चिमण्यांना जलपात्र लावून जागतिक चिमणी दिन साजरा
सोनपेठ (दर्शन) :-
कै.बाजीराव देशमुख माध्यमिक विद्यालय शेळगाव (म.) येथील उपक्रमशील शिक्षक,पर्यावरणप्रेमी वृक्षमित्र महेश जाधव यांनी 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पक्षांसाठी झाडांना जलपात्र लावून साजरा केला.त्यांच्याशी बोलताना त्यांनी जागतिक चिमणी दिवस, चिमणी वाचवा निसर्ग वाचवा असा संदेश देत आपण दिसेल त्या झाडाच्या फांदीला चिमण्यांसाठी पाण्याचे पात्र बांधून चिमण्यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न जागतिक चिमणी दिनाच्या अनुषंगाने केला शाळेतील वृक्षांना जलपात्र लावण्यात आले.उन्हाळ्यातील उन्हाची दाहकता व पक्ष्यांची पाण्यासाठीची व्यकुळता हे लक्षात घेऊन पक्षांसाठी जलपात्र लावू ,पक्ष्यांचे रक्षण करू!
माणसाच्या अगदी जवळ राहणारा हा पक्षी म्हणून चिमणीकडे पाहिल्या जात पण या पक्ष्यांच्या अनेक जाती लुप्त होत असून छत, झाड, घराच्या देवळ्या घरातील फोटोच्या मागे, झाडावर असे मिळेल त्या ठिकाणी घरटे करून जीवन जगणाऱ्या पर्यावरणाचा महत्वपूर्ण घटक असणाऱ्या या पक्षांचा थोडा विचार करून जलपात्र लावणे आवश्यक आहे.
अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे ( सिमेंटच्या जंगलामुळे ), विकासाच्या नावाखाली होत असलेल्या वृक्ष तोड आदी इ कारणामुळे मागील काही वर्षांपूर्वी चिमणी दिसेनाशी झाली . ती रोखण्यासाठी २० मार्च २०१० पासून जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा होऊ लागला.
चिमण्या,कावळे,साळुंकी, चित्रं, टीवटीव अश्या अनेक पक्ष्यांना वाचवण्यासाठी संकल्प करूया तयार करूया, वाढत्या तापमानात त्यांना पाणी पिण्यासाठी मिळेल त्यात भरून ठेवूया आणि चिमणी वाचविण्याचा छोटासा प्रयत्न सर्वांनी करावा असेही आवाहन महेश जाधव यांनी केले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यपक आर.एल.
धबडे सर, सत्यशील खंदारे,ओंकार जाडे, शिवाजी पाटील, धम्मानंद खंदारे, भक्तराज गांगर्डे, रामेश्वर चव्हाण उपस्थित होते.





Ok
ReplyDelete