Friday, March 27, 2020

कोरोना महामारीसाठी शिक्षकही सरसावले; एक दिवसाचे वेतन देणार



कोरोना महामारीसाठी शिक्षकही सरसावले; एक दिवसाचे वेतन देणार



पुणे/ परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून राज्यातील प्राथमिक शिक्षक एक दिवसाचे वेतन देऊन या कामी हातभार लावणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे. राज्यात प्राथमिक शाळांमध्ये साधारण पावणेतीन लाख शिक्षक-कर्मचारी सेवेत असून हे सर्वजण एका दिवसाचे वेतन करोनावरील उपाययोजनांसाठी देणार आहेत.

प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षक एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे तांबारे यांनी सांगीतले . या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

राज्यातील सर्व खाजगी अनुदान प्राप्त प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १ दिवसाचे वेतन हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये घ्यावे, यासाठी आज महासंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व शिक्षण व वित्त सचिव यांना निवेदन ई-मेलद्वारे पाठविण्यात आले.

No comments:

Post a Comment