रासेयो स्वयंसेवकांनी केली कोरोनाबद्दल जनजागृती
सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या रासेयो स्वयंसेवकांनी तालुक्यातील ग्रामीण भागात शेळगाव येथे कोरोना संसंर्गाबद्दल जनजागृती करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची माहिती दिली.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे उद्या २२ मार्च रोजी 'जनता कर्फ्यू' पाळण्याची विनंती केली.कोरोना च्या पार्श्वभूमीवर लोकांनी कोणती काळजी घ्यावी हे ही विद्यार्थ्यांनी सांगितले.साबणाने हात स्वच्छ धुणे, नाकातोंडाला रूमाल किंवा मास्क वापरणे, बोलताना तिन फुट अंतरावर राहणे, कोणताही प्रवास टाळणे , कोरोना ची लक्षणे दिसू लागताच शासकीय दवाखान्यात जाणे आदी बाबतीत माहिती दिली.या जनजागृती कार्यक्रमामध्ये रासेयो स्वयंसेवक माणिक धोत्रे, दिपक जोगडे, अजय जाधव, गणेश शिंगाडे, भगवान मुलगीर, हिवरगंड, जोगदंड यांनी सहभाग नोंदवला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य वसंत सातपुते, रासेयो संचालक शिवराज बोकडे, कार्यक्रमाधिकारी प्रा डाॅ मारोती कच्छवे, प्रा.डाॅ. बापुराव आंधळे, प्रा.डाॅ. मुक्ता सोमवंशी यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. तसेच येणा-या काळात कोरोना संसंर्ग रोगाबद्दल राष्ट्रीय सेवा योजना विभाग तत्परतेने पुढे राहिल याची शाश्वती दिली.
No comments:
Post a Comment