सोनपेठ भाजपा तालुका शाखा आयोजित रक्तदान शिबीरात 45 रक्तदात्यांचा सहभाग
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुका भाजपा शाखा "संकट काळी माझे योगदान" हे ब्रिद घेऊन रक्तदान "हिंदू साम्राज्य दिन" व "लोकनेते स्व.गोपिनाथरावजी मुंडे साहेब" यांच्या 06 व्या पुण्यस्मरना निमित्य भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.दि. 06 जुन 2020 शनिवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरात विटा रोड स्थित भाजपा कार्यालयात इच्छुक 45 रक्तदात्यांनी जनांनी रक्तदान केले सदरील शिबिरात कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेतली गेली.सामायीक अंतर राखत सकाळी 10 वाजता रक्तदानास सुरुवात करण्यात आली.रक्तदात्यास चहा बीस्किटची सोय करण्यात आली होती.प्रथमच रक्तदान करणारे युवकांनी देशासाठि आज काही कामी आलो असल्याची भावना व्यक्त केली. भाजपा जिल्हा चिटणीस शिवाजीराव मव्हाळे, तालुका अध्यक्ष सुशिल रेवडकर व तालुका पदाधीकारी यांनी परीश्रम घेतले.



No comments:
Post a Comment