Tuesday, June 30, 2020

कोरोनाकाळामुळे विवंचनेत असलेल्या कर्मचारी विनाअनुदान तत्वावर कार्यरत अलिष गावित यांना अर्थिक मदत

कोरोनाकाळामुळे विवंचनेत असलेल्या कर्मचारी  विनाअनुदान तत्वावर कार्यरत अलिष गावित यांना अर्थिक मदत



सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी समितीच्या पुढाकारातुन अर्थिक विवंचनेत असलेल्यांना मदत केली जाते. याचाच एक भाग म्हणून आज माजी विद्यार्थी समीतीचे समन्वयक डॉ काळे बी.एम. यांच्या पुढाकारातुन महाविद्यालयातील कर्मचा-यांकडून वर्गणी जमवून विनाअनुदान तत्वावर कार्यरत श्रीअलिष कांतिलाल गावित यांना संस्थाध्यक्ष मा परमेश्वर कदम यांच्या हस्ते ६६०० रु मदत देण्यात आली.
   कोरोनाकाळातील लाॅकडाऊनमुळे अर्थिक संकटात सापडलेल्या या विनाअनुदानीत कर्मचा-याचे घरभाडे मागील तीन महिन्यापासून डाॅ.अशोक जाधव यांनी माफ केल्यामुळे त्यांचाही चांगला हातभार लागला . याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते, IQAC समन्वयक डाॅ.मुकुंदराज पाटील, समिती समन्वयक डॉ.बा.मु. काळे व सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.





Sunday, June 28, 2020

सोनपेठ शहरात दि.28 मध्यरात्री 12 वाजल्या पासुन ते दि.30 मध्यरात्री 12 वाजे पर्यंत संचारबंदी - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर

सोनपेठ शहरात दि.28 मध्यरात्री 12 वाजल्या पासुन ते दि.30 मध्यरात्री 12 वाजे पर्यंत  संचारबंदी - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर 



सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ शहरात रविवारी (दि.28) कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सोनपेठ नगरपालिका व 3 किमीच्या परिसरात रविवारी(दि.28) मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते मंगळवारी(दि.30) मध्यरात्री 12 वाजल्या पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यात अत्यावश्यक सेवांसह खासगी दवाखाने, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, परवाने घेतलेले वाहन, गॅस वितरीक, प्रसार माध्यमे, पेट्रोलपंप चालकांना मुभा आहे. दुध विक्रेतांना सहा ते नऊ या कालावधीत तसेच खत,बि-बियाणे विक्रेत्यांना मुभा राहणार असून राष्ट्रीयकृत बँकांना केवळ स्वस्तधान्य दुकानांचे चालन भरण्यापुर्ती मुभा बहाल करण्यात आली आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.





सोनपेठ शहरात दि.28 मध्यरात्री 12 वाजल्या पासुन ते दि.30 मध्यरात्री 12 वाजे पर्यंत संचारबंदी - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर

सोनपेठ शहरात दि.28 मध्यरात्री 12 वाजल्या पासुन ते दि.30 मध्यरात्री 12 वाजे पर्यंत  संचारबंदी - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर 



सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ शहरात रविवारी (दि.28) कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सोनपेठ नगरपालिका व 3 किमीच्या परिसरात रविवारी(दि.28) मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते मंगळवारी(दि.30) मध्यरात्री 12 वाजल्या पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यात अत्यावश्यक सेवांसह खासगी दवाखाने, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, परवाने घेतलेले वाहन, गॅस वितरीक, प्रसार माध्यमे, पेट्रोलपंप चालकांना मुभा आहे. दुध विक्रेतांना सहा ते नऊ या कालावधीत तसेच खत,बि-बियाणे विक्रेत्यांना मुभा राहणार असून राष्ट्रीयकृत बँकांना केवळ स्वस्तधान्य दुकानांचे चालन भरण्यापुर्ती मुभा बहाल करण्यात आली आहे.

सोनपेठ शहरांमध्ये बीड येथील लग्नसमारंभात मुंबई येथील लोकांच्या संपर्कातील एक महिला कोरूना पॉझिटिव्ह

सोनपेठ शहरांमध्ये बीड येथील लग्नसमारंभात मुंबई येथील लोकांच्या संपर्कातील एक महिला कोरूना पॉझिटिव्ह 


सोनपेठ (दर्शन) :- 
 
सोनपेठ तालुक्यात प्रथम शेळगाव येथे मुंबई येथून आलेले आठ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते त्यानंतर खपाट पिंपरी येथे पुण्याहून आलेला एक तरुण कोरोना पॉझिटिव आढळून आलेला होता त्या एकूणनऊ रुग्णांना उपचारां अंती त्यांचे स्वँब निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना सुट्टी देन्यात आली होती.आत्ताच कुठे सोनपेठ तालुका कोरणा मुक्तीचा आनंद घेत असताना आठ दिवसापूर्वी बीड हुन राजगल्लीत आलेल्या 
एका महिलेचा स्वँब हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला ती महिला काही दिवसापूर्वी बीड येथील लग्नसमारंभात मुंबई येथील लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्या लग्नसमारंभातील काही व्यक्ती बीड येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे त्यांच्या संपर्कातील महिला ही बीड येथून माहेरी सोनपेठ येथे आल्यामुळे सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात त्या चार व्यक्तींना चौदा दिवसासाठी काँरन्टाईन करण्यात आलेले होते व त्यांचे स्वँब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. दिनांक 28 जून 2020 रवीवार रोजी एका महिलेचा रीपोट कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला परंतु त्यांना कोणतेही प्राथमिक लक्षणे दिसून येत नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार यांनी साप्ताहिक सोनपेठ दर्शन प्रतिनिधीशी बोलताना सांगितले मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये राजगल्ली सील करण्यात आलेली असून पुढे त्यांच्या संपर्कात कोण कोण आले आहेत याचा शोध चालू आहे.तरीही मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शहरात मास्क सर्वांनी वापरणे बंधनकारक केले आहे.सर्वांनी मास्क वापरणे सतत हात स्वच्छ धुने सँनिटायझर चा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.





Saturday, June 27, 2020

"एस.एम.देशमुख यांना विधान परिषदेवर घ्या" ; शिष्टमंडळाचे शरद पवार यांना साकडे

"एस.एम.देशमुख यांना विधान परिषदेवर घ्या" ; शिष्टमंडळाचे शरद पवार यांना साकडे


सातारा / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
ज्येष्ठ पत्रकार,साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते एस.एम.देशमुख यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे यामागणीसाठी मराठी पत्रकार परिषद आणि सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा श्री.शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद दिला.
विधान परिषदेच्या बारा जागांवर राज्यपालांकडून लवकरच नियुक्तया करण्यात येणार आहेत.साहित्य,पत्रकारिता,कला,सामाजिक कार्य आदि क्षेत्रातील व्यक्तींचीच या जागांवर नियुक्ती केली जावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे.त्यानुषंगाने पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून एस.एम.देशमुख यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे अशी एकमुखी मागणी राज्यातील पत्रकारांकडून करण्यात येत आहे.एस.एम.देशमुख यांनी बारा वर्षे लढा देऊन राज्यात पत्रकार संरक्षण कायदा मिळविला..महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव असे राज्य आहे की,जेथे पत्रकारांवरील हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा ठरविला गेला असून असा हल्ला करणार्‍यांना तीन वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद केली गेलेली आहे.या कायद्याचे जनक म्हणून देशमुख ओळखले जातात.पत्रकार पेन्शन असेल किंवा पत्रकार आरोग्य योजना असताली,नाहीतर छोटया वर्तमानपत्रांचे प्रश्‍न असतील एस.एम.देशमुख याांनी आवाज उठविला आणि पत्रकारांना न्याय मिळवून दिला.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मोठा लढा देऊन त्यांनी आपले सामाजिक उत्तरदायीत्व देखील पार पाडले आहे,सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी महाराष्ट्रात मोठे काम केले आहे.साहित्य क्षेत्रातही देशमुख यांनी भरीव कार्य केले असून त्यांची आठ पुस्तकं प्रसिध्द झाली आहेत.त्यामुळे देशमुख यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून घेतले गेले तर राज्यातील पत्रकारांचे प्रश्‍न तर सुटतीलच त्याचबरोबर समाजाच्या प्रश्‍नांवर देखील ते आवाज उठवतील असा विश्‍वास भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळाने शरद पवार यांना दिला.त्यावर शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.शरद पवार यांना भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,विभागीय सचिव बापुसाहेब गोरे,सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर,सातारा जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्क्ष शरद काटकर,सरचिटणीस दीपक प्रभावळकर, शहराध्यक्ष विनोद कुलकणी,सुजित अंबेकर समाधान पाटील आदिंचा समावेश होता.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.





बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्या वर 420 चा गुन्हा दाखल करा - वसंतराव मुंडे

बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यावर 420 चा गुन्हा दाखल करा - वसंतराव मुंडे


परळी / सोनपेठ  (दर्शन) :-

महाराष्ट्रात अनेक कंपन्यांकडे बोगस बियाणे खते औषधे आहेत शासनाकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नाही असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन  श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केला आहे बिर्याणी खते औषधी संदर्भात तक्रारी शेतकऱ्यांच्या कृषी खात्याकडे आलेले आहेत सोयाबीन न उगवल्या मुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे आर्थिक अडचणीमध्ये शेतकरी सापडला आहे दुबार पेरणी करणे शेतकरी करु शकत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे शासन बोगस बियाणे  पुरवणाऱ्या कंपन्या  शेतकऱ्याच्या  जीवनाशी खेळत आहे खते औषधी बोगस बी बियाणे महाराष्ट्रात गेली दोन वर्षापासून एक रॉकेट कार्यरत आहे मी स्वतः दि 13/ 2 /2019  व  19 /7/ 2019 ला  सर्व मुद्दे निहाय शासनाकडे तक्रार देऊनही आज तागायत चांडाळ चौकडी ला राजकीय लोकांचे सहकार्य असल्यामुळे बोगस कंपन्या वर  कारवाई होत नाही कृषी खात्याचा कारभार  जबाबदार आहे त्यामध्ये निविष्ठा उद्योग मध्ये बी बियाणे खते औषधी ची प्रयोगशाळा मध्ये सर्व मॅनेज करणारे टीम आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी किती तक्रारी केल्या तरी कृषी खात्याचे काही वाकड होणार नाही अशी अधिकाऱ्यांना घमेंड आहे सोयाबीनचे बी बियाणे मध्यप्रदेश व इतर राज्या मधून 40000 मेट्रिक टन खरेदी करून सर्व बोगस कंपनी महाराष्ट्रात दुकानदार मार्फत शेतकऱ्यांना वितरित केले आहे यावर कृषी खात्याचे कृषी आयुक्त कार्यालयाचे व महाराष्ट्र शासनाचे कसलेही लक्ष नाही प्रयोगशाळेत मध्ये बी-बियाणे तपासणी सध्या केलेली नाही त्यांच्याकडे तसे अहवाल पण नाहीत राज्यातल्या बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रातील कृषी खात्याने बी बियाणे खते औषधी पुरवण्यासाठी व खरेदी करण्यासाठी परवानगी मध्य प्रदेश  उत्तराखंड  गुजरात  परराज्यातील  कंपन्यांना  परवानगी दिली कशी यास जबाबदार कोण आहे हे तपासणी काळाची गरज आहे बियाणे कायदा 1966 आणि बियाणे नियंत्रण आदेश 1983 मधील तरतुदीचा भंग केलेला आहे कृषी खात्याच्या महाराष्ट्रातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी दि 13 /2 /2019 ला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व आर्थिक गुन्हे विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आजतागायत कारवाई शासनाकडून कृषी खात्याने केलेली नाही परत शासनाला विनंती करतो बी बियाणे सोयाबीनचे बोगस बियाणे त्यामुळे संबंधित बियाणे  उत्पादक कंपनी वर 420 कलमाद्वारे शेतकऱ्यांना फसवले म्हणून गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.


Friday, June 26, 2020

सोनपेठ शहरातील स्टेट बँके समोरील ट्राफिकला आवर कोन घालनार - जिल्हाध्यक्ष अशोक मस्के पाटिल

सोनपेठ शहरातील स्टेट बँके समोरील ट्राफिकला आवर कोन घालनार - जिल्हाध्यक्ष अशोक मस्के पाटिल




सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहरातील स्टेट बँक आँफ इंडिया समोरील रोडवर लावलेल्या मोटरसायकल मुळे ट्राफिक तासन तास रोखुन सर्व सामाण्य नागरीकांची गोची होताना दिसत आहे.या बिनकामाच्या अवैध्य रस्त्यावर लावलेल्या मोटरसायकल मुळे महीला, वयोवृध्द नागरीकांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे.ही ट्राफिक दररोजच दिसुन येत आहे.याची जबाबदारी कोनाची आहे त्या संबधीतांनी आवर घालावा.त्यांच्या नजरेस आनावे म्हणून शहरातील स्टेट बँके समोरील ट्राफिकला आवर कोन घालनार असे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक मस्के पाटिल यांनी लक्ष वेधले आहे.लवकरात लवकर याला आवर नाही घातला तर होनारी जी दुर्घटना आहे.त्याची जबाबदारी हि संबधीतांना पकडण्यात यावे असे ही त्यानी शेवटि सा.सोनपेठ दर्शन प्रतिनीधी जवळ बोलताना व्यक्त केले.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.





सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरत असलेल्या हरिणांच्या कळपांचा वन विभाग बदोबस्त करा ? - शिवसेना उपतालुका प्रमुख कुमार चव्हाण

सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरत असलेल्या हरिणांच्या कळपांचा वन विभाग बदोबस्त करा ? - शिवसेना उपतालुका प्रमुख कुमार चव्हाण


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातील डिघोळ परीसर, शेळगाव परीसर तसेच उखळी परीसर जवळ जवळ संपुर्ण तालुक्यात 40-50 हरणांच्या कळप एक नाही दोन नाही तर आठ ते दहा कळप तमाम उगवलेला कापुस, सोयाबीन पिकांचा सुपडा -साप करत असुन पिकांचा नाश करत आहेत.शेतकरी राजा पहिले कर्जाने पुन्हा बोगस बियाणाने आणि आता या हरणांच्या कळपांचा वन विभाग लवकरात लवकर बदोबस्त करावे असे अवाहन शिवसेना  उपतालुका प्रमुख कुमार चव्हाण यांनी सा.सोनपेठ दर्शन प्रतिनीधी जवळ बोलतांना आपले मत व्यक्त केले.अनेक शेतकऱ्यांच्या पिंकांची नासाडी या हरणांच्या कळपांनी केली आहे.तरी शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरत असलेल्या या हरिणांच्या कळपांचा वन विभाग बदोबस्त करा ? असे अवाहन केले आहे.मा.जिल्हाधिकारी यांना मा.तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन हि देणार असल्याचे त्यांनी शेवटि सांगीतले.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.


सोनपेठ राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष तालुका शाखे तर्फे शहिदांना श्रद्धांजली व राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी

सोनपेठ राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष तालुका शाखे तर्फे शहिदांना श्रद्धांजली व राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी



सोनपेठ (दर्शन) :-

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सोनपेठ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली तर यावेळी दि.26 जुन आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष प्रा.डॉ. मुंजाभाऊ धोंडगे यांनी भारत-चीन संघर्षातील शहीद जवान कर्नल संतोष बाबु, हवालदार सुनील कुमार व कुंदन कुमार ओझा इ.20 जवानांच्या बलिदान बाबतची माहिती देऊन याबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली. यावेळी या कार्यक्रमास माजी नगरसेवक राजकुमार अभुरे, युवक शहराध्यक्ष शुभम कदम, युवक तालुकाध्यक्ष सचिन जगदाळे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष प्राध्यापक तय्यब शेख,युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष, शहराध्यक्ष , मीडिया तालुकाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तानाजी भोळे, प्रकाश राठोड, गणेश जयपाल सर, अशोक आळसे सर, वैभव रत्नपारखे सर, गिरी महाराज, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.


Thursday, June 25, 2020

केंद्रिय कन्या शाळा सोनपेठ नविन किचन शेड चे भुमिपुजन संपन्न

केंद्रिय कन्या शाळा सोनपेठ नविन किचन शेड चे भुमिपुजन संपन्न 




सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ केंद्रिय कन्या शाळा येथे नविन किचन शेड चे भुमिपुजन संपन्न. नुकतेच मंजुर झालेले नविन किचण शेड चे भुमीपुजन व श्रीफळ वाढवताना गट शिक्षण अधिकारी शौकत पठाण सर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी शा.व्य.स.अध्यक्ष तथा संपादक सा.सोनपेठ दर्शन किरण स्वामी व मुख्याध्यापक प्रदिप गायकवाड, सर्व शिक्षक, शिक्षिका आदिजन उपस्थीत होते.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.


Wednesday, June 24, 2020

परदेशवारी करून आलेल्या 5 व्यक्तींचे स्वॅब निगेटीव्ह ; संक्रमीत कक्षात 5 रूग्णांवर उपचार सुरू

परदेशवारी करून आलेल्या 5 व्यक्तींचे स्वॅब निगेटीव्ह ; संक्रमीत कक्षात 5 रूग्णांवर उपचार सुरू 




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परदेशीवारी करून आलेल्या पाच व्यक्तींचे स्वॅब जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्या पाचही व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल बुधवारी(दि.24) प्राप्त झाला असून तो निगेटीव्ह आहे.बुधवारी(दि.24) 5 संशयित दाखल झाले असून एकूण संशयितांची संख्या 2613 एवढी झाली आहे. दरम्यान, नांदेड येथील प्रयोग शाळे कडून 8 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटीव्ह आले आहेत. बुधवारी 8 जणांचे स्वॅब नांदेड येथील प्रयागेशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.आजपर्यंत 2812 स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यापैकी 2587 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत 80 अनिर्णायक 47 स्वॅब तपासणीस आवश्यक नसल्याचा अहवाल  नांदेड प्रयोगशाळेद्वारे  प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 98 रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला. 90 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने  जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला. आता रुग्णालयात पाच कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. विलगीकरण केलेल्या कक्षात 105 रुग्ण असून विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले 2503 एवढे व्यक्ती आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.


Tuesday, June 23, 2020

कोरोना नियंत्रणास संयुक्त प्रयत्न सहाय्यभूत रिकव्हरी रेटमध्ये परभणी जिल्हा राज्यात दुसरा

कोरोना नियंत्रणास संयुक्त प्रयत्न सहाय्यभूत 
रिकव्हरी रेटमध्ये परभणी जिल्हा राज्यात दुसरा
परभणी, दि.23(प्रतिनिधी)- 
या जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणुच्या नियंत्रणास महसुल प्रशासनासह जिल्हा शासकीय रुग्णालय, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः जिल्हा पोलिस यंत्रणेसह अन्य शासकीय यंत्रणांचे सामुहिक प्रयत्न तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींची सकारात्मक भुमिका, स्वयंसेवी संस्था, संघटना, मित्रमंडळांची सक्रीयता व नागरिकांची सतर्कताच या जिल्ह्यात कारणीभूत ठरली आहे. 
राज्यातील काही भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विशेषतः यात कोल्हापुर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सर्वाधिक 90.4 इतका राहिल्याने तो जिल्हा अव्वल स्थानावर आहे. त्या पाठोपाठ परभणी जिल्ह्याचाही रिकव्हरी रेट 87.1 राहिल्याने जिल्हा दुस-या स्थानावर आला आहे. तर मराठवाड्यात परभणी प्रथम क्रमांकावर आला आहे. आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील (पुणे) यांनी राज्यातील कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे जिल्हावार प्रमाण सोमवारी (दि.22) जाहीर केले.
गेल्या तीन महिन्यात संपूर्ण राज्यात  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांनाही परभणीत रुग्ण संख्येचे प्रमाण त्याप्रमाणात वाढलेले नाही. आतापर्यंत 98 रुग्णांची नोंद झाली असून त्यात केवळ तीघांचा मृत्यू झाला आहे. 90 रुग्णांची सुटका झाली आहे तर 5 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. सुरुवातीपासूनच रुग्णसंख्येने प्रमाण व त्यात दिवसांचा फरक हा मोठा राहिला आहे. सुरुवातीच्या टप्प्यातूनच ग्रीनझोनमध्ये हा जिल्हा होता. दुस-या टप्प्पाच्या अखेरीस पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. परंतू कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी लॉकडाऊनच्या बाबतीत सुरुवातीपासूनच कठोर भुमिका स्विकारल्या. विशेषतः अन्य जिल्ह्याच्या तुलनेत पोलिसांच्या भक्कम सहकार्याने सर्वप्रथम जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या.पाठोपाठ कठोर असे नियम लागू केल्याने व त्यात गरजेनुसार शिथिलता दिल्याने अनलॉकच्या पहिल्या टप्प्यापर्यंत या रोगाचा फारसा प्रादुर्भाव आढळला नाही. प्रामुख्याने पुणे, मुंबई व अन्य राज्यातून आलेल्या रुग्णांनाच कोरोनाची बाधा झाल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे. स्थानिक पातळीवर असलेल्या नागरीकांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचेही निष्पन्न झाले आहे. 
जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्या नेतृत्वाखाली महसुल यंत्रणा विशेषतः निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तसेच अन्य विभागप्रमुख तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षासह नऊ तालुक्यांच्या तहसीलदारांसह अऩ्य अधिकारी, कर्मचारी अडीच-तीन महिन्यांपासून कोरोनाविरूध्दचा लढाईत कार्यरत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.प्रकाश डाके, डॉ.रिजवान काजी, डॉ.किशोर सुरवसे, डॉ.दुर्गादास पांडे, डॉ.दिनाजी खंदारे, डॉ.योगिता नरवाडकर, डॉ.कलबरकर,डॉ.मृण्मयी मोरे,डॉ.जयश्री यादव, डॉ.केंद्रेकर,डॉ.विशाल चौधरी,डॉ.कल्याण कदम,डॉ.अनिल कान्हे, डॉ.किरण सगर, डॉ.मनिषा राठोड, डॉ.तेजस तांबोळी, डॉ.रहेमत, डॉ.खाजा खान,  जिल्हा शासकीय रुग्णालयातील वार रूममधील मंगेश जोशी, किशोर गऊळकर, शरद कदम, अच्युत चौधरी, माऊली काळे, आनंद पाईकराव, अधिसेविका रजनी पडदुणे, पारिचारिका अल्का आखाडे, फातेमा, हटकर, मुकाद्दम सय्यद खालेद,सुभाष कंडेरे यांच्यासह आयएमएचे पदाधिकारी तसेच डॉ.रामेश्‍वर नाईक,डॉ.रुपेश नगराळे तसेच त्या-त्या तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांचे अहोरात्र प्रयत्न निश्‍चीतच कोरोना नियंत्रणासाठी कारणीभुत ठरले आहेत. 
जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अपर पोलिस अधीक्षक रागसुधा आर, सहाय्यक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी संबंधीत ठाण्यांचे निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, फौजदार तसेच अन्य कर्मचारीही कोरोना विरूध्दच्या लढाईत आजही कार्य्रत आहेत.  जिल्ह्याच्या सीमेवरील 12 पॉईट तसेच सीमालगतच्या 83 गावांच्या ठिकाणचे पेट्रोलिंग महत्वपूर्ण ठरले आहे. 
परभणी महानगरात शहर पोलिस यंत्रणेतंर्गत अधिकारी, कर्मचा-यांची कामगिरीही वाखण्याजोगी राहिली आहे. महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त रमेश पवार, विद्यमान आयुक्त देविदास पवार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग,अग्निशामक दल तसेच तालुक्या स्थानच्या नगरपालिकांनी गेल्या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणावर समयसूचकता दाखविली आहे. 
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंकरराव देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रमेश खंदारे व अन्य अधिकारी, कर्मचा-यांची विशेषतः अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणाची भुमिकाही लक्षणीय राहिली आहे. 

