मुंबई, पुण्यावरुन आलेल्या नागरिकांना आवाहन कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधा
औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
मुंबई व पुणे येथून जे नागरिक मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यात आले असतील आणि त्यांना कोरोना आजाराचे थोडेही लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधून तपासणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालय प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. संचारबंदीपूर्वी मुंबई, व पुण्यावरून अनेक नागरिक आपापल्या गावाकडे मोठ्या संख्येने आले. अशा नागरिकांना कोरोनाची थोडीही लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी. संपर्कासाठी विभागातील आठही जिल्हयातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे मोबाईल व त्यांचे दुरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहे. औरंगाबाद -डॉ. सुंदर कुलकर्णी 7020843292, 9823070351, जालना- डॉ. मधुकर राठोड, 9422215730, 02482-224381, बीड- डॉ. अशोक थोरात, 9527239000, परभणी-डॉ. बाळासाहेब नागरगोजे 9422744850, (02452) 223458,
लातूर-डॉ. संजय ढगे 9822823773, 02382/246803, हिंगोली- डॉ. किशोर श्रीवास 91300 53862, उस्मानाबाद -डॉ. गलांडे 9423718261, 02472/222475
02472/222100, नांदेड- डॉ. भोसीकर 9890130465, 02462234750, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment