सोनपेठ (दर्शन) :-
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचा तसेच खोट्यानाट्या कारवाया, गुन्हेगारी लोकांना पाठीशी घालून अवैध धंदे चालविण्यासाठी पूर्ण संरक्षण तर प्रतिष्ठित नागरिकांना मात्र धाक दडपशाही केली जाते, सोनपेठ पोलीस दारूच्या नशेत कारवाई करणे ?अशा अनेक प्रकारात सर्वसामान्य जनतेचा सोनपेठ पोलिस प्रशासनावर तीव्र असंतोषमुळे माननीय पोलीस अधीक्षक परभणी यांना दिनांक 11 मार्च 2020 रोजी सर्वपक्षीय प्रमुख नेते शिवसेना, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्या स्वाक्षरीचे निवेदनातुन स्पष्ट केले असून दिनांक 12 मार्च 2020 गुरुवार रोजी पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ सोनपेठ शहर बंदची हाक देण्यात आली असून वरिष्ठ माननीय पोलीस अधीक्षक परभणी यांनी तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी सदरचा बंद करण्यात आला आहे असे दिलेल्या निवेदनात सांगितले असून यापूर्वीही सोनपेठ पोलीस प्रशासन अवैध वाळू तस्करी सारख्या गुन्ह्यात सहभागी असुन माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे कारवाईचे अर्ज पडून आहेत यावर काय कारवाई होती हे येणारा काळच सांगेल.

No comments:
Post a Comment