आता पुणे बेकायदा वाहतुक ; काही वाहनधारकांकडून गरजवंताची लुट
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदीसह सार्वजनिक वाहतुकीस प्रशासनाने स्थगिती बहाल केलेली असतांना सुध्दा गेल्या काही दिवसांपासून काही वाहनधारकांनी पुण्याला अशी बेकायदा वाहतुक सुरू करीत गरजवंतांची लुट सुरू केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंबईहून परतलेल्या व्यक्तींना पुन्हा महानगराकडे जावयाचे वेध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील काही वाहनधारकांनी या गरवंतांशी संपर्क साधून वाहतुक सुरू केली आहे. विशेषतः जिल्ह्या प्रशासनाने ई-पासवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध आणले असतांना या वाहनधारकांसह गरजवंतांनी हिंगोली व पूणे जिल्ह्यातून ई-पास मिळवून परभणी जिल्ह्यातून वाहतुक सुरू केली आहे. या वाहनधारकांनी पुण्यासाठी दोन ते तीन हजार रुपये प्रत्येकी भाडे आकारणे सुरू केले असून त्या वाहतुकीत सोशल डिस्टन्सींग वगैरे गोष्टीचा अक्षरक्षः फज्जा उडविला जातो आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ट्रॅव्हल्स असोसिएशनने या बेकायदा वाहतुकीवर पोलिस व महसुल प्रशासनाने कठोर कारवाई सुरू करावी, अशी मागणी केली आहे. जिल्हाध्यक्ष महेश भुतडा यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनास एक निवेदन सादर केले. त्याद्वारे या गैरप्रकाराबाबत प्रकाशझोत टाकला. सार्वजनिक वाहतुकीचे निर्बंध असतांना संबंधीत वाहतुकदार प्रशासनाच्या त्या निर्बंधाची खुलेआमपणे चेष्टा करीत असल्याचे मत व्यक्त केले आहे.


No comments:
Post a Comment