परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
करोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन झाले आहे. या परिस्थितीमध्ये अनेक गरिबांचे घरी आज कामाला गेले तरच उद्या चूल पेटते अशी विदारक परिस्थिती असल्याचे भान ठेवत शालिमार समूहाचे संस्थापक हमीद खान यांनी जीवनावश्यक वस्तूंचे एक कीट तयार केला आहे . जीवनावश्यक वस्तूंचे 3500व्यक्तींना म्हणजेच सातशे कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तूंचे आज जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सोबत शालिमार ग्रुपचे संस्थापक शेख हमीद यांनी गरीब लोकांना राशन आणि घरगुती साहित्याचे वितरण केले. यामधये पाच किलो तांदूळ, साडेसात किलो गहू, तेल एक किलो , दोन किलो दाळ, साखर दीड किलो, चहापत्ती 250 ग्रॅम, हळदी 100 ग्रॅम, मिरची पावडर 250 ग्रॅम, मीठ एक किलो, कपडे धुण्यासाठी साबण एक नग, आंघोळीसाठी डेटॉल साबण 2 नग आणि सर्फ यावेळी गोरगरीब व गरजू लोकांनी जिल्हाधिकारी श्री मुगळीकर साहेब व शेख हमीद यांचे ऋण व्यक्त केले.


No comments:
Post a Comment