ न मानता,*
*भवी सारे समानच म्हणेन,*
*ऐसा अचल विश्वास असे माझ्या मनी.*
*माझिया शब्दावरी तिळमात्र शंका जरी आली,*
*दात पाडावे,नाक कापावे,हे कुडलसंगमदेवा.*
थोडक्यात ...
महात्मा बसवेश्वरांनी कुडलसंगमदेवास एक विनंती केली , तो विप्र असो वा अंत्यज , तो ब्राह्मण असो वा श्वपच या भमीवरील सर्व शिवभक्तांना मी सारखेच ,समानच समजेल (त्यात भेद करणार नाही) असे मी ठामपणे विश्वास माझ्या मनात आहे जर माझ विचारात तिळभर पण तुला शंका आली तर माझ दात पाडावे ,नाक कापावे हे कुडलसंगमदेवा.
काही बसववादी मंडळी ब्राह्मण द्वेष पसरवीत असतात पण हि शिकवण महात्मा बसवेश्वरांनी दिलेली नाही जो ब्राह्मण शिवभक्त असेल त्यास दोष देणे म्हणजेच महात्मा बसवेश्वरांचे ,शरण शिकवणीचा अनादर करणे होय
🌹 *२२)महात्मा बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*लिंगधारणा (इष्टलिंग धारणा) हा विधी बसवपुर्वकालीन पुरातन धर्मशास्त्रातीलच*
*हे त्रिकालबाधीत सत्य सांगणारे स्वतः महात्मा बसवण्णाचे सत्य वचन*
👇👇👇👇👇👇👇
*संकल्प - विकल्प अशा*
*उदय अस्तमानांना दुर झालेल्या*
*शरणांना अकुलज ऐसे व्यर्थ बडबडती*
*पहा हे मुर्ख विप्र.*
*आपण मातंगीचे गर्भसंभुत*
*जेष्ठापुत्र असती हे न जाणता,*
*आमुच्या शिवभक्तांना हिन,*
*कनिष्ठ अशी निंदा करणार्या*
*चांडाळ विप्रांनो तुम्ही ऐका हो.*
*स्त्रीवाथ पुरुष: षंडश्वांडालो* *व्दिजवंशज:न जातिभेदो.।*
*लिंगार्चेसर्वे रुद्रगण:स्मृता:।।*
*हे पुराणवाक्य न जाणता,*
*आमच्या शिवभक्तांना* *महार,मातंग,व्याध,लोहार,कासार,सोनार,परीट,न्हावी,धनगर, विणकर, शबर म्हणता,*
*तुमच्या उत्तम सत्कुळांना आम्ही नावे ठेवावी का ?*
*आम्हास त्याचे काय ?कारण ---*
*मार्कंडेय- मातंग,सांख्य -श्वपच,काश्यप - लोहार, रोमज- कासार, आगस्त्य- व्याध ,नारद- परीट , वेदव्यास- कोळी, वशिष्ठ- डोंबारी, दुर्वास- चांभार, कौंडिण्य- न्हावी आहेत .*
*वासिष्ठात असा उल्लेख आहे,--*
*वाल्मीकी च वसिष्ठश्च,गार्ग्य मांडव्य गौतमा:।*
*पुर्वाश्रयैक निष्ठाश्च शिवदिक्षा:स्वर्गगामिन:।।*
*ऐसे असता,हे जाणुनी मिरविता*
*मोठेपणा कुळाचा तुमच्या;*
*आता तुमच्या कुळात कोण श्रेष्ठ आहेत सांगा हो !*
*तुमचे गोत्र पाहुनी गर्व सोडा हो !*
*आमुचे शिवभक्तच श्रेष्ठ असती.*
*वाचुनी पहा हो बंधुनो तुमच्या वेदात.*
*अथर्वण वेदात -----*
, *ओम मातंगी रेणुका गर्भसंभवात्*
*इति कारुण्य मेधावीरुद्राक्षिणम् लिंगधारणास्यात्*
*प्रसादम् स्वीकुर्वन् ऋषीणाम् वर्णश्रेष्ठोर्षि:संकर्षणात्।।*
*इत्यादी वेदवचन श्रुतिमार्गे म्हटल्याने ------*
*पुन्हा वायवीय संहितामध्ये,*
*ब्राम्हणो वापि चांडाल:* *सुगुणोदुर्गुणोपि वा ।*
*भस्मरुद्रक्ष कंठो वा देहांते तु शिवम्-व्रजेत् ।। म्हटल्याने*
*आणि शिवरहस्यात -------*
*ग्रामीण मलिनम् तोयम् यथा सागरसंगतम्।*
*शिवसंस्कार संपन्ने जातिभेदम् न कारयेत्।। म्हटल्याने*
*आणि शैवपुराणात ----*
*नगरी निर्झराद्यांबु गंगाम् प्राप्ययथा तथा ।*
*दिक्षायोगातथा शैवो शुद्रादि:* *शिवताम् वज्रत् ।। म्हटल्याने*
*या सर्वांचे वर्ण लिंधारण लिंगार्चनाने*
*नष्ट पावले , ऐका बंधुनो.*
*ऐसे ऋषिजन सर्व श्रीगुरुची कृपा प्राप्त करुनी*
*विभुती रुद्राक्ष धारण करुनी*
*शिवलिंग धारणा, शिवलिंग आराधना करुनी*
*पादतिर्थ प्रसाद सेवुनी*
*उत्तमवर्ण श्रेष्ठ झाले पहा.*
*या कारणे,*
*आमुच्या कुंडलसंगय्यास*
*जाणुनी पुजणाराच उत्तम ;*
*तोच सद्-ब्राम्हण असे.*
*ऐसा न मानणारा आताच महार असे पहा बंधुनो .*
या वरील (२२) वचनातुन स्वतःच्या महात्मा बसवेश्वरांनी विविध बसवपुर्वकालीन धर्मशास्त्राय संदर्भ देऊन या वचनातुन लिहलेल्या विविध नामोल्लेख केलेल्या ऋषींनी कोणकोणत्या धर्मशास्त्रानुसार श्रीगुरुची शिवकृपा प्राप्त करुन आपल्या जाती विभुति, रुद्राक्ष, शरीरावर शिवलींगधारणा करुन शिवलिंग आराधना केल्याने ते सर्वक्षेष्ठ शिवभक्त झाले त्यामुळे त्यांचेतील सर्व भेद नष्ट झाले असे महात्मा बसवेश्वरांनी स्पष्टपणे सांगितले आहे ,ते खालीलप्रमाणे..
-- 🚩*पुराणवाक्य*
१) *स्त्रीवाथ पुरुष: षंडश्वांडालो*
*व्दिजवंशज:न जातिभेदो.।*
*लिंगार्चेसर्वे रुद्रगण:स्मृता:।।*
---🚩 वशिष्ठ
२) *वाल्मीकी च वसिष्ठश्च,गार्ग्य मांडव्य गौतमा:।*
*पुर्वाश्रयैक निष्ठाश्च शिवदिक्षा:स्वर्गगामिन:।।*
--- 🚩 वेद
३) *अथर्वण वेदात -----*
, *ओम मातंगी रेणुका गर्भसंभवात्*
*इति कारुण्य मेधावीरुद्राक्षिणम् लिंगधारणास्यात्*
*प्रसादम् स्वीकुर्वन् ऋषीणाम् वर्णश्रेष्ठोर्षि:संकर्षणात्।।*
----🚩 *वायवीय संहिता
४)*ब्राम्हणो वापि चांडाल:* *सुगुणोदुर्गुणोपि वा ।*
*भस्मरुद्रक्ष कंठो वा देहांते तु शिवम्-व्रजेत् ।।
----🚩 *शिवरहस्य
५) *ग्रामीण मलिनम् तोयम् यथा सागरसंगतम्।*
*शिवसंस्कार संपन्ने जातिभेदम् न कारयेत्।।
---🚩 *शैवपुराण
६) *नगरी निर्झराद्यांबु गंगाम् प्राप्ययथा तथा ।*
*दिक्षायोगातथा शैवो शुद्रादि:* *शिवताम् वज्रत् ।। म्हटल्याने*
*या सर्वांचे वर्ण लिंधारण लिंगार्चनाने*
तरीपण आमच्यातील काही विक्षिप्त धर्मद्रोही विचारवंतांनी महात्मा बसवेश्वर हे वेदागमनशास्त्रपुराण , उपनिषद ,संहिता शिवरहस्य या विवीध धर्मशास्त्राचे विरोधात होते त्यांनी ती नाकारली असे कुंचित विचार मांडुन, असा अपप्रचार करुन महात्मा बसवेश्वरांचे शिकवणीला , त्यांनी दिलेल्या लिंगधारणे संदर्भातील धर्मशास्त्रावर आधारित वचनाचा अवमान करीत असुन हा तर या विद्रूप विचारवंतांचा धर्मद्रोहच नव्हे का ? यांनी खरेतर स्वतःचे स्वमतलबासाठी महात्मा बसवेश्वरांचे ,शरणांचे शिकवणीला काळीमा फासलेला आहे हे महात्मा बसवेश्वरांचे नावाचा गैरवापर करुन समाजात दुषीत वातावरण निर्माण करीत आहेत.