जनतेच्या सहकार्यामुळेच यश- मुगळीकर
कोरोना प्रादुर्भावाच्या उपाययोजनेसाठी प्रशासकीय स्तरावर त्रिस्तरीय व्यवस्था आखण्यात आली. लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. अजूनही जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. यात स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरीकांचे मोठे सहकार्य प्रशासनाला लाभल्यानेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास यश आले. पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर हायरीस्क कॉन्टॅक्टमधील लोकांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आल्याने संपर्क टाळल्या गेला. इतरांशी संपर्क न होण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. त्या दृष्टीने वर्गवारी करुन उपाययोजना करण्यात आल्या. सरकारी व खासगी डॉक्टरांच्या योगदानामुळेच जिल्हा परिस्थितीवर नियंत्रण करु शकला, असे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर म्हणाले.

शासन अनुदाण वाटप, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार – उपमुख्यंत्री अजित पवार ; ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक; आमदारांच्या मागण्यांवर चर्चा

शासन अनुदाण वाटप, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार – उपमुख्यंत्री अजित पवार ; ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक; आमदारांच्या मागण्यांवर चर्चा



मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर केलेल्या निधीचं वितरण करणे, अंशत: अनुदानित शाळांना प्रचलित धोरणाप्रमाणे टप्पा देण्याचा शासननिर्णय जारी करणे, कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांना अनुदानासह मान्यता देणे, अघोषितला घोषित करुन अनुदान देणे आदी मुद्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून या मुद्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.कोरोना संकटामुळे लागू टाळेबंदीचा फटका राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही बसला असून शिक्षक बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितित आज सह्याद्री अतिथिगृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार सर्वश्री बाळाराम पाटील, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, किशोर दराडे आदींनी उपस्थित केलेल्या शिक्षणविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.



संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.


Monday, June 22, 2020

सोनपेठ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आता प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ही सुसज्ज - गट विकास अधिकारी

सोनपेठ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आता प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ही सुसज्ज - गट विकास अधिकारी 



सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणू महामारी च्या संकटामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज असावी याकरिता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. राजेश दादा विटेकर यांचे सूचनेनुसार आणि जि. प. चे  मुख्य कार्यकारी अधिकारी  बि.पि.पृथ्वीराज यांचे नाविन्यपूर्ण संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना सद्यस्थितीत आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य ग्रामपंचायतीच्या सहकार्याने 14 वित्त आयोगातून नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले.  आणि या साहित्याच्या वापरही सुरू झाला आहे. 
   याच धर्तीवर सोनपेठ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ही सुसज्ज असावे , आहे त्या ठिकाणीच १००% संस्थात्मक प्रसूती सुलभ व्हावी, लहान बाळांचे आरोग्य संबंधाने आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध असावे,याकरिता पंचायत समिती स्तरावरुन ज्या ठिकाणी उपकेंद्र आहे अशा ग्रामपंचायतींना संबंधित वैद्यकीय साहित्याच्या उपलब्ध  करिता आवाहन करण्यात आले होते.  या आवाहनास तलुक्‍यातील नऊ आरोग्य उपकेंद्राच्या सर्वच नऊ ग्रामपंचायतीने सरपंच महोदयांनी,  ग्रामसेवक बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपकेंद्र करिता काय साहित्य आवश्यक आहे , याची तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कडून यादी बनवत उपकेंद्रा करिता सदर साहित्य उपलब्ध करून घेण्यात आले आहे . 
 कोरोना महामारी च्या धर्तीवर तालुक्याच्या  ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळता यावी आणि रुग्णांवर किमान प्राथमिक उपचार आहे त्याच ठिकाणी व्हावेत या बाबी आता या उपलब्ध झालेल्या वैद्यकीय साहित्याच्या माध्यमातून शक्य होणार आहेत . सदर ग्रामपंचायतीची नावे आवलगाव,  दिघोळ ,नरवाडी,  खडका, कान्हे, धामोनी , उखळी बु.,  लासीना, शिर्शी आहेत. 
  याकरिता सर्व संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्व संबंधित ग्रामसेवक यांचे पंचायत समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आभार. 
    सदर उपलब्ध झालेले साहित्य हे नियमित वापरात राहील याबाबत संबंधित उपकेंद्राचे कर्मचारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.


कापसाच्या गाड्या एसएमएस आल्याशिवाय आणू नका - जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

कापसाच्या गाड्या एसएमएस आल्याशिवाय आणू नका - जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रावर कापूस उत्पादक शेतक-यांनी संबंधीत बाजार समितीकडून एसएमएस किंवा मोबाईलवर निरोप आल्याशिवाय कापसाच्या गाड्या आणू नयेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी सोमवारी(दि.22) सायंकाळी काढलेल्या एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 
ज्या शेतक-यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून कापूस विक्री संदर्भात एसएमएस किंवा मोबाईलवरून जोपर्यंत कळविण्यात येत नाही तोपर्यंत संबंधीत शेतक-याने कोणतेही वाहन बाजार समितीच्या आवारात किंवा जिनिंगसमोर असलेल्या रस्त्यावर आणून उभे करू नये, असे जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी म्हटले आहे.
एसएमएस किंवा मोबाईलवरून मेसेज आल्याशिवाय जे शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेवून येतील, अशा शेतक-यांना बाजार समितीकडून कोणत्याही प्रकारचे टोकन दिले जाणार नाही. तसेच पणन महासंघामार्फत संबंधीत शेतक-यांचा कापूस ही खरेदी केला जाणार नाही, असेही उपनिबंधक सुरवसे यांनी नमुद केले असून जे शेतकरी अशा पध्दतीने खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेवून येतील, त्यांच्या वाहनांचा खर्च व इतर निर्माण होणा-या अडचणी संदर्भात संबंधीत वाहनधारक व शेतकरीच जबाबदार राहील तसेच यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास संबंधीत वाहन आणणारे जबाबदार राहतील, असा इशाराही सुरवसे यांनी दिला आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.