एस.एम.देशमुख यांची विधान परिषदेवर नियुक्त करण्याची परभणी जिल्हा पत्रकार संघाची मागणी
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
महाराष्ट्रातील पत्रकारांचे आधारस्तंभ तथा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस.एम.देशमुख यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाने केली आहे.
परभणी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आज मा.राज्यपाल, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्याकडे निवेदन पाठवले असून या निवेदनात म्हटले आहे की, राज्यपालांकडून 12 विधान परिषद सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्यपालांनी आपल्या कोटयातून विचारवंत, साहित्यीक, कलावंत, पत्रकाराची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा असते. राज्यपालांनी ही अपेक्षा पूर्ण करतांना ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांच्या नावाचा प्राधान्याने विचार करावा, अशी विनंती या निवेदनात केली आहे. या निवेदनात पूढे म्हटले आहे की, देशमुख हे मागील 35 वर्षापासून पत्रकारीतेत सक्रीय आहेत. 23 वर्ष विविध वृत्तमानपत्रात यशस्वी संपादक म्हणून कार्य केले आहे. राज्यातील पत्रकारांचे प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. पत्रकारांना संघटीत केले आहे व राज्यात पत्रकारांची मोठी चळवळ उभी केली आहे. पत्रकारांना पेन्शन मिळाली पाहिजे. तसेच पत्रकारांना कायदेशिर संरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी लढा उभारला. या लढयामुळेच शासनाला पत्रकारांच्या या मागण्या मान्य कराव्या लागल्या. एस.एम.देशमुख हे लेखक म्हणूनही प्रसिध्द आहेत. त्यांची आठ पुस्तके प्रसिध्द झाले असून विविध दैनिकात पाच हजार लेख प्रसिध्द झाले आहेत. राज्यपालांनी आपल्या कोटयातून त्यांना विधान परिषदेवर नियुक्त करावे, अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष तथा परभणी जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे, कार्याध्यक्ष सुरज कदम, सोशल मिडियाचे जिल्हा समन्वयक प्रभू दिपके, परिषद प्रतिनिधी राजू हट्टेकर, प्रविण देशपांडे, मोहन धारासूरकर, हनुमंत चिटणीस, लक्ष्मण मानोलीकर, कैलास चव्हाण, माणिक रासवे, विट्टल वडकूते, संजय भराडे, प्रविण चौधरी, धाराजी भुसारे, मंचक खंदारे, आबासाहेब कडपाटील आदींनी केली आहे.



No comments:
Post a Comment