Wednesday, June 17, 2020

सोनपेठ तालुक्यातील कृषी केंद्र दुकानदार बि-बियाने व खताचा तांत्रिक तुटवडा दाखवून जास्त भावाने विक्री करणार्‍यावर संभाजी ब्रिगेडची कारवाईची मागणी....

सोनपेठ तालुक्यातील कृषी केंद्र दुकानदार बि-बियाने व खताचा तांत्रिक तुटवडा दाखवून जास्त भावाने विक्री करणार्‍यावर संभाजी ब्रिगेडची कारवाईची मागणी....



सोनपेठ (दर्शन) :- 

संभाजी ब्रिगेड द्वारे तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सोनपेठ तालुक्यातील कृषी केंद्र दुकानदार ठराविक खत व कापसाचे बियाणे याचा तांत्रिक तुटवडा भासवून तालुक्यातील शेतकरी बांधवांना जास्त भावाने, एम.आर.पी. पेक्षा जास्त भावाने विक्री करत आहे विक्री न दाखवता जास्त विक्री चालू आहेत.स्टाँक बुक ला स्टाँक न दाखवता जास्त भावाने विक्री चालु आहे.कृषी केंद्र दुकानदाराचे स्टाँक बुक चेक करुन दोषी आढळणाऱ्या दुकानदारावर कारवाही करावी व शेतकरी बांधवांना योग्य भावाने बियाणे व खत उपलब्ध करून द्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे . या निवेदनावर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवाजी कदम, महादेव भोसले, कारभारी चांबारे, चंदुशेट रोडे व भागवत रोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment