Saturday, June 6, 2020

परभणी येथे 89पॉझीटीव्ह पैकी 51 रुग्न कोरोना मुक्त तर 36 रुग्णांवर उपचार सुरू आता 131 जणांचे स्वॅब प्रलंबीत

परभणी येथे 89पॉझीटीव्ह पैकी 51 रुग्न कोरोना मुक्त तर 36 रुग्णांवर उपचार सुरू आता 131 जणांचे स्वॅब प्रलंबीत



परभणी  / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (दि.6) सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 8 संशयीत दाखल झाले असून संशयितांची संख्या 2476 पर्यंत पोचली आहे. 131 संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आहेत. एकूण 2649 पैकी 2318 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 89 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर 77 संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. 34 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे. एकूण 131 स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयातून शनिवारी एकूण 14 जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.तेथील प्रयोगशाळेतून 18 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले असून ते सगळे निगेटीव्ह आहेत.जिल्हा शासकीय रूग्णालयात शनिवारपर्यंत विलगिकरण कक्षात 383, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 203 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 1890 जण आहेत. आतापर्यंत असलेल्या एकूण 89 पॉझीटीव्ह पैकी 51 जण बरे होवून घरी गेले आहेत. 36 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती सा.सोनपेठ दर्शनला जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment