बंद पडलेल्या टपाल व ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलीसी पुन्हा सुरू करता येणार ; 31 मार्च 2020 पर्यंत जवळच्या पोस्ट ऑफीसमध्ये लेखी अर्ज करावा
बुलडाणा / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
ज्या पॉलीसी धारकांच्या पॉलीसी सतत 5 वर्षे भरणा न केल्याकारणाने बंद पडलेल्या आहेत. त्या पॉलीसीचे पुनूरुज्जीवन 1 एप्रिल 2020 नंतर करता येणार नाही. त्यामुळे शेवटची संधी म्हणून शेवटच्या भरलेल्या प्रिमीयमच्या तारखेपासून 5 वर्षांची मर्यादा ओलांडलेल्या पॉलीसी 31 मार्च 2020 पर्यंत पुनरूज्जीवीत करण्यासाठी विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी पॉलीसी धारकांनी जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क साधावा. पोस्ट ऑफीस लाईफ इन्शुरन्स नियम 2011 मधील अटी व शर्तींच्या दुरूस्तीच्या अनुषंगाने अधिसूचना दि 19 सप्टेंबर 2019 च्या निवेदनानुसार पॉलीसीचे पुनरूज्जीवन करता येणार आहे. त्यासाठी पॉलीसी धारकांच्या चांगल्या आरोग्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता राहील. अशा पॉलीसीचे पॉलीसीधारक ज्यांना विमा लाभ मिळविण्यासाठी पॉलीसी पुनरूज्जीवीत करण्याचा विचार आहे, त्यांनी जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफीसमध्ये 31 मार्च 2020 च्या आधी लेखी अर्ज करावा. या तारखेनंतर पॉलीसीचे पुनरूज्जीवन केले जाणार नाही, त्यामुळे त्या पॉलीसीज नियमांनुसार रद्दबातल समजल्या जातील. अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 18001805232 वर संपर्क करावा, असे आवाहन डाक अधिक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

No comments:
Post a Comment