श्री अन्नपूर्णा चैरिटेबल ट्रस्ट परळी वै प्रशासना सोबत कोरोना जनजाग्रती तसेच प्रशासनास ट्रस्टचे सहकार्य राहणार
सोनपेठ (दर्शन):-
श्री अन्नपूर्णा चैरिटेबल ट्रस्ट मागील सात वर्षां पासून अन्नछत्रच्या माध्यमातून प्रभु वैजनाथा च्या नगरित बाहेरगावाहुन आलेल्या शिव भक्तां करीता निशुल्क अन्न प्रसाद वितरना सोबत ही संस्था सामाजिक उपक्रमात सुद्धा योगदान देत असते
आज सम्पूर्ण विश्वा समोर कोरोना नावाच्या विषाणु ने थैमान घातले आहे विकसित देशानी सुद्धा या महामारी समोर गुडघे टेकले आहेत.भारताची लोकसंख्या लक्षात घेता आज आपल्या समोर एक खुप मोठ आवाहन उभा आहे.परंतु घाबरुन न जाता आपण जर काही नियमांचे पालन केले तर निश्चितच आपण या पासून स्वताला व समाजाला सुरक्षित ठेऊ शकतोत प्रशासन भरपूर प्रयत्न करीत आहे.एक सुजान नागरिक म्हणून आपण स्वतासाठी व देशासाठी प्रशासनाद्वारे दिलेल्या निर्देशांचे पालन करावे अशी विनंती ट्रस्ट करीत आहे. या विषयवार आधारित माहिती पत्रक सम्पूर्ण परळी शहरात ट्रस्ट द्वारे वितरित करण्यात आले आहेत तसेच 22 तारखेच्या जनता कर्फ्यू ला समर्थन करण्याबद्दल पोस्टर पूर्ण परली शहरात लावून जनजागृति केलेली आहे. आज या कोरोना विषाणु संबधित रोगांची लक्षणे व घ्यावयाच्या काळजी संदर्भातील माहिती पत्रक व जनता कर्फ्यू चे पोस्टर चे विमोचन परळी चे तहसीलदार मा.विपिनजी पाटिल साहेब व परळी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अरविन्दजी मुंडे साहेब यांच्या द्वारे करण्यात आले
या समयी ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
श्री अन्नपूर्णा चैरिटेबल ट्रस्ट परळी वै प्रशासना सोबत कोरोना जनजाग्रती तसेच प्रशासनास ट्रस्टचे सहकार्य राहणार.

No comments:
Post a Comment