Wednesday, March 4, 2020

वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथोत्सवाचे सुयोग्य नियोजन करावे - जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर

वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथोत्सवाचे सुयोग्य नियोजन करावे - जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर                      
   
     
परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्हा शासकीय ग्रंथालयाच्या इमारत परिसरात परभणी ग्रंथोत्सव-2019 चे दि.12 व 13 मार्च 2020 रोजी आयोजन करण्यात आले असून वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी परभणी ग्रंथोत्सवाचे सुयोग्य नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिले.
 परभणी ग्रंथोत्सव 2019 चे आयोजनाबाबत पुर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षामध्ये घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य आसाराम लोमटे, जिल्हा ग्रंथालय संघ सचिव विलास शिंदे, प्रकाशन प्रतिनिधी केशव वसेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे आदि उपस्थित होते.
 पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर म्हणाले की, ग्रंथोत्सवात पुस्तके विक्री स्टॉलसोबतच जनसामान्यामध्ये जनजागृती करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन, प्लॅस्टिक बंदी, पर्यावरण विषयक स्टॉल लोकांना दिसतील अशा स्थितीमध्ये लावावेत असे सांगून त्यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.कातकडे यांच्याकडून ग्रंथोत्सवात येणारे साहित्यिक, कवी, लेखक मान्यवर आदिंची माहिती जाणून घेवून योग्य त्या सुचना दिल्या. 
 परभणी ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्री तसेच विविध कार्यक्रमात पहिल्या दिवशी सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत ग्रंथ दिंडी, सकाळी 10.30 वाजता उदघाटन, दुपारी 2 ते 4 पर्यंत वाचन संस्कृती वृंध्दीगत करण्यासाठीचे उपाय, दुपारी 4 ते 5.30 वेळेत परिसंवाद तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता कथाकथन, दुपारी 2 ते 4 या वेळेत काव्यवाचन आणि दुपारी 4.30 वाजता ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी यावेळी दिली.      -*-*-*-*-

No comments:

Post a Comment