जिल्हयातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांनी आपली सेवापुस्तके जिल्हा कोषागार कार्यालयातून प्राप्त करावे
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
सर्व अहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की परभणी जिल्हयातील कोषागार व उपकोषागार अंतर्गत असलेले अहरण व संवितरण अधिकारी कार्यालयातील दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी व दिनांक 1 जानेवारी 2019 नंतर सेवानिवृत्त झालेले व होणारे कर्मचारी यांचे वेतन पडताळणी झालेली मुळ सेवापुस्तके वेतन पडताळणी पथक औरंगाबाद कार्यालयाकडून कोषागार कार्यालय परभणी येथे दिनांक 16 जुन 2020 रोजी प्राप्त झालेली आहेत.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मुळ सेवापुस्तके वितरीत करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय परभणी येथे अधिकारी / कर्मचारी यांच्या यादीसह पाठविण्यात आली आहे. याबाबत संबंधीत कार्यालयांनी सेवापुस्तका बाबत खात्री करुन कार्यालय प्रमुखाच्या लेखी प्राधिकारपत्र जिल्हा कोषागार कार्यालयास सादर करुन सेवापुस्तके प्राप्त करुन घ्यावी असे जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.


No comments:
Post a Comment