Saturday, June 20, 2020

सोनपेठ चा मुकूल (आनंद) मुकूंदराव विटेकर हा तरूण कक्ष अधिकारी संवर्गातून राज्यात प्रथम

सोनपेठ चा मुकूल मुकूंदराव विटेकर हा तरूण कक्ष अधिकारी संवर्गातून राज्यात प्रथम



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी सारख्या ग्रामीण भागात वास्तव्यास असूनही स्वताच्या कर्तूत्वावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कक्ष अधिकारी संवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा मान परभणी जिल्ह्यातील सोनपेठ चा तरूण मुकूल (आनंद)मुकूंदराव विटेकर यांने पटकाविला आहे. अत्यंत साधारण परिस्थितीतून शिक्षण घेत मुकूल विटेकर याने वयाच्या २४ व्यावर्षीच मिळविलेल्या दैदिप्यमान यशाचे जिल्ह्यातून कौतूक होत आहे.
सोनपेठ शहरातील मुकूल (आनंद)मुकूंदराव विटेकर या तरूणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. राज्य सेवा (पूर्व) परीक्षा २०१९ ही ता. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३६ केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यातून ३ लाख ६० हजार ९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेतून ६ हजार ८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. मुख्य परीक्षा ता. १३ ते १५ जुलै २०१९ रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली. त्याचा निकाल शुक्रवारी (ता.१९) जाहीर झाला. या परीक्षेत परभणीतील रहिवाशी मुकूल मुकूंदराव विटेकर हा तरूण कक्ष अधिकारी संवर्गातून राज्यात प्रथम आला आहे.
मुकूल (आनंद)मुकूंद विटेकर याचे शिक्षण नवोदय विद्यालय परभणी येथे झाले. इयत्ता १२ नंतर त्याने विद्या प्रतिष्ठाण बारामती येथून मॅकेनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. परंतू अभियांत्रिकीचे शिक्षण घेवूनही त्याला स्पर्धा परीक्षांची ओढ होती. त्यामुळे त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी येथे सलग दोन वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी पूर्ण केली. त्या ठिकाणी डॉ. विवेक कुलकर्णी व सविता कुलकर्णी यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.



No comments:

Post a Comment