Wednesday, March 18, 2020

नागरिकांनी शासकीय कार्यालयास भेट देणे टाळावे - जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर

नागरिकांनी शासकीय कार्यालयास भेट देणे टाळावे - जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर




परभणी / सोनपेठ (दर्शन)  :- 
केंद्र शासनाच्या  सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या मर्यादित करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयात यापुढे केवळ मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश देण्यात येणार आहे.  तरी अत्यंत तातडीच्या कामाशिवाय नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयास भेट देणे  टाळावे. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.

        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक लिपिक व एका शिपायाची कार्यालयीन वेळेमध्ये नेमणूक करण्यात आली असून त्या ठिकाणी एका इंटरकॉम फोनची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना ज्या अधिकाऱ्याला भेटावयाचे असेल त्या अधिकाऱ्याला इंटरकॉमवर फोन करून आधी सदर अभ्यागताबद्दल कळविण्यात येईल. त्यानंतर अभ्यागताचे कामाचे स्वरूप लक्षात घेऊन संबंधित अधिकारी अभ्यागतांची भेट घेण्याबद्दल उचित निर्णय घेतील. तसेच प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनरची व्यवस्था करण्यात आली असून भेट देणाऱ्या अभ्यागतांसाठी  सॅनिटायझरची सुविधाही येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.
-*-*-*-*

No comments:

Post a Comment