Monday, March 16, 2020

पदवीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या - विद्यापीठ, महाविद्यालयांच्या वसतिगृहांनाही सुट्टया - राज्य शासनाचे आदेश ; विद्यापीठाचे परिपत्रक जारी

पदवीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या - विद्यापीठ, महाविद्यालयांच्या वसतिगृहांनाही सुट्टया - राज्य शासनाचे आदेश ; विद्यापीठाचे परिपत्रक जारी


औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांच्या तासिकांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी असणार आहे . तसेच १७ मार्चपासून सुरु होणाऱ्या पदवी अभ्यास क्रमाच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
  राज्य शासनाच्या आदेशप्रमाणे विद्यापीठाच्या वतीने  परिपत्रक जारी करण्यात आले आहे, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन 
मंडळाचे संचालक डॉ गणेश मंझा यांनी दिली . 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांच्या तासिकांना १६ ते ३१ मार्च दरम्यान सुट्टी असणार आहे . तसेच १७ मार्चपासून सुरु होणाऱ्या पदवी अभ्यास क्रमाच्या परीक्षा तसेच विद्यापीठातील पद्व्यूत्तर अभ्यासक्रच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या  आहेत. तसेच प्राध्यापकांनी २६ मार्चपर्यंत घरी बसूनच काम करावे . प्रशासकीय कामकाज सुरूच राहणार आहे. राज्य शासनाच्या आदेशप्रमाणे उच्च शिक्षण विभाग उपसचिव सतीश तिडके व संचालक डॉ धनराज माने यांनी 'कोरोना' प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय करण्याचे आदेश दिले आहेत.  याविषयी कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी तात्काळ परिपत्रक जरी करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षाने विभागाने रविवारी (दि. १६) रात्री उशिरा परीक्षा मंडळ संचालक डॉ गणेश मंझा यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जरी केले आहे. ३१ मार्चपर्यंत विद्यापीठातील सर्व वसतिगृहे देखील बंद असणार आहेत . या काळात विद्यार्थ्यानी आपल्या गावाकडे जावे, असे राज्य शासनाचे आदेश आहेत . 

काळजी घेण्याचे कुलगुरू यांचे आवाहन
-------

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयातील
विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन औषधनिर्माणशास्त्रज्ञ तथा  
कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी केले आहे. कोरोना हा संसर्गजना  आजार आजार असल्याने खोकल्याने, थुंकल्याने अथवा शिंकल्याने विषाणू पसरू शकतात, याची सर्वानी काळजी घ्यावी, असेही डॉ येवले म्हटले आहे . 

………
संजय शिंदे
जनसंपर्क अधिकारी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.संपर्क क्रमांक : ९४०४०२४०४०
कार्यालय : २४०३१५०
ई मेल : probamu@gmail.com 
pro@bamu.ac.in

No comments:

Post a Comment