सोनपेठ (दर्शन) :-
जगात पछाडलेल्या कोरोना व्हायरस मुळे भारतात संपूर्ण लॉकडाऊन च्या धर्तीवर लॉक डाउन या धर्तीवर सोनपेठ पोलीस स्टेशन येथील गस्तीवर असलेल्या चाळीस-पन्नास अधिकारी व पोलिस जमादार, पोलीस शिपाई, महिला पोलीस आधी पोलीस मित्रांना सोनपेठ रोटरी क्लबच्या वतीने राजेश गायकवाड (मोबाईल हॉटेल चालक) यांच्या माध्यमातून केली चहाची सोय तर ज्ञानेश्वर डमढरे (कापड दुकानदार) यांनी कर्मचारी वर्गांना दिले मास्क. पोलिस मित्रांना सर्व जनतेने समजून घेण्याची आज गरज आहे. नागरिकांना या लॉकडाऊन मधून सूट अत्यावश्यक सेवा किराणा ,भाजीपाला इत्यादी बाजारपेठ वेळ सकाळी सात ते आठ असताना बाजार बंद करण्यासाठी व्यापारी लोकांना हीच पोलीस सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देताना साप्ताहिक सोनपेठ दर्शन प्रतिनिधी यांनी पाहिली आहे तसेच त्यांच्या भाषेतील आपलेपणा जाणवला परंतु हेच पोलिस मित्र गस्तीसाठि आपल्या घरासमोरून जात असताना देखील आपण एक देशाचे जबाबदार नागरिक म्हणून पिण्याच्या पाण्यासाठीही पोलीस मित्रांना विचारणा करत नाही हे बाब ओळखून सोनपेठ रोटरी क्लब यांनी चहाची सोय केली तसेच सामाजिक भावना समजून रस्त्यावरील पोट भरणाऱ्या राहुटि धारकांनाही पोलीस यंत्रणेच्या मार्फतच सोनपेठ रोटरी क्लब सर्व रोटरीयन यांनी तांदुळाचे वाटप हि केले असून पुन्हा स्वतःचा मोबाईल क्रमांकही देऊन आवश्यकता लागली तर पुन्हा सांगा असा शब्द दिला तसेच शहरातील दानशूर व्यक्ती व्यापारी असो की नोकरदार सर्व मिळून रोटेरियन आपल्या नावाचा गाजावाजा न करता आपली सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच आपण ही समाजाचे देणे लागतो ही भावना मनी धरून मा.तहसीलदार मार्फत या कोरोना महामारीस रोखण्यासाठी मदत निधी माननीय मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा माणस याप्रसंगी रोटेरियन बांधवांनी साप्ताहिक सोनपेठ दर्शन प्रतिनिधी जवळ बोलून दाखवला यावेळी रोटरीयन बांधव व अनेक पोलिस अधिकारी, जमादार, शिपाई आदिजन उपस्थित होते.

No comments:
Post a Comment