स्त्रियांनी स्वतःच्या मानसिकतेत बदल घडून क्षमतेनुसार विकास साधला पाहिजे - अँड.माधुरीताई क्षिरसागर
सोनपेठ (दर्शन) :-
समाजाच्या विकासामध्ये महिलांचे योगदान प्रचंड प्रमाणात असूनही आजही अनेक महिला आपल्या अधिकारापासून आणि विकासापासून वंचित आहेत यासाठी महिला दिना चे औचित साधुन महिलांच्या अधिकाराबद्दल जागृत करण्यासाठी जिजामाता पब्लिक स्कूलच्या वतीने वूमन अवेअरनेस प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड.माधुरीताई क्षिरसागर,डाँ.अर्चना पारसेवार, प्रमुख अतिथी म्हणून सौ. स्मिताताई विटेकर,सौ.सारिकाताई विटेकर, कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ.विद्याताई धोंडगे तसेच सर्व महिला पालक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर शाळेतील विविध स्पर्धेमधील विजेते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना स्त्रियांनी स्वतःच्या मानसिकतेत बदल घडून क्षमतेनुसार विकास साधला पाहिजे असे मत अँड.माधुरीताई क्षीरसागर यांनी व्यक्त केले.महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करताना शरीर हे अनमोल संपत्ती असून तिची काळजी घेतली पाहिजे असे मत डाँ.अर्चना पारसेवार यांनी व्यक्त केले.त्यानंतर मुलगी आणि आई यांचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे असल्याचे मत श्रीमती स्मिताताई बडेकर यांनी व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोप करताना शाळा सतत मुलींच्या सक्षम ते साठी उपक्रम राबवणार असल्याचे मत विद्याताई धोंडगे यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वैशाली मुदगलकर यांनी केली तर आभार प्रदर्शन सौ.अर्चना वाकणकर यांनी केले.



No comments:
Post a Comment