Friday, June 12, 2020

सोनपेठ येथे भाजपाच्या कुटुंब संपर्क अभियानास प्रारंभ ; आ.मेघनादिदी बोर्डीकर यांच्या शुमहस्ते उदघाटन

सोनपेठ येथे भाजपाच्या कुटुंब संपर्क अभियानास प्रारंभ ; आ.मेघनादिदी बोर्डीकर यांच्या शुमहस्ते उदघाटन




सोनपेठ (दर्शन) :-
 
            मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील प्रथम वर्ष पूर्ती निमित्त व केंद्र सरकारच्या कार्याची व निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कुटुंब संपर्क अभियानाचे  सोनपेठ येथे दि.11 जुन 2020 गुरुवार रोजी आमदार मेघनादीदी बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन  करण्यात आले.
            यावेळी संपुर्ण शहरासह प्रमुख आदर्श कॉलनी, महाजन कॉलनी, सारडा गल्ली, सोनखेड व दहीखेड येथील प्रत्येक घरोघरी जावून मागील सहा वर्षात केंद्र सरकारने केलेल्या महत्त्वपूर्ण  कार्याची माहिती व नरेंद्र मोदी यांनी जनतेस उद्देशून लिहिलेले पत्र देण्यात आले.
            अनेक शतकांपासून रखडलेले राम मंदीर, कलम 370, शेतकऱ्यांसाठी कृषी सन्मान योजना, व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व्यापारी कल्याण महामंडळ अशा धोरणात्मक निर्णय यांसह प्रत्येक महिलेच्या जणधन खात्यात 500 रुपये, मोफत गॅस कनेक्शन, मागेल त्यास घरकुल आदी योजनांची माहिती देण्यात आली व स्वदेशी वस्तू वापरण्याचे अवाहन यावेळी करण्यात आले.
            सोनपेठ शहरातील महाजन गल्ली येथे आमदार मेघना दीदी बोर्डीकर,  सारडा गल्ली मध्ये-मा.आ.मोहन फड, सुशील रेवडकर आदर्श कॉलनी येथे - भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, रमाकांत दादा जहागीरदार, शिवाजीराव मव्हाळे. सोनखेड व दहिखेड येथे - बाळासाहेब जाधव, संतोष दलाल यांच्या नेतृत्वाखाली अभियान झाले
            अभियानात भाजपा पक्षाचे महीला / पुरीष पदाधिकार्यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.

[१ कोटी घरा पर्यंत पोचण्याचा निर्धार
केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील प्रथम वर्ष पूर्ती निमित्त मोदी सरकारच्या कार्याची व निर्णयांची माहिती व मोदी यांनी जनतेस उद्देशून लिहलेले पत्र १ कोटी लोकांन पर्यंत पोचवण्यासाठी भाजप च्या वतीने कुटूंब संपर्क अभियानास सुरुवात करण्यात आली आहे ]

No comments:

Post a Comment