दिनांक : 12 जून 2020
प्रति,
मा.लोक आयुक्त साहेब
नवीन प्रशासन भवन
पहिला मजला,
मंत्रालया समोर, मुंबई 32.
विषय : केस नं.लो.आ/कॉम/551/2019(टे.क्र.8) च्या निकालाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करून जिल्हाधिकारी परभणी हे आपल्या निकालाचा अवमान करीत असल्या बाबत.
संदर्भ :- 1) मा. लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई केस क्र. लो.आ/कॉम/551/2019(टे.क्र.8) दि.11/12/2019 रोजीचा निर्णय.
2) दिनांक 28 जानेवारी 2020 रोजिचा मा.जिल्हाधिकारी परभणी यांना विनंती अर्ज.
3) दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी मा.जिल्हाधिकारी परभणी यांना प्रत्यक्ष भेटून विनंती.
4) दिनांक 12 मार्च 2020 रोजीचा मा.जिल्हाधिकारी परभणी यांना विनंती अर्ज.
5) दिनांक 25 मे 2020 रोजीचा मा.जिल्हाधिकारी परभणी यांना विनंती अर्ज.
महोदय,
वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो कि, माझे सेवा निवृत्ती नंतर 1,37,108/- रुपये ची रक्कम सेवा उपदाना तून जिल्हाधिकारी परभणी यांनी बेकायदेशीरपणे कपात केली होती ज्या विरूद्ध मी केस नं. 551/2019 आपल्याकडे दाखल केली.
या प्रकरणाच्या निकालात आपण 'सदरील कपात केलेली रक्कम 30 दिवसांच्या कालमर्यादेत परत देण्याचे आदेश' जिल्हा अधिकारी परभणी यांना दिले होते. या निकालाची प्रत घेऊन मी जिल्हा प्रशासनास वारंवार अर्ज विनंत्या करत आहे परंतु अद्याप पर्यंत मला ही रक्कम जिल्हा अधिकारी यांनी दिलेली नाही.
निकालाच्या अंमलबजावणी साठी आपण दि.11 डिसेंबर 2019 रोजी 30 दिवसांची कालमर्यादा घालून दिली होती. परंतु आज 6 महिने उलटल्या नंतर ही जिल्हाधिकारी आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असून त्याद्वारे आपण दिलेल्या निकालाचा अवमान करत आहेत.
तरी परभणी जिल्हा प्रशासनाच्या या बेजबाबदार वर्तनाची गंभीर दखल घेऊन आपण योग्य ते आदेश जिल्हाधिकारी परभणी यांना द्यावे व मला कपात केलेली रक्कम मिळवून द्यावी ही नम्र विनंती.
सोबत : - 3 व PDF फाईल 1
आपला नम्र
भगवान बापूराव किरवले
सेवा निवृत्त कर्मचारी
(करनिर्धारक व प्रशासकीय सेवा)
न.प.सोनपेठ जी.परभणी
मो.नं. 8208656511/9860411019
ईमेल : kbsonpeth@gmail.com
प्रतिलीपी :
1) मा.जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना माहितीस्तव.
2) श्रीमती अल्का खैरे जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना माहितीस्तव.
No comments:
Post a Comment