Thursday, June 4, 2020

सोनपेठ तालुक्यातील खपाट पिंपरी येथील 20 वर्षीय तरुण पॉझिटिव ; ग्रामपंचायत हद्दीत प्रतिबंधित क्षेत्र घोषित

सोनपेठ तालुक्यातील खपाट पिंपरी येथील 20 वर्षीय तरुण पॉझिटिव ; ग्रामपंचायत हद्दीत प्रतिबंधित क्षेत्र घोषित 


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातील नुकतेच शेळगाव महाविष्णु येथील एकाच कुटुंबातील आठ व्यक्ती कोरोना  पॉझिटिव्ह हे दोन दिवसापूर्वीच त्यांचे स्वॕब निगेटिव्ह आल्या कारणाने त्या सर्वांना सुट्टी देण्यात आली व सोनपेठ तालुका कोरोना मुक्तीचा आनंद घेतो ना घेतोच की दिनांक 4 जून 2020 गुरुवार रोजी खपाट पिंपरी येथील 20 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खपाट पिंपरी येथे मागील आठवड्यात मुंबईहून एक युवक आलेला होता या युवकास होम काँरंटाईन करण्यात आलेले होते. दरम्यान युवकाची प्रकृती खालावल्याने त्याचा स्वॕब घेण्यात आला. या स्वॕब चा अहवाल दिनांक 4 जून रोजी प्रशासनाला प्राप्त झाला असून सदर युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. परभणी जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 89 झाली असून सद्यस्थितीत कोरून पॉझिटिव्ह 56रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे खपाट पिंपरी ग्रामपंचायत हद्द प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पुढील आदेशापर्यंत घोषित करण्यात आलेली आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment