Friday, June 19, 2020

सोनपेठ शहरातील जिजामाता उद्यान येथे वृक्षारोपन संपन्न

सोनपेठ शहरातील जिजामाता उद्यान येथे वृक्षारोपन संपन्न 



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील जिजामाता उद्यान येथे वृक्षारोपन संपन्न दि.17 जुन 2020 बुधवार रोजी राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांचा स्मृती दिनानिमित्त व जागतिक वाळवंटीकरण प्रतिरोध दिनाचे औचित्य साधून लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमास मुख्याधिकारी सौ.सोनमताई देशमुख, नगराध्यक्षा सौ.जिजाबाई राठोड, नगरसेविका सौ.नलिनीताई चिमनगुंडे व जिजामता उद्यान परिसरातील महिला यांच्या हस्ते जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त वड व पिंपळ यांचे सामाजिक अंतर ठेऊन वृक्षारोपण करण्यात आले. तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा स्मृती दिनानिमित्त व जागतिक वाळवंटीकरण प्रतिरोध दिनाचे औचित्य साधून वृक्षमित्र महेश जाधव, जनसेवा मित्रमंडळाचे अध्यक्ष साजेद कुरेशी, जयभवनी मित्रमंडळाचे सदस्य गजानन गीराम, बाळू आव्हाड, दिनेश जाधव, जावेद अन्सारी आणि नगर परिषद कर्मचारी संदीप पोरे, दीपक टाक, शेख सादेख शेख रहीम, श्रीरंग दत्ता चव्हाण यांच्या हस्ते सामाजिक अंतर ठेऊन वृक्षारोपण करण्यात आले. महेश जाधव यांच्या संकल्पनेतून "आईचे झाड" म्हणून वड,पिंपळ या लावलेल्या झाडाचे पालकत्व बबन वेदपाठक व नवनाथ साळांखे यांनी स्वीकारले आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.


No comments:

Post a Comment