सोनपेठ तालुका व शहर शाखा वंचित बहुजन आघाडीचे मा.मुख्यमंत्री यांना मा.तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन नुकतेच देण्यात आले.या निवेदनात महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारसरणीचे राज्य आहे अशी देशात वंदता आहे छत्रपती शिवाजी-फुले-शाहू-डॉ.आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा ठसा या राज्यातील तमाम जनतेवर आहे. असे असतानाही या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत राज्यात ज्या जातीय अत्याचाराच्या घटना घडल्या त्यामुळे महाराष्ट्राची शान मात्र धूळीस मिळवील्या गेली आहे. त्या सर्व नऊ ते दहा घटनांची काय चौकशी केली? याबाबत माहिती मिळणे तसेच चार ते पाच सविस्तर मागण्यांची नोंद या निवेदनात केली आहे. या निवेदनावर तालुका व शहर शाखा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.



No comments:
Post a Comment