महात्मा बसवेश्वरांनी , शरणांनी आपल्या विचारातुन लिहलेल्या वचनातुन कोठेही पुरातन वेदागमनशास्त्रपुराण , उपनिषद ,संहिता शिवरहस्य या विवीध धर्मशास्त्रे स्पष्टपणे नाकारलेली नसुन त्यावर टिकात्मक लिखाण जरुर केले पण त्यातील संदर्भावर आपली वचनसाहित्याचे लिखाण केल्याचे स्पष्ट होते.
🌹 *२३)महात्म्य बसवण्णाचे वचन*
*जिथे जिथे पहावे देवा,तूच देवा आहेस.*
*सकल विस्ताराचे देवा तूच रूप आहे.*
*विश्वाचे चक्षु तुच देवा,विश्वाचे मुख तुच देवा.*
*विश्वाचे बाहु तूच देवा,विश्वाचे पाद तूच देवा*
*कुडलसंगमदेवा.*
वरील वचनातुन महात्मा बसवेश्वरांनी आपल्या परमात्म्याची म्हणजेच शिवाची व्यप्ती येथे विशद करतांना
जेथे पहावे तेथे म्हणजेच जलीस्थळी आकाशी हे सर्वच ब्रम्हांड तुझ्याच ना ना रुपाने व्यापलेले आहे, ब्रम्हांडाचा कर्ता तुम्हीच आहात ,कुडलसंगमदेवा .
🌹 *२४)महात्म्य बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*आज-उद्या-परवा म्हणू नका.*
*दिवसभर शिवशरणम् म्हणावे,*
*दिवसभर हरशरणम् म्हणावे,*
*दिवसभर आमच्या कुडलसंगमदेवाला न चुकता स्मरावे.*
आज म्हणु उद्या म्हणु परवा म्हणु असे कारण सांगुन न टाळता अंगातील आळस झटकुन दिवसभर , क्षणोक्षणी तुझे नाव शिवशरण ,हरशरण असे मुखातुन ,मनातुन ,रोमरोमातुन तुझेच नामस्मरण न चुकता घडो कुडलसंगमदेवाचे.
🌹 *२५)महात्म्य बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*मजहुन लहान नाही,*
*शिवभक्ताहुन मोठा नाही कोणी*
*चरण तुझे साक्षी,मन माझे साक्षी*
*कुडलसंगमदेव हेच माझे प्राण*
हे देवा , या विश्वात माझ्यापेक्षा कोणी लहान नाही , या जगात शिवभक्तांपेक्षा मोठा कोणीही नाही. तुझ्या चरणाला साक्ष ठेऊन माझे मन हे सांगत आहे .
कुडलसंगमदेव हाच माझा आत्मा आहे , माझे पंचप्राण आहे.
🌹 *२६)महात्म्य बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*अरे, अरे पापकर्म केलेल्यांनो,*
*अरे,अरे ब्रम्हहत्या केलेल्यांनो.*
*एक वेळ तरी शरण म्हणावे!*
*एकदा शरण म्हटल्यास पापकर्म पळुन जातील।*
*सर्व प्रायश्चित्तांना सुवर्ण पर्वत दिले तरी*
*पाप मिटणार नाही;*
*आमच्या कुडलसंगमदेवाला एकदा शरण यावे!*
या वचनातुन महात्मा बसवेश्वरांनी ज्यांनी ज्यांनी पाप कर्मे केली ज्यांनी ज्यांनी ब्रम्हहत्य केली त्यांनी एकदा तरी कुडलसंगमदेवाला स्मरुन शरण म्हणावे मी तुला शरणागत झालो असे म्हणावे. त्यानेच त्यांनी केलेली पापकर्म जळुन जातील.
जरी त्यांनी पापक्षालनाचे प्रायश्चित्त म्हणुन सोन्याचे डोंगर दिले त्याचे पापकर्मे निष्प्रभ होणार नाही ,मिटणार नाही.
फक्त एकदा त्याने आपल्या मनोभावे कुडलसंगमदेवाला शरण यावे म्हणजेच त्याची सर्व पापकर्मे जळुन जातील ,नष्ट होतील.
या वचनातुन महात्मा बसवेश्वरांनी पाप,पुण्य ,ब्रम्हहत्या यांना नाकारले नाही काही अति विचारवंत म्हणतात महात्मा बसवेश्वरांनी पापपुण्य नाकारली पण या वचनातुन तर त्यांनी पापपुण्यची ,ब्रम्हहत्येची जणु साक्षच दिली आहे.
आपल्या सत्कर्मावरुन आणि दुष्कर्मावरुनच आपली गुणवत्ता ठरविले जाते जरी अजाणतेपणी आपल्याकडुन पापकर्मे झाली असेल तर त्या पापक्षालनासाठी कुडलसंगमदेवाला(शिवाला) एकदाच शरण या तोच तुमचे पापक्षालन करेन.
🌹 *२७)महात्म्य बसवण्णाचे वचन*
👇👇👇👇👇
*वेद,शास्त्र,आगम इ.शिकलेले काय जेष्ठ होत?*
*कवि,गमकी,वादी,गिता प्रवाचक साहित्यिक काय जेष्ठ होत?*
*सोंगाडे ,बाण,बहुरूपी, विलासी,*
*विनोदी नट,सुविद्यावंत डोबारी काय कनिष्ठ होत?*
*जेष्टत्व कोणते असेल तर ते गुण,ज्ञान, आचार धर्म!*
*कुडलसंगमदेवाच्या शरणांनी साध्य केलेली साधनाच जेष्टत्व होय.*
या महात्मा बसवेश्वरांचे वचनातुन शिवाचाराची , शिवयोगसाधनेची शिकवण मिळते ...
तुम्ही जरी वेद,शास्त्र, आगम इत्यादी धर्मशास्त्रात श्रेष्ठ आहात विद्वान आहात त्यात काय विशेष?
तुम्ही जरी कवि,गमकी,वादी, गिता प्रवाचक साहित्यिक यात तज्ञ आहात तरी त्यात काय विशेष ?
सोंगाडे ,बाण,बहुरूपी, विलासी,
विनोदी नट,सुविद्यावंत डोबारी यांचेत पण तुमच्या सारखी गुण विशेषता आहे ते काय तुमच्या पेक्षा कनिष्ठ आहेत का ?
मग जेष्टत्व कोणाकडे तर ज्याचे जवळ योग्य अंगी असलेले उत्तम गुण कौशल्य , अंगी असलेले उच्चकोटीचे आत्मज्ञान आणि जो स्वतः आपला आचार धर्म काटेकोर पाळतो अशी सर्वगुण संपन्न शरणांनी साध्य केलेली तुझी साधनाच हिच त्याची जेष्टत्वाची ओळख आहे , कुडलसंगमदेवा तुझ्या शरणांची .*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*संजयआप्पा बोधेकर*
*चिखली जि-बुलढाणा*
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
No comments:
Post a Comment