जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना कक्षास भेट देऊन
विलगीकरण कक्षातील नागरिकांशी साधला संवाद
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी येथे अग्नीशमन दलाच्या व्हॅनमार्फत जिल्हा रुग्णालयात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी दी . म . मुगळीकर , उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी कोरोना कक्षास भेट देवुन पाहणी केली व संपूर्ण आढावा घेवुन कक्षात विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
कोरोना आपत्ती परिस्थिती पाहता व भविष्यकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने तसेच नागरिकांना दैनंदिन अत्यावश्यक सोयी, सुविधा व सेवा सुलभ रितीने मिळण्यासाठी परभणी शहरातील कल्याण मंडपम, धार रोडवरील डॉ . बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे वसतीगृह व क्रीडा संकुला जवळील नवनिर्मित जिल्हा परिषद इमारतींची पाहणी जिल्हाधिकारी दी . म . मुगळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली आपत्ती प्रशासन पथकामार्फत करण्यात आली. तसेच या जागी गरजु नागरिकांना भविष्यात विलगीकरण, अत्यावश्यक वस्तुंचे सेवा केंद्र कार्यान्वीत करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी पाहणी करुन चाचपणी केली.
आजपर्यंत जिल्हा रुग्णालय परभणी येथे १४१ रुग्णांची नोंद झालेली त्याची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे. एकुण घेण्यात आलेले स्वॅब ९२ व त्या पैकी ६६ निगेटिव्ह असुन ११ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आजतागायत एकुण १५ स्वॅब एन . आय . व्हि ( राष्ट्रीय विषाणु संस्था ) पुणे यांनी तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे . आज दि. २८ मार्च २०२० रोजी एकुण ७ रुग्णांचा नमुना ( स्वॅब ) तपासणीसाठी राष्ट्रीय विषाण संस्था पुणे ( एन . आय . व्हि ) येथे पाठविण्यात आला आहे. एकुण नोंद झालेले संशयीत रुग्ण १४१ पैकी घरी विलगीकरण११४, हॉस्पीटलमध्ये संसर्गजन्य कक्षात १४, विलगीकरणाचा कालावधी पुर्ण झालेले १३, तसेच नोंद झालेल्या एकुण १४१ पैकी परदेशातुन आलेले ५७ व त्यांच्या सपंर्कातील ५ असे आहेत. दि.28 मार्च रोजी नव्याने 7 संशयीत दाखल झाले आहे.
जीवनावश्यक वस्तू , औषधी आणि अन्नधान्य, भाजीपाला यांची दुकाने पूर्णवेळ सुरु राहणार असुन नागरीकांनी नाहक गर्दी करु नये व अफवांना बळी पडु नये. तसेच काही अडचण असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष परभणी क्रमांक ०२४५२ - २२६२४४ व्हॉटसअॅप क्रमांक - ७७४५८५२२२२ व आपत्ती प्रशासन कक्षातील दुरध्वनी कंमाक ०२४५२ - २२६४०० येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
-*-*-*-*-

No comments:
Post a Comment