Sunday, March 29, 2020

घरमालकांनी एका महिन्याचे घरभाडे घेऊ नये - जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर

घरमालकांनी एका महिन्याचे घरभाडे घेऊ नये - जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 
जिल्ह्यामध्ये परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यांमधून मजुरी, व्यवसाय, शिक्षण, व इतर कारणामुळे परभणी जिल्ह्यात घर भाड्याने घेऊन वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे घरमालकांनी एका महिन्याचे घरभाडे घेऊ नये.असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.

        जिल्ह्यात परराज्यातून मजुरी, व्यवसाय, शिक्षण आणि इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर मजूर , व्यावसायिक , विद्यार्थी , नोकरदार वर्ग आदी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याने घर घेवून राहत आहेत. कोरोना विषाणू  संसर्गाच्या आपात्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरी राहणा-या भाडेकरुना सद्यस्थितीत घराबाहेर काढू नये तसेच ज्या नागरिकांची उपजीविका मजुरी किंवा व्यवसायावर अवलंबून आहे अशा भाडेकरूंचे एक महिन्याचे भाडे सबंधित घरमालक यांनी घेवू नये. तसेच आपत्कालीन परिस्थितीत आपल्या भाडेकरुना आवश्यकता असल्यास अन्नधान्य आणि इतर बाबतीत मदत करावी. जेणेकरून दि. १४ एप्रिल २०२० पर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये अशा नागरिकांचे स्थलांतर होणार नाही आणि कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमध्ये सहभागी होवून या आपत्तीचा सक्षमपणे सामना करता येईल. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविले आहे.
                     -*-*-*-*-

No comments:

Post a Comment