जीवनावश्यक वस्तू पुरवठा आस्थापना सुरूच राहणार - जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जिल्ह्यातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणा -या आस्थापना सुरुच राहणार असल्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या जीवनाश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवू नये तसेच अन्न-धान्य व जीवनाश्यक वस्तूंची खरेदी नियमित गरजेप्रमाणे करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी दी. म. मुगळीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचे संशयीत रुग्ण शेजारील जिल्ह्यात आढळून आल्याची बातमी आहे . यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे . तसेच ज्याद्वारे कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये तसेच नागरिकांची गर्दी एकवटू नये म्हणून जिल्ह्यात जीवनाश्यक वस्तू पुरविणा-या आस्थापना वगळून इतर आस्थापना दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशीत केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असेल एवढेच अन्न- धान्य , आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करावी तसेच कोरोना विषाणूचा संसर्गाबाबत तपासणीसाठी आणि अधिक माहितीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय क्रमांक ०२४५२ - २२३४५८ व जिल्हा प्रशासनाशी ०२४५२ - २२६४०० या क्रमांकावर संपर्क साधावा.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment