Monday, June 15, 2020

परभणी कोरोना अपडेट ; आणखीन दोनजणांस डिस्चार्ज सोनपेठ तालुका कोरोना मुक्त तर 4 रुग्नांवर उपचार सुरु

परभणी कोरोना अपडेट ; आणखीन दोनजणांस डिस्चार्ज सोनपेठ तालुका कोरोना मुक्त तर 4 रुग्नांवर उपचार सुरु




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमित कक्षातील कोरोनाबाधीत आणखीन दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालय प्रशासनाने सोमवार (दि.15) रोजी त्यांना डिस्चार्ज दिला.कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सोमवारी(दि.15) सायंकाळी सहा वाजेपर्यंत 3 संशयित दाखल झाले असून प्रलंबीत स्वॅबची संख्या 25 एवढी आहे.एकूण संशयित रुग्णांची संख्या 2525 असून 2720 पैकी 2484 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 93 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. आजपर्यंत 20 जणांचे स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. 80 संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयातून सोमवारी 2 संशयतिचा स्बॅव नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. सोमवारी प्राप्त अहवालात 11 जणांच्या स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात सोमवारपर्यंत विलगिकरण कक्षात 114, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 26 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 2385 जण आहेत. जिल्हा रुग्णालयातून 2 कोरोनाबाधीत रुग्णांना कसलेही लक्षणे नसल्याने, त्याची प्रकृती ठणठणीत असल्याने तसेच राज्यस्तरावरुन प्राप्त मार्गदर्शक सूचनांनूसार रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये जिंतूर तालुक्यातील सावंगी (भांबळे) येथील 38 वर्षीय पुरुष व सोनपेठ तालुक्यातील खपाट पिंप्री येथील 20 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.सोनपेठ तालुका कोरोना मुक्त सद्यस्थितीत आजपर्यंत जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटीव्ह एकूण 93 रुग्णांपैकी 86 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 4 कोरोना रुग्ण वैद्यकीय निगरानीखाली असून ते औषधोपचारास योग्य तो प्रतिसाद देत आहेत व त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

No comments:

Post a Comment