राजेशदादा विटेकर यांची वाढदिवसाचे निमित्त साधुन ग्रामीण रुग्णालयास आगळी-वेगळी 71,000/- हजार रुपयांची मदत
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथिल ग्रामीण रुग्नालय येथे दि.27 मार्च 2020 शुक्रवार रोजी मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेशदादा विटेकर यांनी आपला वाढदिवस आगळा-वेगळा आदर्श निर्माण करत निमित्त साधून सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयास 71,000 /- हजार रुपयांची आर्थिक मदत म्हणून चेक दिला. याप्रसंगी जि.प.अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर यांच्या शुभहस्ते मा.तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांच्या कडे 71,000 /- रुपयाचा चेक सपूर्द करण्यात आला यावेळी मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेशदादा विटेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार, डॉ.सिध्देश्वर हालगे आदिंची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment