Monday, June 8, 2020

परभणीत आता प्रलंबीत स्वॅबची संख्या 68, नव्याने 4 जण दाखल ; 24 रुग्नावर उपचार सुरु तर 12 कोरोनामुक्त रुग्णांना सुट्टी


परभणीत आता प्रलंबीत स्वॅबची संख्या 68, नव्याने 4 जण दाखल ; 24 रुग्नावर उपचार सुरु तर 12 कोरोनामुक्त रुग्णांना सुट्टी



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्हा कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सोमवारी (दि.8) सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 4 संशयीत दाखल झाले असून संशयितांची संख्या 2483 पर्यंत पोचली आहे. 68 संशयितांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आहेत.
एकूण 2664 पैकी 2390 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 89 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर 80 संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. 37 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचा  अहवाल रविवारी रात्री प्राप्त झाला. एकूण 68 स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयातून सोमवारी एकूण 9 जणांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळ पर्यंत एकाही स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला नाही.
जिल्हा शासकीय रूग्णालयात सोमवारपर्यंत विलगिकरण कक्षात 396, रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात 93 जण आहेत. विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले 1994 जण आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.दरम्यान, पूर्णा येथील फुले नगरातील 2 वर्षीय मुलगी, 13 व 12 वर्षीय 2 मुले, माटेगावातील 3 महिला वयोगट 8,19 व 30 वर्ष तसेच 3 पुरूष 13,16 व 40 वर्ष तसेच गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील 1 पुरूष वय 60 वर्ष व 2 महिला वय 55 असे एकूण 12 कोरोनामुक्त रुग्णांना सोमवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment