'ऑनलाइन बॉटनी क्वीझ-२०२०' चा निकाल जाहीर ; परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे येथील आनंद दिलीपराव तुळणकर हा विद्यार्थी सर्व प्रथम
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयातील "वनस्पतीशास्त्र" विभागाच्यावतीने "विज्ञान दिनाच्या" निमित्ताने आयोजित केलेल्या "राष्ट्रीय ऑनलाइन बॉटनी क्वीझचा" निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.विज्ञान दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवले जातात,यामध्ये वनस्पतीशास्त्र विभागाने "राष्ट्रीय आनलाईन क्विझ २०२०" चे आयोजन केले होते, या स्पर्धेत परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे येथील "आनंद दिलीपराव तुळणकर" हा विद्यार्थी सर्व प्रथम आलेला असुन महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपुर येथील विद्यार्थिनी मोहिनी चंद्रशेखर मोरे द्वितीय तर प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड येथील हर्षदा किशनराव मरकुंदे ही विद्यार्थिनी तृतीय आलेली आहे.
या स्पर्धेत सहा राज्यातील चारसे नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख बक्षीस प्रथम रु. १००१/- शैलेजा भोसले , द्वितीय रू. ७५१/- डॉ. विठ्ठल मुलगीर, व तृतीय ५०१/- प्रा. विशाल राठोड या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून देण्यात येणार आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते व या क्वीझचे समन्वयक डॉ. मुकुंदराज पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:
Post a Comment